Thursday, April 18, 2024
Homeआध्यात्मिकगुरुंनी सांगितल्याप्रमाणे पारायण केले, 2 दिवसांत स्थळही चालून आले.. लग्न ठरले.. गुरुंचे...

गुरुंनी सांगितल्याप्रमाणे पारायण केले, 2 दिवसांत स्थळही चालून आले.. लग्न ठरले.. गुरुंचे ऐकल्यावर फळ कसे मिळते.?

गुरुंनी सांगितल्याप्रमाणे पारायण केले, 2 दिवसांत स्थळही चालून आले.. लग्न ठरले.. गुरुंचे ऐकल्यावर फळ कसे मिळते.?

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… स्वामी आपल्या पाठीशी सदैव असतात. आपल्याला कृपेचा आशीर्वाद देतात. त्यांच्या दर्शनाने आपले सर्व काम ठीक होते, फक्त आपली स्वामींवर नितांत श्रद्धा असली पाहिजे. (Guru Mauli) स्वामी आपल्याला विविध संकेत देत असतात. विविध रूपाच्या माध्यमातून चुकीच्या मार्गावर जाताना थांबवत असतात. ते संकेत ओळखले तर आपण आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो.

आपण स्वामींचे विविध अनुभव घेत असतो. मात्र ते आपण इतरांना सांगणे हे आपले कर्तव्य आहे. कारण आपल्या गुरूंच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करणे ही आपली जबाबदारी आहे. कारण तुम्हाला आलेले अनुभव इतरांना सांगितल्याने इतर लोकांनाही त्याचा लाभ होईल व आपल्या हातून गुरुकार्य घडेल. असाच अनुभव.

हे वाचा : दर मंगळवारी घराच्या मुख्य द्वारावर शिंपडा या वस्तुने बनलेलं मिश्रण.. नजर, बाधा लागणार नाही.!!

आम्ही सर्व कुटुंब स्वामींच्या कृपाशीर्वादाने स्वामींच्या सेवेत आहोत. प्रत्येक गोष्ट करताना स्वामींचा आदेश गुरुमाऊलींचा आदेश प्रमाण मानूनच आम्ही करत असतो. (Guru Mauli) असाच एक आलेला अनुभव सांगणार आहोत.

माझ्या मुलाच्या लग्नासाठी मुलगी बघण्याचे काम सुरू होते. मात्र काही केल्या योगच येत नव्हता. खूप देवांना जाऊन आलो पूजा केली काही सुद्धा साध्य झालं नाही. शेवटी श्रीमद भागवत पारायण करून घरी आलो. तसेच मासिक सत्संगाला जाऊन परत आलो.

यानंतर चमत्कार असा झाला की एका नातेवाईकांनी फोन करून सांगितले, तुमच्या मुलाला एका मुलीचे स्थळ आले आहे. हे ऐकून खूप आनंद झाला. यानंतर त्या मुलीची माहिती घेऊन या असे त्यांना सांगितले. यानुसार त्यांनी त्या मुलीची माहिती आणली.

यानंतर ती मुलगी योग्य वाटली.पाहण्याचा कार्यक्रमही झाला. मुलाला मुलगी ही पसंत पडली. मुलीला मुलगा पसंत पडला. यानंतर बोलणे करण्यासाठी मुलीचे आई-वडील व काका आल्यानंतर त्यांनी (Guru Mauli) आम्हाला प्रश्न केला की आता यापुढे कसे करायचे. देणे घेण्याची बोलणे सुरू झाले.

यानंतर त्यांना आम्ही सांगितले की आमच्या गुरुमाऊलीने सांगितले आहे की लग्नात सोने नाणे, मानपाण घ्यायचं नाही. त्यामुळे आम्ही काहीच घेणार नाही. आमच्या गुरुजींचा शब्द आम्हाला प्रमाण आहे आणि आम्ही तो मोडू शकत नाही. आमच्या मुलानेही त्यांना असे सांगितले.

अत्यंत अल्प खर्चात आपण लग्न करूया असे सांगितल्यानंतर ते कुटुंबही तयार झाले. विनाकारण खर्च करू नका हे ऐकून त्या लोकांना खूपच आश्चर्य वाटले. आजही या जगामध्ये असे लोक आहेत हे बघून आनंद वाटला असे त्यांनी उद्गार काढले.

यावेळी त्यांना मी एकच सांगितले, आमच्या गुरुमाऊलींच्या विचाराप्रमाणे चालण्याचे काम आम्ही करत आहोत आणि गुरुमाऊलींनी आम्हाला भरपूर दिले आहे. त्यामुळे गुरुमाऊली सांगतील तसेच वागणे हेच आमचे कर्तव्य आहे. (Guru Mauli) यालाच खरी गुरुसेवा म्हणतात.

या जगामध्ये पैशाने प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही. पैसा हा गरजेचा आहे पण सर्वस्व नाही. तुम्ही मोठे झाल्यानंतर बाळगलेला संयम आणि लहान असताना बाळगलेला प्रामाणिकपणा तुम्हाला यशाच्या शिखरावर नक्की घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही नक्कीच”गुरु वाक्य मंत्र मुलम” याप्रमाणे आचरण करा स्वामी तुम्हाला नक्कीच साथ देतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular