स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो.. आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची लोक आढळतात. काही लोक आपला हेतू साध्य करत असतात. तर काही लोक अगदी मनाने अनेकांना मदत करीत असतात. यामध्ये त्यांचा कोणताही हेतू नसतो. परंतु अशी काही लोक आपल्या आजूबाजूला असतात ज्यांना आपली प्रगती बघवत नाही.
आपण एखादे उंच शिखर गाठणे हे त्यांना कधीच आवडत नाही. त्यांच्या मनात कायमच दुसऱ्या विषयी चुकीची भावना असते. दुसऱ्यांना कमी लेखणे तसेच दुसरे आपल्या पुढे जाऊ नये त्यासाठी प्रयत्नशील राहतात. तर मित्रांनो कोणत्या लोकांपासून आपण दूर राहावे याची आपण माहिती घेणार आहोत. जेणेकरून आपले आयुष्य बरबाद होणार नाही.
मूर्ख माणसं – मूर्ख माणसांपासून आपण चार हात लांबच राहिले पाहिजे. मूर्ख व्यक्तींना आपल्या जवळच्या गोष्टी कधीच सांगू नये. कारण या गोष्टी त्या दुसऱ्या व्यक्तींना लगेचच सांगतात आणि आपली आयुष्य बरबाद होऊ शकते. मूर्ख माणसे अनेक प्रकारची असतात जास्त शिकलेली देखील माणसे ही मूर्ख असू शकतात. मूर्ख लोकांना कधीच ज्ञानाच्या गोष्टी सांगू नये कारण त्यांना ज्ञानाच्या गोष्टी समजतच नाहीत.
व्यसनी माणसं – व्यसनी माणसापासून देखील लांब राहिले पाहिजे. कारण व्यसनी माणसाच्या संगतीत राहिल्याने तुम्हाला देखील त्याचे व्यसन लागू शकते. व्यसनी माणूस आपल्याबरोबरच घरातील लोकांचे देखील आयुष्य बरबाद करते. त्यांना कोणत्याही चांगल्या, वाईट गोष्टीची काहीच किंमत नसते आणि त्यांना चांगले वाईट काहीच कळत नाही. त्यामुळे व्यसनी माणसांपासून देखील चार हात लांबच राहणे योग्य आहे.
तोंडावर गोड बोलणारी माणसं – तोंडावर गोड बोलून आपली कामे करून घेणाऱ्या माणसांपासून देखील लांब राहणे आपल्यासाठी खूपच चांगले आहे. अशी माणसे आपल्या तोंडावर नेहमीच गोड बोलत असतात. आपल्याकडून त्यांची सर्व कामे करून घेतात. कामे झाली की मात्र ते आपणाला विचारतदेखील नाहीत. आपल्याला काही अडचण आली असेल तर त्या अडचणीतून आपणाला बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्नही करत नाहीत. उलट ते आपल्यापासून दूरच राहतात. तर अशा या माणसांपासून कधीही दूर राहणे चांगले आहे.
निगेटीव्ह लोकं – सतत निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांपासून देखील दूर राहणे कधीही चांगले आहे. हे लोक कायमच वेगवेगळ्या विचारांत गुंतलेले असतात. अशा लोकांना सतत शंका घेण्याची सवय असते. तुम्ही जरी चांगले बोललात तरी ते लोक त्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह काढतात. त्यामुळे असे लोक देखील दूर असणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.
अहंकारी लोकं – घमंडी आणि अहंकारी लोक देखील आपले आयुष्य बरबाद करतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणे गरजेचे आहे. अनेक लोकांजवळ काहीच नसते परंतु अशा लोकांना घमंडी पणा जास्त असतो. तर काही लोक पैशांमुळे घमंडी असतात. तर काही जण आपल्या सौंदर्यामुळे घमंडी राहतात. अशा लोकांपासून चार हात दूर राहणे आपल्यासाठी फायदेशीर आहे. कारण लोक तुम्हाला कायमच कमी लेखतील आणि आपली किंमत ही त्यांच्यापेक्षा खूप कमी आहे याची सतत जाणीव करून देतील. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमीच सावध रहा.
भांडकुदळ लोकं – काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण करण्याची सवय असते. अशा लोकांपासून देखील दूर राहणे आपल्यासाठी फायद्याचे ठरते. अशा लोकांसमोर आपल्याला खूप सावधगिरीने बोलावे लागते. कारण आपण जे बोलतो आहोत याचा ते नेमका कोणता अर्थ काढतील हे सांगता येत नाही. भांडखोर व्यक्तींना काहीतरी कारण शोधून भांडण काढण्याची ते वाट पाहत असतात. म्हणून अशा लोकांपासून कधीही दूर रहावे.
खोटारडे लोकं – खोटे बोलणाऱ्या लोकांपासून देखील चार हात दूर राहणे आपल्यासाठी योग्य आहे. कारण ही लोक कधीही खोटे बोलून आपल्या प्रगतीत अडथळे निर्माण करतील याची कल्पना आपणालाही होणार नाही. ही लोक सतत खोटं बोलून आपला हेतू साध्य करण्यात व्यस्त असतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहावे.
तर मित्रांनो तुम्हाला आपल्या प्रगती मध्ये अडथळा निर्माण होऊ नये तसेच आपले आयुष्य व्यवस्थित चालावे यासाठी वर सांगितल्याप्रमाणे या व्यक्तींशी संगत कधीच जोडू नये. या लोकांपासून लांबच राहिलेले आपल्यासाठी चांगले आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!