Saturday, December 2, 2023
Homeआध्यात्मिकगुरुचरित्रातील या 2 अध्यायांचे करा वाचन.. मनोकामना निश्चितच पूर्ण होतील…

गुरुचरित्रातील या 2 अध्यायांचे करा वाचन.. मनोकामना निश्चितच पूर्ण होतील…

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… श्री गुरुदेव दत्त.. गुरु दत्तात्रयांच्या चरणी प्रत्येक जण नतमस्तक होतो कारण गुरू दत्तात्रय सर्वांचे अधिष्ठान आहेत. याच गुरू दत्त महाराजांच्या गुरु कार्याची महिमा आपण सर्वत्र पाहत असतो. दत्त दर्शनासाठी आपण श्री क्षेत्र गाणगापूर, श्री क्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी आपण जात असतो.

आपल्या मनातील इच्छा आशा-आकांक्षा पूर्ण करण्यास गुरुदेव दत्त चालना देतात, आशीर्वाद देतात. प्रसन्न होऊन अनेकांचे जीवन सुखी करतात. म्हणून भगवान दत्तात्रयांचे चरणी वंदन करतो. गुरुदत्तात्रयांची कृपा आपल्यावर सदैव राहो अशी प्रार्थना करतो.

आज आपण या भागात गुरुचरित्र पारायण केल्याने कोणकोणते लाभ होतात हे बघणार आहोत. गुरुचरित्र पारायण आपण नेहमीच करत असतो. गुरुचरित्र पारायण केल्याने मनशांती मिळते, आपले सर्व दुःख दूर होते.

आपल्यावर सुखाची बरसात होते. म्हणून सर्वजण गुरु पारायण आवर्जून करत असतात. या गुरुचरित्रामधील चौदावा आणि अठरावा अध्याय अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो अत्यंत श्रद्धेने वाचावा. हा अध्याय वाचल्यावर तुम्हाला नक्कीच प्रचिती येते.

अध्याय वाचल्याने तुमच्या जीवनात अनेक बदल पाहायला मिळतील. गुरुचरित्रातील चौदावा अध्याय तुम्ही श्रद्धेने वाचल्यास तुम्हाला याचे लाभ नक्की मिळतात. गुरुचरित्रातील 14 वा अध्याय वाचल्यामुळे आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात.

तुम्ही मनात कोणतीही चांगली इच्छा धरली असेल, जी दिवसेंदिवस पूर्ण होत नसेल, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ती इच्छा पूर्ण होत नसेल, तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथातील 14 वा अध्याय मनोभावे वाचन करा. असे केल्याने तुम्हाला नक्कीच फरक पडेल.

गुरुचरित्रातील अठरावा अध्याय तुम्हाला सुख शांती समृद्धी मिळण्यासाठी खूप लाभदायक आहे. जर तुमच्याकडे पैसा आहे धन आहे संपत्ती आहे मात्र तुमच्या घरात सुख नसेल तर त्या धनसंपत्तीला काहीच किंमत नसते. त्यामुळे तुमच्या घरात सुख नांदायचे असेल.

घरामध्ये शांतता हवी असेल तर मात्र तुम्हाला अठरावा अध्याय मनःपूर्वक वाचावा लागेल. 18 वा अध्याय वाचल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी याचा अनुभव तुम्ही घेऊ शकाल. आता गुरुचरित्राचे पारायण कधी करावे असा तुमच्याकडे प्रश्न असेल तर गुरुचरित्राचे पारायण गुरुवारपासून सुरु करावा.

गुरुचरित्र पारायण करताना 14 वा किंवा अठरावा अध्याय दर गुरुवारी किंवा दररोज ही वाचू शकता. त्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. ज्यामुळे तुम्हाला सुखसमृद्धी शांती तर मिळेलच, पण तुमच्या मनातल्या इच्छाही पूर्ण होतील.तुमचे जे संकल्प आहेत, मनामध्ये इच्छा आहेत त्या मनामध्ये संकल्प करून तीर्थ सोडायचे आहे.

नंतर श्रद्धापूर्वक अध्यायांचे पठण करायचे आहे. मित्रांनो तुम्ही कोणतेही काम करताना तुमच्या कष्टाबरोबरच गुरूंची साथ देखील महत्त्वाची असते. कारण ज्या कामांमध्ये गुरू असतात गुरूंचा वास असतो ते काम नेहमीच चांगले होते. कारण गुरु नेहमीच आपल्याला चांगली वाट दाखवतात.

म्हणून गुरुचे पाठबळ आपल्याला मिळावे यासाठी गुरुचरित्र पारायण तुम्ही जरूर करा. कारण गुरु हा परमात्मा परमेश्वर आहे आणि गुरु ज्यांच्यावर प्रसन्न आहेत त्यांना आयुष्यात काहीच कमी पडत नाही हा अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच गुरुचरित्राचे पारायण करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेयर करा. धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular