Thursday, April 25, 2024
Homeरिलेशनशिपअशा घराण्यात.. मुलीला चुकूनही देऊ नये..

अशा घराण्यात.. मुलीला चुकूनही देऊ नये..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. असे म्हणतात की मुलगी हे परक्याचे धन असते. मुलगी जन्माला आली की तेव्हापासूनच आई वडिलांना तिच्या लग्नाची काळजी लागलेली असते. आपल्या लाडक्या परीला एक सुंदर राजकुमार मिळावा अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. एकदा मुलगी वयात आली की तिच्या साठी स्थळ पाहायला सुरुवात होते. मग मुलाचे कुटुंब त्याचे खानदान पैसा अडका स्वभाव असे अनेक पैलू पाहिले जातात व योग्य वर पाहून मुलीचा हात त्या मुलाच्या हातात दिला जातो.

परंतु मुलीचा हात इतर कोणाकडे सोपवताना इतकेच म्हणणे योग्य आहे का मुलीचे लग्न योग्य ठिकाणी व योग्य मुलाशी व्हावे हे आई वडिलांचे स्वप्न असते. मुलीचा विवाह करण्यापूर्वी कोणकोणत्या बाबींची चौकशी करावी काय काय पहावे?

तर असे म्हणतात की मुलीचा विवाह जमताना मुलीचे वडील त्या मुलाकडे किती प्रॉपर्टी आहे हे बघतात. मुलीची आई मुलगा दिसायला कसा आहे हे बघते. तर मुलीचे नातेवाईक मुलाचे खानदान कसे आहे, त्यांचे वरिष्ठ कोण आहेत हे पाहतात.

मुलीचा विवाह जमवताना योग्य मुलाची निवड करावी, हे सर्व त्याचे रूप बघावे, मुलगी ज्या प्रमाणे दिसत असेल त्याप्रमाणेच मुलाचे रूप असावे म्हणजे एक जोडी अनुरूप असावी. मुलगी खूप सुंदर असेल तर मुलगा ही असाच निवडावा जो मुलीला साजेसा असेल.

कमी सुंदर असेल तर मुलगा आहे त्याप्रमाणेच निवडावा नाही तर ते जोडपे विजोड दिसते. पुढे त्यांना जीवनात या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. जो सुंदर असेल त्याच्याकडून जोडीदाराला कमीपणाची वागणूक दिली जाऊ शकते म्हणून शक्यतो जोडीही अनुरूप असावी. म्हणजे दिसायला ही योग्यतेचे आणि छान वाटते.

आपली जशी परिस्थिती असेल तर अशा परिस्थितीत मुलीला द्यावे आपण गरीब असलो व श्रीमंत घरात मुलगी दिली तर तेथे तिला खूप कमी वागणूक दिली जाते. प्रत्येक बाबतीत टोचून बोलले जाते. आई वडिलांच्या नावाचा वेळोवेळी उद्धार केला जातो.

जर आपण श्रीमंत असू व मुलीला गरीब घरात दिलेलं असेल तर मुलीला तेथे ॲडजस्ट व्हायला त्रास होतो किंवा तेवढा काळ जाऊ द्यावा लागतो. तिला आधीपासून उच्च राहणीमानाची खानदानाची सवय असते. तेथे तिला तसे जमत नाही म्हणून तिला त्रास सहन करावा लागतो व पुढेमागे मनात नैराश्याची भावनाही बळावू शकते.

आपली कशी परिस्थिती असेल तर अशा परिस्थितीत मुलीला द्यावे. मुलीचे लग्न तेथेच करावे. थोडेफार इकडे तिकडे चालते परंतु जास्त फरक नको. मुलीला जर योग्य ठिकाणी दिले नाही, तिला प्रतिकूल परिस्थितीत दिले गेले तर याचे उलट परिणाम होतात.

