Monday, June 10, 2024
Homeआध्यात्मिकघरात सुख समृद्धी आणि भरभराटी हवी असेल तर.. श्रावणाची सुरुवात होण्यापूर्वी घरातून...

घरात सुख समृद्धी आणि भरभराटी हवी असेल तर.. श्रावणाची सुरुवात होण्यापूर्वी घरातून या 4 वस्तूंना बाहेर करा.!!

आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे… श्रावण मास व्रतं वैकल्यांचा महिना महादेवांचा पावन आणि शुभआशिषांचा वर्षाव करणारा महिना.. हा पावन श्रावण मास सुरू होण्यापूर्वी तुम्ही या चार गोष्टी घरातून बाहेर काढायच्या आहेत. गरिबी दारिद्र्य कायमचे निघून जाणार आणि तुमच्या घरात कधीही आर्थिक चणचण भासणार नाही. साधारणपणे आपल्याला अशी सवय असते की, आपण कोणताही मोठा सण असतो… तेव्हा घराची साफसफाई किंवा नुतनीकरण करतो.

जसे की दिवाळी-दसरा अशावेळी परंतु मित्रांनो श्रावण महिना हा वर्षातला सर्वात पवित्र महिना मानला गेला आहे. या महिन्यापासूनच आपले सर्व हिंदू सण वार सुरू होत आहेत. आणि म्हणून श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी घरातील या चार वस्तू नकारात्मकता, दरिद्री, आणि घरात वाईट शक्ती पसरवतात. आणि मित्रांनो म्हणून या गोष्टी तुम्ही लगेच घरातून बाहेर काढा. या वस्तू जर आपण घरात ठेवल्या तर घरात नकारात्मकता वाढत असते.

यामध्ये पहिली वस्तू म्हणजे जुने तुटलेले, फुटलेले भांडे मग ते कोणतेही असतील. काचेचे किंवा स्टील कोणतेही असो पण जे तुम्ही सांभाळून ठेवले असाल की पुढे मागे काम येतील तर असे करू नका. तुटलेल्या भांड्यामध्ये राहू केतू चा वास असतो. नकारात्मकता वाढते, म्हणून श्रावण महिना येण्याआधी हे तुटलेले भांडे तुम्ही बाहेर काढून टाका.

दुसरी वस्तू म्हणजेच खंडित मूर्ती किंवा तुटलेले, किंवा ते कागदी फोटो असतील तर ते फाटलेले फोटो जे आपल्या देवघरात असतात किंवा काही लोकांच्या देवघरात असतात. पण लोक तरी ते देवघरात ठेवून त्या फोटोची किंवा मूर्तीची पूजा करतात. पण हे अगदी चुकीच आहे. आपण त्या मूर्तीच किंवा फोटोच विधिवत पूजन करून त्यांचे विसर्जन करावे व त्याच्या जागेवर नवीन फोटो आणून तो आपल्या देवघरात स्थापन करावा. तुम्ही खंडित मूर्ती कोणत्या मंदिरात जाऊन ठेऊ सुद्धा शकतात.

तिन नंबरची गोष्ट म्हणजे जुने कपडे जे आपण घरात ठेऊन असतो की, कोणीतरी मागायला येतील. तेव्हा देऊ किंवा या कपड्यांच्या मोबदल्यात काही वस्तू मिळतील अस काहीतरी असत. कपड्यांमध्ये सुद्धा नकारात्मकता आणि दरिद्री असते. तर ही दरिद्री तुम्हाला बाहेर काढायची आहे तर त्या कपड्यांना सुद्धा तुम्हाला बाहेर काढावे लागेल.

तसेच चार नंबर ची गोष्ट म्हणजे बंद पडलेलं इलेट्रॉनिकचे कोणतेही सामन त्यामध्ये बंद पडलेलं घड्याळ असेल, रेडिओ असेल किंवा एखादा मोबाईल अशा कोणत्याही वस्तू असतील ज्या बंद पडलेल्या आहे. पण आपण तर घरात ठेवलेले असतात. खास करून घड्याळ जर बंद पडलेलं असेल तर असे बंद असलेलं घड्याळ घरात ठेवल्यास नकारात्मक शक्तींचावास वाढतो. म्हणून असे घड्याळ नाही वापरले पाहिजे.

त्याच बरोबर इतर कोणतीही बंद पडलेली इलेट्रॉनिक वस्तू घरांशमध्ये ठेवू नका. तर तुम्ही सुद्धा या 4 वस्तू घरात कदापि ठेवायच्या नाहीयेत, अशा नकारात्मक ऊर्जेचा स्रोत असलेल्या या वस्तु श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी त्या लगेचच घराच्या बाहेर काढायच्या आहेत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हा ला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular