Sunday, December 3, 2023
Homeआध्यात्मिकस्वामी सेवा करत असाल तर फक्त एक मिनिट ‘हे’ वाचा.!!

स्वामी सेवा करत असाल तर फक्त एक मिनिट ‘हे’ वाचा.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो आपण रोज स्वामींची उपासना करतो पूजा करतो मनोभावे प्रार्थना करतो पण ह्या सेवेमध्ये कुठे तरी काही तरी राहीले आहे आपण स्वामींच्या सेवेमध्ये काहीतरी कमी पडतोय असे वाटत असते. काही तरी चुकत आहे आपण पूजा करताना आपल्याकडून काही तरी राहिले असेल आणि त्यामुळे आपल्याला स्वामींच्या पूजेचे फळ मिळत नाहीए असे आपल्याला वाटत राहते.तशी तर आपण स्वामींची कोणतीही पूजा मनोभावे केली तर आपणाला स्वामींचे आशीर्वाद हे मिळतच असतात आणि आपल्याला आपल्या पूजेचे फळ हे मिळतेच.

त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की स्वामींच्या सेवेचे फळ आपल्याला नक्की मिळतेच तर मित्रांनो म्हणूनच दररोज आपण सकाळच्या वेदना संध्याकाळी जेव्हा मी तुम्हाला शिकवेल त्यावेळी स्वामींचे सेवा आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो.

जर तुम्ही जर नवीन सेवेकरी असाल म्हणजे नुकतीच सेवा करणे सुरु केली असेल तर तुम्ही ह्या गोष्टी फक्त स्वामी सेवेमध्ये करा. मित्रांनो दररोज संध्यकाळी किंवा सकाळी एक वेळ निश्चित करावी समजा सकाळी किंवा संध्यकाळी सात ची एक वेळ कोणतीही ठरवून दररोज त्याच वेळेला स्वामींची पूजा करावी.

तसेच स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम आपण स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत ह्या अध्याचे अध्ययन करावे. अध्ययन करताना दररोज 3 अध्यायन वाचावेतकारण त्यात 21 अध्यायने असतात जेणेकरून तुम्हाला एक आठवड्यासाठी अध्यायने होतील व पुढील आठव्यात पुन्हा नव्याने सुरु करू शकाल.

हे वाचून झाल्यानंतर स्वामींचा तारक मंत्र म्हणावा. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ ह्या नामाचे 11 माळी जप करावा. तर मित्रांनो आपण अशा सोप्या पद्धतीने दररोज किमान 21 दिवसापर्यंत तर ही स्वामींची सेवा करू शकतो, तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने आपण दररोज स्वामींची सेवा करून आपल्याला जे काही हवे आहे ते मिळू शकतो.

परंतु मित्रांनो स्वामींची सेवा ही आपण 21 दिवस किंवा तीन महिने सहा महिने इतक्या कालावधीसाठी करू शकतो परंतु मित्रांनो जर आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल किंवा आपले एखादी काम होत नसेल यासाठी आपण स्वामी सेवा जर करत असो आणि ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर किंवा ते अपूर्ण गोष्ट पूर्ण झाल्यानंतर आपण जर स्वामींची सेवा करणे सोडून दिले.

तेव्हा ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपण स्वामींची पूजा करायची आणि त्याचबरोबर स्वामींचे सेवा करणे स्वामींचा नाम जप करणे जर सोडून दिले तर मित्रांनो याला काही अर्थ नाही कारण याचा अर्थ असा होतो की आपण एका स्वार्थपोटी किंवा आपला हेतू साध्य करून घेण्यासाठी ही स्वामींची सेवा केली असा याचा अर्थ होतो.

मित्रांनो आपली एखादी इच्छा पूर्ण होईपर्यंत स्वामींची सेवा करणे किंवा आपले एखादे काम पूर्ण होईपर्यंत स्वामींचे सेवा करून ते काम पूर्ण झाल्यानंतर सेवेतून निघून जाणे ही खूपच सोपी गोष्ट आहे परंतु मित्रांनो स्वामींचे भक्ती मध्ये टिकून राहणे आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये टिकून राहणे आणि मनामध्ये कोणत्याही पद्धतीचा भाव किंवा इच्छा न ठेवता आपण स्वामींची भक्ती करणे स्वामींची दररोज सेवा करणे पूजा करणे..

खरे स्वामीभक्त किंवा स्वामी सेवेकरी असण्याचे लक्षण आहे कारण मित्रांनो असेच व्यक्तींना स्वामी हे अनुभव देत असतात म्हणजेच कोणत्या ना कोणत्या तरी रूपात येऊन त्यांची मदत करत असतात आणि स्वामी यांच्या पाठीशी सदैव उभे राहतात. आणि त्याचबरोबर मित्रांनो जो फक्त स्वामींची सेवा अगदी मनापासून करतो किंवा कोणत्याही स्वार्थी सेवा करत नाही अशा भक्तावर स्वामींची कृपा कायम राहते.

त्याच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी योग्य आहेत त्या त्या गोष्टी स्वामी त्या भक्ताला देतच असतात आणि त्या भक्ताने किंवा आपण केलेली जी सेवा आहे किंवा जी काही भक्ती त्या भक्ताने केली होती त्या सेवेचे फळ किंवा त्या पूजेचे फळ स्वामी हे त्या सेविकाऱ्याला अगदी व्याजासकट कायम परत देत असतात आणि म्हणूनच मित्रांनो आपण करत असलेल्या स्वामी सेवे मध्ये आपण आपल्या मनामध्ये कोणताही भाव न ठेवता किंवा कोणताही स्वार्थ न ठेवता आपण स्वामींचे सेवा अगदी मनापासून केली पाहिजे.

त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही स्वामींचे सेवा खूप दिवसापासून करत असाल आणि एखादी व्यक्ती स्वामींची सेवा करत नसेल परंतु तरीही ती व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये खूपच यशस्वी झाले असेल किंवा होत असेल तर मित्रांनो या गोष्टीमुळे तुम्ही खचून जाऊ नका किंवा तुमच्या स्वामी सेवेमध्ये या एका गोष्टीमुळे बाधा येऊ देऊ नका..

मित्रांनो तुम्ही फक्त स्वामींचे नामस्मरण आणि स्वामींची सेवा अगदी मनापासून करत राहा तुमच्या सेवेचे किंवा तुमच्या पूजेचे फळ हे स्वामी व्याजासकट तुम्हाला परत करतील आणि तुमच्या घरावर आणि तसेच तुमच्यावर स्वामींचा आशीर्वाद सदैव राहील कारण मित्रांनो आपल्याला जर माहीतच आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी, श्री स्वामी समर्थ!

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular