नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! ज्योतिषशास्त्रात अभिजित नक्षत्राला धरून एकूण 28 नक्षत्रांचा उल्लेख आहे. प्रत्येक नक्षत्राचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे आणि त्याचा प्रभाव त्या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर पडतो. ज्योतिषशास्त्रात 5 वे नक्षत्र शुभ व विशेष मानले जाते. या नक्षत्रात जन्मलेली माणसे सुखाने जीवन जगतात. स्वतःच्या बळावर आयुष्यात यशाशी शिखरे सर करतात. त्यांचे वैशिष्ट्य जाणून घेतलेत तर तुम्ही सुद्धा त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवाल. चला तर मग या नक्षत्राबद्दल अजूनही काही गोष्टी जाणून घेऊयात…
हे नक्षत्र म्हणजे साक्षात ब्रम्हाजीचे स्वरूप – वैदिक ज्योतिषनुसार मृग नक्षत्र हे पाचव्या स्थानावर येते. याच्या निर्मितीची एक कथा आहे. एक दिवस भगवान ब्रम्ह आपल्याच मुलीच्या मोहात पडले. यामुळे भगवान शंकरांना राग आला. त्यांनी ब्रम्ह देवावर बाण सोडला. शंकराचे ते रौद्र रूप पाहून ब्रम्हा भयभीत झाले व आकाशाकडे धावायला लागले. जेव्हा कोणता मार्ग सापडला नाही तेव्हा मृगाचे रूप घेऊन आकाशात विहार करू लागले.
त्या वेळी ब्रम्हाजीच्या त्या सुंदर मृगाच्या रुपाला पाहून त्यांना या रुपात नक्षत्रांमध्ये स्थान मिळाले आणि मग मृग नक्षत्र असे त्याचे नाव पडले. त्याचबरोबर अशी सुद्धा कथा आहे की, शंकराच्या बाणाने ब्रम्ह देवांना आजही माफ केलेले नाही. आजसुद्धा हा बाण आर्द्रा नक्षत्राच्या रूपाने मृग रुपी ब्रम्हाजीच्या मागे आहे.
या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर मंगळाचा प्रभाव
ज्योतिषनुसार प्रत्येक नक्षत्राचा कोणता ना कोणता ग्रह हा स्वामी असतो. ज्याचा प्रभाव त्या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर पडतो. मृग नक्षत्राचा स्वामी मंगळाला मानले गेले आहे. हेच कारण आहे की या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर मंगळाचा प्रभाव दिसून येतो.
म्हणून खास असतात या नक्षत्रात जन्मलेले लोक
ज्योतिषशास्त्रानुसार या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचा प्रेमावर अतूट विश्वास असतो. याव्यतिरिक्त दैनंदिन रोजच्या कामावर त्यांचा जास्त विश्वास असतो. त्यामुळे अशी माणसे घाईगडबडीत काम व नोकरीत बदल करत नाहीत. या नक्षत्रात जन्मलेली माणसे जी काम हातात घेतात, त्यात पूर्ण मन लावून मेहनत घेतात. त्यांचे व्यक्तित्व, रूप आकर्षक असते आणि विश्वासार्ह असतात.
प्रेम जीवनात अतूट विश्वास ठेवतात या नक्षत्रातील लोक – मृग नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचा ग्रह स्वामी मंगळ असतो. त्यामुळे ही लोकं सतत उर्जीने परिपूर्ण असतात. स्वच्छ मनाचे व सगळ्यांना मदत करणारे असतात. त्यांच्याबरोबर कोणी कपटी पणाने वागले तर ते त्यांना माफ नाही करत.
वैयक्तिक जीवनात ते एक चांगले मित्र असतात. या व्यतिरिक्त प्रेमावर्ती अतूट विश्वास असल्याकारणाने त्यांचे वैवाहिक आयुष्य सुखमय असते. ते आपल्या जोडीदाराप्रती प्रामाणिक व विश्वासार्ह असतात. त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन चांगले असते.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!