Friday, July 12, 2024
Homeआध्यात्मिकघरामधील कटकटी, भांडण, कलह थांबवण्यासाठी कोणत्याही दुर्गाष्टमीला 64 योगिनी यंत्र नक्की लावा.!!

घरामधील कटकटी, भांडण, कलह थांबवण्यासाठी कोणत्याही दुर्गाष्टमीला 64 योगिनी यंत्र नक्की लावा.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! प्रत्येक महिन्यामध्ये दुर्गाष्टमी ही येत असते पण या महिन्यातली दुर्गाष्टमी जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि खूप शुभ आहे कारण त्या दिवशी गुरुवार सुद्धा आहे. अखंड नामजप सप्ताह सुरू होतोय. मार्गशीर्ष महिना पण चालू आहे त्यामुळे मार्गशीष गुरुवार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की दुर्गाष्टमीला आपण देवी आईची जास्तीत जास्त सेवा करत असतो.

दुर्गाष्टमीला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर अशी एक गोष्ट लावायची आहे आणि अत्यंत प्रभावी हे यंत्र आहे तर त्यामुळे आपल्या घरातला कुठली पण कसली पण नजर नजर दोष असणे, वाईट बाधा असेल तर ती नाहीशी होते आणि हे यंत्र लावल्यामुळे कुठली पण नजर दोष वगैरे जे असतात वाईट नजर किंवा करणी बाधा, त्यानंतर निगेटिव्हिटी हे आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि हे अतिशय महत्त्वाच आहे.

उद्या दुर्गाष्टमी आहे तर दुर्गाष्टमीला उद्या तुम्हाला जर मंगल कलश स्थापित करायचा असेल तर तुम्ही करू शकता. उद्या दुर्गाष्टमी आहे उद्या मार्गशीर्ष गुरुवार आहे त्यानंतर अखंड नामजप सप्ताह सुरू होतोय उद्याचा दिवस अतिशय शुभ आहे तर तुम्ही मंगल कलश ची स्थापना करू शकता. यानंतर तुम्ही श्री यंत्रावर सुद्धा कुंकू मार्जन करू शकता. आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो तो खूप महत्त्वाचा असतो. आपल्या घराच्या मुख्य दरवाजातूनच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी बाहेर येत जात असतात.

कोणी पण आपल्या घरामध्ये जेव्हा पाहुणे येतात अनोळखी व्यक्ती कोणीही असेल तर ते आपले मुख्य दरवाजामधून आपल्या घरामध्ये येत असतात आणि कुठली व्यक्ती कुठल्या विचाराने आपल्या घरामध्ये येते, तिच्या मनात आपल्याबद्दल खरंच चांगले विचार आहे का वाईट विचार आहे का हे आपण सांगू शकत नाही तर त्यामुळे हे यंत्र आम्ही तुम्हाला सांगत आहे.

तर ही गोष्ट जर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाला लावली तर बाहेरचा माणूस कुठल्याही प्रकारचा विचार करून घरात आला तरी त्याचा आपल्या घरातल्यांवर आपल्या घरावर त्याचा परिणाम होत नाही आणि परिणामी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असल्यामुळे पॉझिटिव्ह असल्यामुळे आपल्या घरामध्ये सगळं चांगलं होत आणि जरी दुःख आले तरी त्या दुःखातून आपण लवकर बाहेर पडतो.

कारण हे बघा सुख मागून दुःख दुःख मागून सुख हे येतच असतं पण कुणी दुःखाचा एवढा डोंगर घेऊ येऊ नये की घरातलं सगळं संपून जाईल अगदी अस व्हायला नको तर त्यामुळे जरी दुःख आले तरी त्यावर आपण मात करून परत पुढे जाऊन आपण आनंदाने परत जगू शकू असं आपल्या घरामध्ये एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये राहिली पाहिजे तर हे बघा हे 64 योगिनी यंत्र आहे. हे यंत्र दुर्गाष्टमीच्या दिवशी पूजा करून दुकानाच्या किंवा घराच्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूस लावणे दर दुर्गाष्टमीच्या दिवशी याची पूजा करणे हे महत्वाचे आहे.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular