Saturday, June 15, 2024
Homeराशी भविष्यGajkesari Yoga Aug 2023 गजकेसरी आणि त्रिकोण राजयोगामुळे चार राशींचं नशिब फळफळणार,...

Gajkesari Yoga Aug 2023 गजकेसरी आणि त्रिकोण राजयोगामुळे चार राशींचं नशिब फळफळणार, कोणत्या राशी ते जाणून घ्या..

Gajkesari Yoga Aug 2023 गजकेसरी आणि त्रिकोण राजयोगामुळे चार राशींचं नशिब फळफळणार, कोणत्या राशी ते जाणून घ्या..

(Gajkesari Yoga Aug 2023) नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. ऑगस्ट महिना सुरु झाला असून ग्रह ताऱ्यांची आपल्या काय कृपा असेल याचा अंदाज घेतला जात आहे. या महिन्यात दोन शुभ योग असून चार राशींना फायदा होईल. ऑगस्ट महिन्यात ग्रहांच्या स्थितीमुळे दोन शुभ योगांची स्थिती तयार होत आहे. ग्रहांची स्थिती आणि स्थान यावर शुभ अशुभ योग तयार होत असतात. कोणत्या स्थानात आहे आणि काय फळ देणार यावरून राशी ठरवल्यात.

चंद्राचा गोचर वेग अधिक असल्याने गजकेसरी योग जुळून येतो. या महिन्यात चार वेळा गजकेसरी योग आणि त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. (Gajkesari Yoga Aug 2023) ग्रहांच्या शुभ स्थितीचा राशीचक्रावर सकारात्मक परिणाम होईल. त्रिकोण राजयोगामुळे कठीण काळातही व्यक्तीला उत्तम साथ मिळते आणि जीवनशैली बदलून जाईल. ग्रहांच्या या स्थितीचा जातकांना फायदा होणार आहे.

हे सुद्धा पहा : Horoscope Jupiter Retrograde Aries Sign 21 वर्षांनंतर वक्री होणार देव गुरु बृहस्पति.. या 3 राशींच्या लोकांना धनलाभसोबत करिअरमध्ये यश..

या 4 राशींच्या जातकांना होणार या राजयोगाचा फायदा..

मेष रास – शुभ योगामुळे या राशीच्या जातकांना ग्रहांची उत्तम साथ मिळणार आहे. आर्थिक कोंडी या काळात फुटेल. नवीन आर्थिक स्रोत या काळात तयार होतील. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम राहील. (Gajkesari Yoga Aug 2023) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या जातकांना विशेष लाभ मिळेल. आपल्या हातून काही सत्कार्य घडतील. समाजात मानसन्मान वाढेल.

कर्क रास – गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं या काळात पूर्ण होतील. पण काही कठीण प्रसंगही या काळात ओढावू शकतात. पण ग्रहांची स्थिती उत्तम असल्याने संकट पेलू शकाल. वडिलोपार्जित जमिनीचा योग्यरित्या सांभाळ करा. ती विकण्याच्या भानगडीत पडू नका. आरोग्यविषयक तक्रारी या काळात दूर होतील.

तूळ रास – कौटुंबिक वातावरण या काळात एकदम मस्त राहील. कौटुंबिक व्यवसायात प्रगती होताना दिसेल. काही नवीन करार निश्चित होतील. टीव्ही, चित्रपटसृष्टीशी निगडीत लोकांना चांगली कामं हाती पडतील. (Gajkesari Yoga Aug 2023) वैवाहिक जीवनही चांगलं असेल. जोडीदाराकडून उत्तम साथ मिळेल. केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल.

मकर रास – या काळात वाहन खरेदीचा योग जुळून येईल असं ग्रहमान आहे. आईच्या माहेरातून पैसा येऊ शकतो. संपत्ती किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ असेल. वाद होईल असं कोणासोबत वागू नका. शेजारधर्म पाळण्याच्या हातचं सोडून देऊ नका. (Gajkesari Yoga Aug 2023) अन्यथा मोठा फटका बसू शकतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular