Wednesday, June 12, 2024
Homeआध्यात्मिकगुरुपुष्यामृताच्या शुभ पर्वामध्ये करा हे लाभदायी उपाय.. माता लक्ष्मींचे आशीर्वाद लाभतील.!!

गुरुपुष्यामृताच्या शुभ पर्वामध्ये करा हे लाभदायी उपाय.. माता लक्ष्मींचे आशीर्वाद लाभतील.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो, आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की, गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी ‘गुरुपुष्यामृत’ योग होतो. हा सर्व कार्यास शुभ समजला जातो. या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते असा समज आहे. मात्र हा योग शुभ असला, तरी या दिवशी विवाह करत नाहीत. कारण हे पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे आणि त्याचबरोबर एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो. अशुभता पासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे. आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते.

मित्रांनो 25 ऑगस्ट गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्य अमृत आलेले आहे आणि या दिवशी जर आपण काही उपाय आपल्या घरामध्ये केले तर आपल्याला अनेक अडचणी दूर होऊ शकतात कारण मित्रांनो या नक्षत्रातील प्रमुख देवता बृहस्पती देव आहेत. जे देवांचे गुरु आहेत. हा ज्योतिषातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करून, जमीन, घर, वाहन, सोन्याचे दागिने इत्यादी खरेदी करून शुभ परिणाम प्राप्त होतात. जर तुम्हाला या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला मां लक्ष्मीची विशेष कृपा मिळेल आणि सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील.आणि मित्रांनो गुरुपुष्यामृत योग फार क्वचितच बनतं. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं, त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुवारी शुभ कामे करणे तसेच धार्मिक कार्ये करणे शुभ असते.

गुरु पुष्य योग असेल त्या दिवशी महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि धन संबंधी समस्या सोडविण्यासाठी लक्ष्मी नारायणाची पूजा करावी आणि मित्रांनो या दिवशी पूजा करत असताना आपल्याला पूजेत ‘ॐ श्री ह्रीं श्रीं दारिद्रय‍ विनाशिन्ये धनधान्य समृद्धी देहि देहि नम:’ या मंत्राचा कमलगट्ट्याच्या माळेने 108 वेळा जप करावा. शुभ योगात लक्ष्मी मंत्र जप केल्याने धन प्राप्तीचे योग बनतात. मित्रांनो गुरुपुष्य योगाच्या दिवशी घराबाहेर स्वस्तिक मांडावे आणि दक्षिणावर्ती शंखाची पूजा करावी आणि या शंखाने प्रभू विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो मित्रांनो असे केल्याने अडकलेले धन परत मिळतं.

आणि त्याचबरोबर मित्रांनो जर या दिवशी आपण आपल्या नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी त्याचबरोबर जर आपले दुकान असेल किंवा व्यापार क्षेत्रात पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापित करुन धन व ऐश्वर्याची प्राप्ती होते. असे केल्याने व्यवसायात वृद्धी येते आणि आर्थिक संकटं दूर होतात. नोकरी प्राप्तीसाठी किंवा नोकरीत यश मिळविण्यासाठी गुरु पुष्य योगात पारद लक्ष्मीची पूजा करावी. पारद लक्ष्मीसह आपण एकाक्षी नारळाची पूजा करु शकता. एकाक्षी नारळाला लक्ष्मी देवीचं स्वरुप मानले गेले आहे. या नाराळाची विधीपूर्वक पूजा करुन धन ठेवत असलेल्या ठिकाणी ठेवल्याने घरात किंवा व्यवसायात कधीच पैशांची कमी भासत नाही आणि आपल्या व्यवसायात ही वाढ होत जाईल.

त्याचबरोबर मित्रांनो गुरुपुष्ययोग 25 ऑगस्ट गुरुवारच्या दिवशी आलेला आहे, या दिवशी लक्ष्मी देवीचं चमत्कारिक कनकधारा स्त्रोत आणि लक्ष्मी स्त्रोत पाठ करावा आणि मित्रांनो कनकधारा स्त्रोताचे आदि शंकराचार्य आहे. हे स्त्रोत पाठ केल्याने धनाचा वर्षाव होता. नियमित पाठ केल्याने वैभव व ऐश्वर्य प्राप्ती होते आणि शत्रूंपासून मुक्ती मिळते. आणि त्याचबरोबर मित्रांनो गुरुपुष्यामृत या दिवशी जर आपण नंदीला म्हणजेच बैलाला हिरवा चारा खाऊ घातला तरी यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या अडचणी दूर होतात आणि त्याचबरोबर भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होतं म्हणून तुम्हीही 25 ऑगस्ट गुरुवार या रोजी आलेल्या गुरुपुष्य अमृताच्या दिवशी हा उपाय नक्की करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular