Sunday, June 23, 2024
Homeआध्यात्मिकनवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावावा.? दिशा कोणती.? दिवा विझला तर काय.?

नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावावा.? दिशा कोणती.? दिवा विझला तर काय.?

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात नवरात्राला खूप महत्त्व आहे. साधारणपणे आपण वर्षातून 2 वेळा देवीची उपासना करतो. नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोकं घट-स्थापना, अखंड दिवा, जागरण इत्यादी करतात. नवरात्राच्या 9 दिवसात आपण घरात घट स्थापना आणि अखंड दिवा लावतो. या अखंड दिव्याला न विझू देता तो अखंड तेवत ठेवण्याचा नियम आहे.

हा अखंड दिवा लावल्यानंतर आपण या दिव्याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विझूही द्यायचे नसते. जर कधी हा दिवा विझला तर हे सर्वात अशुभ किंवा वाईट मानले गेले आहे. आणि मित्रांनो नवरात्रात 9 दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी गायीच्या साजूक तुपाने अखंड दिवा लावायचा आहे. मित्रांनो जर घरात गायीचे साजूक तूप नसल्यास इतर कोणत्याही तुपाने आपण देवी पुढे अखंड दिवा लावू शकता.

नवरात्रातील 9 दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात. असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्यानं घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्ध होतात. म्हणून नवरात्राच्या पहिल्या दिवशीच संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियमानं संरक्षण करावं. नवरात्रात अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत, ज्यांना आपल्याला पाळावे. जेणे करून आपल्याला इच्छित फळ मिळू शकतात.

सहसा लोकं पितळ्याचा दिवा अखंड दिवा म्हणून तेवतात. आणि जर आपल्याकडे पितळ्याचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकता आणि मातीच्या दिवा अखंड दिवा म्हणून तेवण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण 1 दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कापड्यानं पुसून वाळवून घ्या. तसेच आपल्या शास्त्रांनुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेत असतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे आणि अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये‌

हा दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा नंतर लावावं आणि दुर्गा देवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याचा खाली आधी तांदुळ ठेवा. आणि ही वात रक्षासूत्र म्हणजे कलावा पासून बनवलेली असते. सव्वा हाताचा मापाचा हा रक्षा सूत्र असतो. पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात आणि हा अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा.

जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता. मोहरीचे तेल शुद्ध असल्यास वापरू शकता आणि अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावं पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूस ठेवावं. दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याचा वर काचेचे झाकण ठेवावं. आणि संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विझवू नये. दिवा स्वतःच शांत होऊ द्या आणि हा दिवा ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा ह्याला देवी देवांचे स्थान मानतात.

म्हणून अखंड दिवा पूर्व- दक्षिण दिशा म्हणजे आग्नेय कोणात ठेवणं शुभ असतं. लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वी कडे किंवा उत्तरेकडे असावं आणि अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश, देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करावी. दिवा लावताना मनातल्या मनात देवी देवतांना आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या अशी मनोमन‌ याचना करावी.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular