Saturday, May 25, 2024
Homeवास्तूशास्त्रघरामध्ये 'हे' सर्व घडत असेल तर, समजून जा.. वास्तूमध्ये आहे अशुभ शक्तींचा...

घरामध्ये ‘हे’ सर्व घडत असेल तर, समजून जा.. वास्तूमध्ये आहे अशुभ शक्तींचा वास.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आपण ज्या वास्तुमध्ये राहतो, ज्या घरामध्ये राहतो मग ते घर भाड्याचे असेल, स्वतः असेल ती वास्तू आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे असते. तुम्ही अनेक वेळा अनुभवला आले असेल आपण एखाद्या आलिशान बंगल्यात गेलो तरी सुद्धा त्या घरात प्रवेश करताच आपल्याला बेचैन होतं. आपल्याला करमत नाही. परंतु एखाद्या छोटस घर असेल अगदी झोपडी असेल तरीसुद्धा त्या घरांमध्ये जातात आपल्याला प्रसन्न वाटतं.

आपलं मन प्रफुल्लित होतं. प्रसन्न होतं. याचं कारण म्हणजे त्या वास्तुमधील सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा. जर, वास्तूमध्ये नकारात्मक उर्जा असेल तर, आपलं मन बेचैन होतं. उदास होतं. परंतु वास्तूमध्ये जर सकारात्मक उर्जा असेल तर, मित्रांनो या ठिकाणी जातात आपलं मन प्रसन्न होतं. तुमच्या जीवनामध्ये जर, अनेक संकटे येत आहेत. एकामागून एक समस्या येत आहेत. हाती घेतलेले कोणतेही काम निर्विघ्नपणे पार पडत नसेल.

ते कार्य करण्यामध्ये अनेक अडचणी येत असतील तर, मित्रांनो याचं कारण तुमच्या घरातील तुमच्या वास्तूतील नकारात्मक ऊर्जा किंवा अशुभ शक्तीचा वास असु शकतो. हे ओळखायचं कसं! की, आपल्या वास्तूमध्ये अशुभ शक्तींचा वास आहे की नाही. याची लक्षणे कोणती आहेत? हेच सर्व आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

आपल्या वास्तूमध्ये अशुभ शक्तींचा वास आहे हे आपण कसं ओळखावं. तर, एखाद्या वास्तूमध्ये प्रवेश करताच आपल्याला गुदमरायला लागतं, नाडी जोरात चालते, श्वास घ्यायला त्रास होतो घाम येतो, परंतु घराच्या बाहेर पडतात दुसर्‍याच क्षणी आपण नॉर्मल होतो. अशा वेळी समजुन जा की, त्या घरामध्ये अशुभ शक्तींचा वास आहे. वास्तू जर नेहमी ओली राहत असेल, घरात कुबट वास येत असेल, पावसाळ्यात अनेक घरांमध्ये हा प्रॉब्लेम येतो. पण काही घरांमध्ये वर्षभर बाराही महिने असा वास येत असतो.

अशा घरात ही नकारात्मक ऊर्जा आहे. असं समजावं. मित्रांनो, या घरात मांजरांचा खूप जास्त प्रमाणात वास येतो तर, हे सुद्धा घरामध्ये अशुभ शक्तिचा वास असल्याचे समजले जातात. आपण झाडावर किंवा बाहेर मधमाशांचे पोळे असतं. परंतु हेच मधमाशांचं पोळं आपल्या घरात असेल, मधमाशांनी आपल्या घरामध्ये पोळा बनवलेल्या असेल तर, समजून जा की, तुमच्या घरामध्ये अशुभ शक्तींचा वास आहे.

त्याचप्रमाणे मित्रांनो, घरात जण वारंवार लाल मुंग्या होत असतील तर, हे सुद्धा घरात नकारात्मक ऊर्जा असल्याचे लक्षण आहे. जर घरामध्ये काळा मुंग्या असतील तर हे शुभ मानलं जातं. त्यानंतर एखाद्या घरामध्ये प्रवेश करतात तर, आपलं मन अस्थिर होत असेल. कसलीतरी भीती वाटत असेल. मन अस्वस्थ राहत. मन उदास होतं. सतत कसलीतरी भीती आपल्याला वाटत राहते.

अशा वेळी समजावे की, त्या वास्तूमध्ये अशुभ शक्तींचा वास आहे. अनेक ठिकाणी असंही होतं की, कारण नसताना घरात सहज चालताना देखील आपला पाय घसरतो. वारंवार व्यक्ती पडत राहतात. वारंवार घरातील सदस्य आहे ते आजारी पडतात. घरातील सदस्यांना शारीरिक इजा होत राहतात. हे सुद्धा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असल्याचे लक्षण आहे. तुमचे हे घरामध्ये जर ह्या गोष्टी वारंवार घडत असतील तर, समजुन जा की, त्या वास्तूमध्ये अशुभ शक्तीचा वास आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular