Sunday, December 10, 2023
Homeवास्तूउपायघरात पैसा टिकत नसेल तर.. घरातील महिलांनी यापैकी एक उपाय करा.!!

घरात पैसा टिकत नसेल तर.. घरातील महिलांनी यापैकी एक उपाय करा.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो, आज आपण घरात पैसा टिकत नसेल, सतत आजारपण येत असेल, आपल्या अडचणी संपत नसतील समजून घ्या की आपल्या घरातील वास्तूदोष कारणीभूत आहे. वस्तूदोष का निर्माण होतो, तो कसा घालवायचा यासाठी घरच्या घरी करता येणारे साधे आणि सोपे असे 5 उपाय सांगणार आहोत.

आपल्या घरात सकारात्मक आणि नाकारत्मक ऊर्जा वावरत असते. घरात वाद, कटकटी , आजार वाढत असतील तर नाकारत्मक ऊर्जेमुळे सकारात्मक ऊर्जा कमी होत असते. आपल्या घराचे चुकीचे बांधकाम, चुकीची रचना यामुळे हे दोष निर्माण होतात. त्यासाठी हे 5 उपाय घरातील स्त्रियांनी नक्की करा तुमच्या अडचणी दूर होतील.

मित्रांनो यातील पहिला उपाय आहे, स्वस्तिक – स्वस्तिक हे शुभ चिन्ह, मंगल चिन्ह मानले जाते. हे स्वस्तिक घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर रेखाटायचे आहे. ते कसे रेखाटयाचे आहे त्याचे थोडेसे नियम आहेत. पुरातन हिंदू शास्रत आहे की मुख्य दरवाजावर स्वस्तिक रेखाटायचा आहे, असे 9 अंगुळ लांबी आणि 9 अंगुळ रुंदी याप्रमाने माप घेउन सिंदुर किंवा लाल कुंकू घेउन मुख्य दरवाजावर हे स्वस्तिक रेखटावे त्यामुळे घरात येणारी नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. तुमच्या पैशासंबंधी अनेक अडचणी दूर होतात.

त्यानंतरचा उपाय म्हणजे हा उपाय आपल्या घरातील मुख्य भाग असणाऱ्या किचन किंवा स्वयंपाक घराशी संबंधित आहे. सुख- समृद्धीचा आणि किचनचा फार मोठा संबंध असतो . आपले किचन जर वास्तुशास्त्र नुसार चुकीच्या ठिकाणी असेल तर हा उपाय करा. वास्तुदोष नक्की दूर होईल.

आपल्या किचन मधील आग्नेय दिशा आग्नेय दिशा म्हणजे पूर्व-पश्चिम दिशा यामधील असणार कोपरा म्हणजे आग्नेय दिशा. या आग्नेय कोपऱ्यात एक कुठल्याही प्रकारचा बल असला तरी चालेल हा बल सकाळ संध्याकाळी काही वेळ सतत चालु ठेवावा. हा उपाय केल्याने घरातील वास्तुदोष कमी होतात.

तिसरा उपाय आहे काळ्या घोड्याची नाळ. ही काळ्या घोड्याची नाळ आपोआप पडलेली असावी. जबरदस्तीने काढलेली नसावी. ही काळ्या घोड्याची नाळ आणून आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर लावावी. घरात येणारी नकारत्मक ऊर्जा कमी होते. घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते.

असे केल्याने परिणामता वास्तुदोष कमी होतो. मित्रांनो त्यानंतरच्या उपाय आहे कचरापेटी संबंधित,आपण घरातील कचरा एकत्र करून ज्या कचराकुंडीत टाकतो ती कचरा कुंडी काहीजण मुख्य दरवाजाच्या समोरच ठेवतात. घराच्या मुख्य दरवाजातून सकारात्मक ऊर्जा येत असते.

मित्रांनो जर कचरा कुंडी मुख्यदरवाज समोर ठेवली तर नकारत्मक ऊर्जा घरात येउन वास्तुदोष निर्माण होतो. ही कचराकुंडी घराचा मुख्य कोपरा असणाऱ्या ईशान्य कोपऱ्यात अजिबात ठेवु नये. त्यानंतर चा उपाय आहे तो म्हणजे रामचरित्रमानस याचे वाचन करणे, मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार जर घरात वादविवाद, आजार वाढत असतील..

घरात सुख-शांती नांदत नसेल तर सतत 9 दिवस रामचरित्रमानस दिवसातून 1 वेळा असा सतत 9 दिवस पाठ करावा. हा पाठ करताना संपूर्ण कुटूंब एकत्र बसावे. हा उपाय करून आपण आपल्या जीवनातील वास्तु दोष दूर करू शकतो यामुळे घरात सुख-समाधान येते.

त्याचबरोबर आपल्या घरात येणारे धन पैसा संपत्ती ही आपल्या घराच्या उत्तर दिशेला ठेवावी, कारण उत्तर दिशा की कुबेर देवतेची दिशा आहे म्हणूनच या ठिकाणी धनसंपत्ती ठेवल्याने त्यामध्ये वाढ होत राहते, त्याचबरोबर आपण जर उत्तर दिशेलाच एखादा तुपाचा दिवा लावला तरी यामुळे ही माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि यामुळे आपल्या घरात आर्थिक अडचणी दूर होतात.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे सादर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर ही नक्की करा धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular