Thursday, December 7, 2023
Homeराशी भविष्यगुणवान आणि भाग्यशाली महिलांच्या शरीरावर असतात या खुणा.!! - समुद्रशास्त्र

गुणवान आणि भाग्यशाली महिलांच्या शरीरावर असतात या खुणा.!! – समुद्रशास्त्र

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! स्त्री शिवाय घराची आपण कल्पनाच करू शकत नाही. घरातच काय तर या सृष्टीची ही कल्पना स्त्री शिवाय करू शकत नाही. असे म्हणतात की, एखादा घराला स्वर्ग बनवायचे की नर्क हे स्त्रीच्या हातात असते. घरातील सुख समृद्धी प्रसन्नता व पवित्रता स्त्री वरच अवलंबून असते. विवाह पूर्वी प्रत्येक स्त्री किंवा पुरुषाच्या मनात आपल्या जोडीदारा बद्दल काही कल्पना आखलेल्या असतात.

प्रत्येक स्त्रीला असे वाटत असते की, तिच्या नवऱ्याने तिच्यावर खूप प्रेम करावे. तिची काळजी घ्यावी. तर, प्रत्येक पुरुषाला असे वाटत असते की, तिच्या बायकोने त्याच्या सर्व घराची जबाबदारी घ्यावी व ती योग्य रीतीने पार पाडावी. ती सद्गुणी व सदाचारी असावी. च’रित्रवान असावे. मोठ्यांचा आदर व मानसन्मान करणारी असावी. परंतु विवाहापूर्वी आपण कोणाचा स्वभाव ओळखू शकत नाही.

आजच्या या लेखामध्ये आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत कि, ज्या गोष्टी आपल्याला समजल्या तर आपल्याला कळते की, ती स्त्री गुणवान आहे की नाही. शास्त्रामध्ये काही श’रीराच्या अवयवांचा आधारे माहिती देण्यात आली आहे की, ज्या वरून आपण एखाद्या स्त्रीचे गुण व अवगुण माहिती करून घेऊ शकतो.

ज्या स्त्रीचे केस काळेभोर दाट व लांब असतात. अशा स्त्रिया खूप भाग्यशाली असतात. असे केस सुख, समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणून अशा स्त्रिया सुख समृद्धीचे प्रतीक आहेत असे म्हणतात. अशा स्त्रीशी विवाह करणारे पुरुष जीवनात नेहमी यशस्वी संपादन करत असतात. गोल चेहरा, मोठमोठे डोळे अशा स्त्रिया आपल्या पतीला कधीच फसवत नाही. अशा स्त्रियांच्या घरांमध्ये कधीही भांडण-तंटे व वादविवाद होत नाहीत.

ज्या स्त्रियांचे कपाळ उंच असते अशा स्त्रिया खूप भाग्यशाली असतात. जा स्त्रियांचा नाकाच्या शेंड्यावर तीळ असते. अशा स्त्रिया खूप भाग्यशाली असतात. अशा स्त्रियांमुळे त्यांच्या सासरी व माहेरी दोन्ही ठिकाणी सुख-समृद्धी येते. ज्या स्त्रियांचे दात एका सरळ रेषेत असतात,ओठ गुलाबी असून त्यावर तीळ असते. अशा स्त्रिया खूप भाग्यशाली असतात व आपल्या जीवनामध्ये खूप यश संपादन करीत असतात. मान पातळ, उंच असते अशा स्त्रिया आपल्या जीवनामध्ये खूप सुख अनुभवत असतात.

त्यांच्या पतीच्या ही व्यापारामध्ये खूप यश संपादन करीत असतात. जा स्त्रियांचे हात लांब असतात, बोटे लांब व बारीक असतात व तळ हात गुलाबी रंगाचे असतात अशा स्त्रिया पैसे खर्च जास्त प्रमाणात करत नाही. त्या पैशांची बचत करत असतात. जा स्त्रियांचे पाय लांब पायाची बोटे जवळजवळ असतात. अशा स्त्रिया खूप भाग्यशाली असतात.अशा प्रकारे स्त्रियांच्या अवयवांवरून त्यांचे गुण जाणून घेतले जातात.

असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. प्रत्येक पुरुषाला वाटते की जी स्त्री आपल्या घरी लग्न करून येईल ती भाग्यशाली असावी. ज्यामुळे आपले घर स्वर्ग व्हावे आपल्या घराची आपल्या घरातील सदस्यांची तिने चांगली काळजी घ्यावी व आपल्या जीवनात आनंदी आनंद असावा. काहींच्या बाबतीत हे खरे होते त्यांच्या घरात येणारी स्त्री हे आनंद घेऊन येते.

मग घरातील वातावरण अगदी निर्मळ होते भविष्यपुराणात अशा स्त्री बद्दल काही लक्षणे सांगितलेले आहे की, ते ज्या घरात जातात त्या घराला स्वर्ग बनवतात. त्यातील पहिल लक्षण म्हणजे धर्म मार्गावर चालणारी स्त्री म्हणजे जी स्त्री संध्याकाळ होताच देवाजवळ किंवा तुळशीजवळ दिवा लावते व त्यांच्या पाया पडते. सोबतच स्वयंपाक झाल्यावर आधी देवाला नैवेद्य देते. मग घरातील सर्व जण भोजन करतात अशी स्त्री मुळे घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते.

घरातील वातावरण शुद्ध व पवित्र होते आणि अशा वातावरणात राहणारे कुटुंब नेहमी आनंदी राहते. दुसरी गोष्ट म्हणजे समाधानी स्त्री जी स्त्री अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर समाधान मानते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करत नाही, त्यामुळे त्यांचा पतीही त्यांच्यावर खूष असतो. काही स्त्रिया आपल्या शेजारी काही वस्तू बघतात आणि ही तीच वस्तू आपल्या घरात आली पाहिजे अशी नवर्‍याकडे मागणी करतात.

त्याच बरोबर ज्या स्त्रियांचे चेहरे आपला वडिलांशी चेहऱ्याची मिळते जुळते असतात त्या स्त्रिया पण खूप भाग्यशाली असतात. अशा स्त्रिया खूप प्रेमळ असतात व त्या आपला संसार खूप सुखाने करत असतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular