नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! श्री स्वामी समर्थ. ज्या घरात स्वामींचे अस्तित्व असते त्या घरात काही कमी नसते. तुम्हाला जर अनेक अडचणींना सामोरे जावे लागत, असेल सतत वाईट बातमी कानावर येत असेल, कर्जाचा डोंगर जर संपतच नसेल, तर तुम्ही स्वामींना शरण जा. स्वामींचे सतत नामस्मरण करा. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये स्वामींचा एक मोठा फोटो असणे गरजेचे आहे.
तुमच्या घरामध्ये म्हणजे दरवाजातून येतांना अगदी समोरच स्वामींचा फोटो दिसला पाहिजे. म्हणजे जी कुणी व्यक्ती तुमच्या घरात येईल तर त्या व्यक्तीला आधी स्वामींचे दर्शन झाले पाहिजे. म्हणजे ती कोणत्याही हेतूने जरी आली असली तरी स्वामींना पाहून तिच्या मनातील विचार हे बदलू शकतात.
कोणत्याही भावनेने आलेल्या व्यक्तीच्या मनातील भाव हे बदलून जातील. नकारात्मक दरवाजातून येणारी गोष्ट ही घरात येईपर्यंत सकारात्मक होईल. तुम्ही स्वामी भक्त असाल तर तुमच्या घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस तुम्ही स्वामीमय करू शकतात.
अशा प्रकारे आपल्या घरामध्ये कधीही नकारात्मक गोष्टी घडणार नाहीत. प्रत्येक येणारे संकट हे दरवाजातून आत येईपर्यंत दूर झालेले असेल. प्रत्येक स्वामी भक्ताने आपल्या घरामध्ये स्वामींचा मोठा फोटो दरवाजातून आत येताना दिसेल अशा स्थितीत ठेवावा आणि आपलं घर स्वामीमय करून टाकावे. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय… स्वये भक्त प्रारब्ध घडविही माय… श्री स्वामी समर्थ.!!
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!