मुलगा जर चांगला असेल सुसंस्कारित असेल तर त्याची आर्थिक परिस्थिती आपल्यापे क्षाकमकुवत असेल तरीही मुलगी तेथे दिली तर चालते कारण सुसंस्कारित, कार्यमग्न व चांगला मुलगा असेल तर तो आपल्या पत्नीचा योग्यप्रकारे सांभाळ करेल.

आज जरी त्याच्याकडे काहीही नसले तरीही तो स्वतःच्या हिमतीवर सर्वकाही कमावेल व आपल्या मुलीला सुखात ठेवेल. परंतु जर एखादा मुलगा खुप श्रिमंत असेल त्याच्याकडे गडगंज संपत्ती असेल आणि तो दारू जुगार यांच्या आहारी गेलेला असेल तर अशा मुलाशी कदापिही आपल्या मुलीचा विवाह करू नये कारण असा मुलगा आपल्या मुलीला त्रासा शिवाय काहीही देऊ शकणार नाही.

त्याची संपत्ती ही तो दारू जुगार वाईट कर्म यामध्ये घालून देईल. शेवटी त्याच्या हातात काहीही शिल्लक राहणार नाही. मुलगी सुसंस्कारित मुलाला गरीबा घरी द्यावी परंतु बिघडलेल्या मुलाला श्रीमंताच्या घरी ही देऊ नये कारण आपल्या मुलीला जे सुख व समाधान गरीबाच्या घरी मिळेल ते सुख व समाधान श्रीमंत बिघडलेला मुलगा कधीही देऊ शकत नाही.

जे व्यक्ती लालची असतात जे हुंड्याची मागणी करतात त्यांच्या घरी कधी ही मुलगी घेऊ नये. आजकाल तर हुंडा मागण्याची एक वेगळीच पद्धत आलेली दिसते. आमच्या मुलाला आम्ही शिकवले त्याला इतक्या मोठ्या नोकरीला लावले त्याच्या शिक्षणाचा खर्च तर आम्ही घेणारच ना आम्ही हुंडा मागत नाही परंतु जो आमचा खर्च झाला आहे तो तर..

निघायला हवा मग काय ते आपल्या मुलाचा पगार मुलीच्या आई-वडिलांना देणार आहेत का? आपल्या काळजाचा तुकडा आपली मुलगी द्यायची वरून त्यांना पैसे द्यायचे इतके कोणी सांगितले आणि कशासाठी. पैसे द्यायचे अशा लोभी व्यक्तींना आपली मुलगी देण्यापेक्षा एखाद्या गरिबाला मुलगी दिली तर खूप चांगले कारण हुंडा घेणाऱ्यांची हाव कधीही संपत नाही.

एक वस्तू मिळाली की ते दुसऱ्या वस्तूची मागणी करतात आणि जर दिले नाही तर आपल्या मुलीला त्रास देतात. त्यापेक्षा अधिकमोकळे बोललेले खूप चांगले. हुंड्याला नकार द्यावा बिनधास्तपणे सांगावे असे आमची मुलगी आम्ही त्यांना देणार आहोत जे एक रुपयाही हुंडा न घेता आमची मुलगी करून घेतील.

मुला-मुलींनी लग्नापूर्वी एकमेकांना भेटत बोलून एकमेकांचा स्वभाव जाणून घ्यावा नाहीतर मुलाच्या मुलीकडून काही वेगळ्याच अपेक्षा असतात मुलीच्या मुलाकडून काही वेगळ्याच अपेक्षा असतात आणि लग्नानंतर त्यांचा अपेक्षाभंग होतो. त्यापेक्षा लग्नापूर्वीच एकमेकांना पारखून समजून घेतले तर लग्नानंतर पश्चाताप करत बसावे लागत नाही.

अशा प्रकारे जर योग्य वर पाहून आपण आपल्या मुलीला दिले तर मुलगी सुखात नांदेल व आपणही तिच्याकडे पाहून समाधानाने हसू.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular