Monday, June 10, 2024
Homeराशी भविष्यफेब्रुवारी 2023 शनिदेवांचा होणार अस्त.. ‘या’ राशींना माता लक्ष्मींची साथ मिळणार.!!

फेब्रुवारी 2023 शनिदेवांचा होणार अस्त.. ‘या’ राशींना माता लक्ष्मींची साथ मिळणार.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! 2023 च्या सुरुवातीला शनिदेवाचे वर्षातील सर्वात महत्त्वपूर्ण गोचर होणार आहे. 17 जानेवारीला शनि कुंभ राशीत गोचर करणार आहे तर यानंतर एका महिन्यातच म्हणजे 3 फेब्रुवारीमध्ये शनिचा अस्त होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा कोणताही ग्रह मार्गक्रमण करतो तेव्हा साहजिकच त्याचा परिणाम हा 13 राशींवर दिसून येतो. शनि हा सर्वात शक्तिशाली ग्रह मानला जात असल्याने शनिच्या कोणत्याही हालचालीला ज्योतिष शास्त्रात विशेष महत्त्व आहे. यंदा फेब्रुवारी 2023 मध्ये शनि अस्त होताच 3 राशींच्या नशिबाचे दार उघडू शकते. या तीन राशींना अर्थाजनाचे नवनवीन स्रोत उपलब्ध होणार असून येणाऱ्या काळात त्यांना खऱ्या अर्थाने अच्छे दिन अनुभवता येऊ शकतात. चला तर मग पाहुयात या नशीबवान तीन राशी कोणत्या व त्यांच्यावर शनि अस्ताचा नेमका काय परिणाम होणार आहे…

वृषभ शनि देव कुंभ राशीत गोचर करतानाच वृषभ राशीत मंगळाचे गोचर होणार आहे, त्यामुळे सुरुवातीचा एक महिना आपल्याला किंचित समस्या जाणवू शकतात मात्र शनि अस्त होताच आपल्या नशिबाचे दार उघडू शकते. शनिदेव आपल्या राशीत दहाव्या भावी स्थिर होणार आहे, वृषभ राशीच्या मंडळींना नोकरीचे नवे प्रस्ताव मिळू शकतात.

कामाच्या ठिकाणी तुम्ही सर्वात विश्वसनीय ठरू शकता, नव्या जबाबदाऱ्यांसह आपल्याला नव्याने आर्थिक लाभ मिळण्याची संधी आहे. फेब्रुवारीच्या 3 तारखेपासून आपल्याला शुभ काळ सुरु होऊ शकतो.

मकर मकर राशीत शनि गोचर करून प्रभावकक्षेत दुसऱ्या स्थानावर स्थिर होणार आहे व फेब्रुवारीत याच स्थानी शनि अस्त होईल. यामुळे मकर राशीच्या मंडळींसाठी अनपेक्षित धनलाभाचे योग तयार होत आहेत. तुम्ही दिलेल्या उधारीचे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तसेच आपल्याला अर्थाजनाचे नवे मार्गही उघडू शकतात.

नोकरदार व व्यावसायिक मंडळींना आर्थिक लाभाच्या प्रबळ संधी आहे. तसेच ज्यांचे काम बोलण्याशी संबंधीत आहे म्हणजेच मीडिया, फिल्म, मार्केटिंग किंवा अन्य क्षेत्र त्यांना हा काळ सुखाचा ठरू शक्ती. शनि देव आपल्या राशीचे स्वामी मानले जातात त्यामुळेच शनि गोचर आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

तूळ शनिदेवाचे गोचर व अस्त आपल्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. तूळ राशीच्या प्रभाव कक्षेत शनिदेव गोचर करून पाचव्या स्थानी विराजमान होणार आहेत, हे स्थान शिक्षण व संतती प्राप्तीशी संबंधित मानले जाते. येत्या काळात या दोन बाबींमध्ये आपल्याला शुभ वार्ता मिळू शकतात. तसेच आपल्याला कार्यस्थळी मान प्राप्तीची संधी आहे.

प्रेम संबंध व वैवाहिक समस्या दूर होऊन येणारा काळ आपल्यासाठी मानसिक शांती घेऊन येऊ शकतो. आपल्याला धनप्राप्तीच्याही प्रबळ संधी आहेत, त्यामुळे तूळ राशीच्या मंडळींसाठी येत्या फेब्रुवारीत खऱ्या अर्थाने सुखाची सुरुवात होऊ शकते.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular