Sunday, April 21, 2024
Homeआध्यात्मिकफक्त 5 सोमवार करा हे पशुपती व्रत.. तुमची कोणतीही फेवरेट इच्छा ताबडतोब...

फक्त 5 सोमवार करा हे पशुपती व्रत.. तुमची कोणतीही फेवरेट इच्छा ताबडतोब पूर्ण होईल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असते. इच्छा या प्रत्येकालाच असतात. परंतु काही कारणांमुळे या इच्छा आपल्या पूर्ण होत नाहीत. खूप परिश्रम घेऊन देखील त्यात आपणाला अपयश प्राप्त होते. त्यामुळे आपण निराश होऊन जातो. जर तुमच्या मनात अनेक वर्षे एखाद्या इच्छापूर्तीची आतुरता असेल पण काही केल्याने ती पूर्ण होत नसेल तर हे 5 सोमवार पशुपती व्रत अवश्य करा.

मित्रांनो शिव- पुराणामध्ये आणि त्याचबरोबर स्कंदपुराणात पशुपती या व्रतातचे अनेक नियम सांगितले आहेत. हे व्रत करणाऱ्या साधकाने काय करावे, कुठले दान करावे ही सविस्तर माहिती आज तुम्हांला सांगणार आहोत. आजच्या काळात नियम पाळणे शक्य नाही. सोप्या भाषेत शास्त्ररास मान्य होईल अशा साध्या आणि सोप्या भाषेत हे व्रत आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो हे व्रत तुम्ही कोणत्याही महिन्यात सुरवात करून सलग 5 सोमवार हे व्रत करावे.

मित्रांनो इच्छा प्राप्ति साठी हे व्रत करताना अडचण आली ,मासिक धर्म आला असेल तर पुढील सोमवार पकडून हे व्रत करावे. प्रत्येक सोमवारी ब्रम्ह मुहूर्तावर उठावे.स्नान वैगरे करावे. सूर्याला अर्ध्य द्यावे. सूर्याला अर्ध्य म्हणजे तांब्याचा तांब्यात पाणी घेउन दोन्ही हात वर करून सूर्याला पाणी अर्पण करणे.अर्ध्य देताना ओम सुर्याय नमः हा जप करावा आणि तुमच्या घराशेजारी असणाऱ्या शिव मंदिरात जावे.

भगवान श्री शंकराची, शिवलिंगाची प्रार्थना करावी. जल अर्पण करावे. त्यासाठी पाणी आपल्याच घरातील घेऊन जावे आणि मित्रांनो मंदिरातील पाणी अजिबात घ्यायचे नाही. श्री शंकराला आवडणाऱ्या वस्तू सोबत घेऊन जावे. श्री शंकर ,भोलेबाबांना बेलपत्रक खुप आवडते आहेत. भोळेबाबाची पूजा करा. 108 बेलपत्रक शिवलींगवर पालथी ठेवावीत.

108 वेळा ” ओम नमो शिवाय” हा जप किंवा मंत्र म्हणावा. महिलांनी “नमो शिवाय” हा जप करावा आणि शिवलिंगावर पूजा,अभिषेक जेवढं करता येईल तेवढं करावे. मित्रांनो पूजा करताना आपली इच्छा शिवलिंग समोर बोलून दाखवावी आणि त्या दिवशी म्हणजेच सोमवारी उपवास करावा. फक्त फळआहार घ्यावा.आणि संध्याकाळी प्रदोषकाळी पुन्हा पूजा करा.

मित्रांनो पुन्हा शिवमंदिरात जावे आणि जाताना घरूनच 6 तुपाचे दिवे सोबत न्यावे. साखर किंवा मिठाई न्यावी.शिवलिंगाची पूजा करावी. सकाळी प्रार्थना केली असेल तरीही संध्याकाळी पुन्हा प्रार्थना करा. तुम्हाला यश, सुख समृद्धी, वैभव, आरोग्यासाठी प्रार्थना करा आणि 6 दिव्यापैकी 5 दिवे प्रज्वलीत करा. प्रार्थना करा.

जे काही सोबत गोड नेले असेल तर त्याचे 3 भाग करा. 2 भाग शिवशंकराला अर्पन करा. 1 दिवा आणि मिठाईचा एक भाग घरी घेउन या. घरात प्रवेश करण्यापूर्वी चौकटीच्या उजव्या हाताला उंबऱ्याजवळ तो एक दिवा प्रज्वलीत करावा. मिठाईचा घरी आणलेला एक भाग कुटूंबासोबत प्रसाद म्हणून खावा. 5 सोमवार हे व्रत मनोभावे, भक्तिभावाने ,पूर्ण श्रद्धेने हे व्रत कुणीही करू शकता.

तुमच्या घरात दारिद्र्य, गरिबी,कोणताही दुर्धर आजार, जाण्यासाठी तुमच्या मनातील इच्छापूर्तीसाठी हे व्रत करा. तुम्ही भोळेबाबाचें भक्त नसाल, कधी पूजा करत नसाल तरीही हे व्रत करू शकता.आणि मित्रांनो इष्ठ दैवत, ग्रामदैवत ते सुद्धा शिवशंकराला मानतात. सृष्टीचा सांभाळ करणारे भगवान श्री हरीविष्णू , श्रीराम, श्रीकृष्ण, श्री तिरुपती बालाजी रुपात भोळेबाबांची पूजा करताना दिसून येतात. मनात कुठलीही शंका न ठेवता आपल्या इच्छापूर्ती सांगितल्या प्रमाणे 5 सोमवार हे पशुपती व्रत जरूर करून पहा. मग फरक बघा.!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular