Monday, July 15, 2024
Homeआध्यात्मिकफक्त रात्री झोपण्यापूर्वी उशीच्या खाली ठेवा 'ही' एक वस्तू बिघडलेलं नशिब सुद्धा...

फक्त रात्री झोपण्यापूर्वी उशीच्या खाली ठेवा ‘ही’ एक वस्तू बिघडलेलं नशिब सुद्धा मोत्यासारखं चमकणार.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, जर तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नसेल, तुमच्या घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा टिकत नसेल किंवा तुमच्या घरात लोक वारंवार आजारी पडत असतील. तर या सगळ्या गोष्टींसाठी एक साधा सोपा उपाय त्याला आपण टोटका म्हणूया. तर तुम्ही हा टोटका करू शकता.

मित्रांनो टोटका म्हणल की लोक घाबरतात. खरंतर टोटका हा शब्द घाबरण्यासारखं नाही आहे. टोटका याचा अर्थ होतो की अतिशय साधा सोपा उपाय. की जो कोणीही व्यक्ती करू शकतो. आणि ज्याच्यासाठी कोणताही खर्च येत नाही.

मित्रांनो यासाठी आपण रात्री झोपताना जे पाच रुपयाचे नाणे आहे ते तुमच्या घरातील जी कमावती व्यक्ती आहे. तिच्या शरीरावरून सात वेळा फिरवायचा आहे. हे फिरवताना ते तुम्ही घड्याळाच्या दिशेने फिरवा. आणि त्यानंतर हे पाच रुपयांचे नाणे त्या व्यक्तीच्या उशाखाली ठेवा.

म्हणजे ती व्यक्ती जिथे झोपलेली आहे त्या व्यक्तीच्या उशाखाली हे नाणे ठेवायचं आहे. सकाळी सूर्योदयापूर्वी उठून ते पाच रुपयाचे नाणे घरातील कोणत्याही व्यक्तीने घेऊन जायच आहे. स्मशानाच्या बाहेर हें नाणे फेकून द्यायचा आहे. लक्षात घ्या आपण स्मशानभूमी मध्ये प्रवेश करण्याची गरज नाही. आणि नंतर परत आपल्या घरी माघारी यायचे आहे.

आपल्या घरी येऊन स्नान वगैरे आटपायचे आहे. देव दर्शन वगैरे घ्यायच आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री झोपताना एक विलायची उशीखाली ठेवून त्या व्यक्तीने झोपायचे आहे. सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठायचं आहे आणि ही विलायची आपल्या घराबाहेर फेकून द्यायची आहे.

फक्त घराबाहेर फेकून द्यायचे आहे. तर असा साधा सोपा उपाय आपण सात दिवस रिपीट करायचा आहे. म्हणजे हे पाच रुपयाचे नाणे आपण एकदाच फेकून देणार आहोत. मात्र विलायची आपल्याला सात दिवस फेकून द्यायची आहे हा झाला उपाय.

ज्यांच्या घरी पैसा टिकत नाही. पैसा येत नाही, नशीब साथ देत नाही. मित्रांनो जर तुमच्याकडे भरपूर पैसा आलेला असेल पण तुमचं आरोग्य जर चांगले नसेल तर त्याचा काहीही फायदा होत नाही. कारण ज्याचं आरोग्य चांगले नाही ज्याची तब्येतच चांगली नाही. तो माणूस कोणत्याही पैशाचा उपभोग घेऊ शकत नाही. त्याला कोणत्याही प्रकारची सुख मिळत नाहीत.

आणि म्हणून मित्रांनो तुमच्या घरी कोणी आजारी व्यक्ती असतील, वारंवार आजारी पडत असतील एखादा असा रोग झाला आहे की बराच होत नाही आहे. तर मित्रांनो तुम्ही वैद्यकीय उपचार तर घ्याच, डॉक्टरांचा सल्ला घ्या, औषध उपचार करा. हा जो उपाय आम्ही सांगितलेला आहे तो तुम्ही त्या आजारी व्यक्तीसाठी अवलंबून पहा.

त्या व्यक्तीची आत्मिक शक्ती वाढते. त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. धार्मिक उन्नती होते. म्हणून मित्रांनो जर तुमचं मन खंबीर असेल, तर तुम्ही सुद्धा त्या आजारातून बरे होऊ शकता. आणि म्हणून हा उपाय त्या आजारी व्यक्तीसाठी सुद्धा करा.

तुम्हाला असे दिसेल की त्या व्यक्ती आजारातून लवकर बऱ्या होतात. आणि वारंवार आजारी पडण्याचे जे कारण असतं ते सुद्धा कमी होतं. तर असा हा साधासुधा उपाय टोटका नक्की करून पहा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular