Sunday, December 3, 2023
Homeराशी भविष्यएक नंबरचे चुगलखोर असतात.. या 3 राशींचे लोक.. यांच्यापासून जपूनच रहा.!!

एक नंबरचे चुगलखोर असतात.. या 3 राशींचे लोक.. यांच्यापासून जपूनच रहा.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! सावधान तुमच्या आजूबाजूला चुगलखोर लोक असतील‌. हो असणारच.. चुगलखोर लोक म्हणजे कशी? तर ज्यांच्या पोटात काहीच राहत नाही तुम्ही त्यांना काही सांगितलं की ते जसंच्या तसं आणखीन तिखट मीठ लावून दुसऱ्या कोणाला तरी जाऊन सांगणारच. अशा लोकांना गॉसिप फार आवडत आणि यांच्या पोटामध्ये कुठला ही रहस्य दडवून राहू शकत नाही. मग आपण बघू या की, अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना आपण चुगलखोर म्हणू शकतो. प्रत्येक राशी मध्ये काही चांगले गुण असतात तर काही वाईट गुण असतात. कोणताही व्यक्ती परफेक्ट नसतो. सर्व गुणसंपन्न अस कोणीही नसत.

प्रत्येकामध्ये काहीना काही तरी चांगले आणि काहीना काहीतरी दोष असतातच आणि अशाच तीन राशी आहेत ज्यांच्या मध्ये चुगलखोरी करण्याचा दोष असतो. चुगल खोरी म्हणजे काय? तर इकडच तिकड सांगणे आणि त्या मध्ये सगळ्यात पहिली रास आहे.

कन्या रास- आता कन्या राशीच्या व्यक्ती प्रचंड हिशोबी असतात. तसंच अती चिकित्सक सुद्धा असतात. कन्या राशीच्या जर तुम्ही महिला असाल तर उत्तम स्वयंपाक सुद्धा तुम्ही करता. पण पण पण कन्या राशी च्या व्यक्तींना सुद्धा एखादं गुपित जर तुम्ही सांगितल तर ते किती काय त्यांच्या जवळ सुरक्षित राहीतील याची गॅरंटी कुणीही घेऊ शकणार नाही.

आता त्यांचा हेतू वाईट नसतो. पण ते इतरांना बद्दल मनोरंजक पद्धतीने सांगतात. इतरांसाठी त्रासदायक ठरणारी बाब स्वतः मात्र तर्क संगत करून सांगतात. त्यांच्या कृतीत काही ही चुकीचं दिसत नाही, पण शेवटी इकडचं तिकड सांगतात हे खर.

मिथुन रास – आता मिथुन राशीची ग्रहणशीलता, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, आकलनशक्ती आणि हजरजबाबी पणा यांना तोड नाही. मनोरंजक संवाद कौशल्याने ते लोकप्रिय होता हे सगळे त्यांचे चांगले गुण झाले. पण हो ते गप्पिष्ट असतात त्यांना. खूप गप्पा मारायला आवडत आणि भीड भाड न ठेवता बोलतात.

पण बोलायच्या आत नादात ते इतरांची गुपितं सुद्धा उघड करतात. ज्याला आपण इकडचं तिकडे करण म्हणतो. आता त्यांचा हेतू वाईट असेल असं नाही. पण बोलायच्या नादात त्यांच्याकडून बोलल जात हे खर. आणि म्हणूनच अशा लोकांना तुमची गुपित सांगताना तुम्ही जरा सावध राहा.

वृश्चिक राशी – ची लोक अतिशय चाणाक्ष चतुर असतात. पंख सुद्धा वृश्चिक राशी ची लोक मोजू शकतात इतके हुशार असतात असं म्हणायला हरकत नाही. पण हो स्वतःच्या बाबतीत मात्र कमालीची गुप्तता पाळतात. म्हणजे स्वतः कुठल्याही गोष्टी बद्दल ते इतरांजवळ बोलत नाहीत पण हा दुसराच्या गोष्टींमध्ये मात्र यांना भलता रस असतो.

दुसरा व्यक्तीच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्याची त्यांच्यामध्ये कमालीची उत्सुकता असते. परत जाणून घेतल्यानंतर त्या स्वतः पुरताच ठेवतील अस नाही तर त्या इतरांना सुद्धा मोकळ्या मनाने सांगतील म्हणजे स्वतः बद्दल फारस बोलणार नाही.

पण इतरांबद्दल बोलण्यामध्ये यांना भारी रस असतो. तुमच्या आजूबाजूला जर एखादी वृश्चिक राशीची व्यक्ती असेल तर त्या व्यक्ती जवळ तुम्ही काही ही बोलताना सावधगिरी बाळगायला हवी. कारण तुमची गोष्ट त्या कुठे कुणाला जाऊन सांगतील याचा काही अंदाज येणार नाहीत..

तर मंडळी या होत्या चुगली करण्यात सर्वात पुढे असणाऱ्या तीन राशी ज्यांच्या पोटात कधीच काही राहत नाही. किंवा असं म्हणू यात ज्यांना गोष्टी इकडच्या तिकडे करण्याची सवय असते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular