Monday, July 15, 2024
Homeआध्यात्मिकजगातील एकमेव शिवमंदिर.. ज्यामध्ये नंदी महाराजांच्या शिवाय विराजमान आहेत भगवान महादेव.!!

जगातील एकमेव शिवमंदिर.. ज्यामध्ये नंदी महाराजांच्या शिवाय विराजमान आहेत भगवान महादेव.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर…. असं कधी झालंय का.? शिवमंदिरात देवाधीदेव महादेव असावेत पण त्यांच्या समोर नंदी महाराजांची मूर्ती नाही आहे. असे कधी ऐकले किंवा पाहिले आहे का.? तर होय, आम्ही नाशिकमधील अशाच एका शिवमंदिराबद्दल बोलणार आहोत. ज्या मंदीरात भोलेशंकरांचे आवडते वाहन नंदी त्यांच्यासोबत नाहीये. गोदावरी तीरावर असलेल्या या मंदिराचे नाव आहे कपालेश्वर महादेव मंदिर आहे.

आपल्या हिंदू पुराणात असे सांगितलेले आहे की येथे साक्षात भगवान शिवांचा वास होता. असंही म्हटलं जातं की, भारत देशातील हे एकमेव शिवमंदिर आहे ज्या ठिकाणी भगवान शंकरासमोर नंदीमहाराज नाहीयेत. आणि हेच या शिवमंदिराचे वैशिष्ट्य आहे. चला तर मग श्रावण सोमवारच्या निमित्ताने जाणून घेऊयात, काय आहे या अनोख्या शिव मंदिराचे रहस्य.?

अखेर देवाधी देव महादेव आपल्या लाडक्या नंदीशिवाय इथे एकटे का बसले आहेत?

तर हे तर सर्वांनाच ज्ञात आहे की.. ब्रह्मदेवांना पाच मुखं होती.. अशी आख्यायिकाच आहे. परंतु चार मुखं असलेल्या देवांची पूजा करायची. परंतु त्यांचं एक मुखन नेहमीच वाईट वक्तव्य करत असायचे. हे पाहून एके दिवशी भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवाचे ते मुख शरीरापासून वेगळे केले. त्यामुळे भगवान शिवांनी ब्रह्मदेवाला मारण्याचे पाप केले. म्हणजेच ब्रम्हह’त्या केली..

पुढे या पापापासून मुक्त होण्यासाठी भगवान शिव संपूर्ण विश्वात फिरले पण ब्रह्मह’त्ये सारख्या पापापासून मुक्त होण्याचा मार्ग त्यांना काही सापडला नाही. यादरम्यान त्यांनी खुप फेरफटका मारून सोमेश्वर गाठले. पौराणिक कथेनुसार, भोलेशंकर जेव्हा सोमेश्वरला पोहोचले तेव्हा तेथील एका वासराने भगवान शंकरांना ब्रह्मदेवाच्या ह’त्येच्या पापातून मुक्त होण्याचा मार्ग सांगितला.

याशिवाय त्यांनी भोलेनाथांना या ब्रह्मह’त्येच्या पापातून मुक्ती मिळावी अशा ठिकाणी नेले. आणि हे ठिकाण गोदावरीचे रामकुंड होते. जिथे त्या बछड्याने भोलेनाथला आंघोळ करायला सांगितले. असे मानले जाते की तेथे स्नान केल्यावर भगवान शिव ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होतात. त्यांना या पापातून मुक्त करण्याचा मार्ग दाखविणारे वासराच्या रूपातील नंदी बाबा हे दुसरे कोणी नव्हते.

अशाप्रकारे नंदीमहाराजांमुळे भगवान शिव ब्रह्मदेवाला मारण्याच्या दोषातून मुक्त झाले. म्हणून भगवान शिवांनी त्यांचा गुरु म्हणून स्वीकार केला. नंदी महाराज आता महादेवांचे गुरू झाले असल्याने त्यांनी नंदीमहाराजांना या मंदिरात त्यांच्या समोर बसण्यास मनाई केली. यामुळेच या मंदिरात भोलेनाथ आहे पण नंदी महारज नाहीत.

कपालेश्वर महादेव मंदिराच्या पायऱ्या उतरताच समोर गोदावरी नदी वाहताना दिसते. त्यात प्रसिद्ध रामकुंड आहे. या रामकुंडात भगवान रामाने त्यांचे पिता राजा दशरथ यांचे श्राद्ध केले होते. याशिवाय कपालेश्वर मंदिरासमोर गोदावरी नदीच्या पलीकडे प्राचीन सुंदर नारायण मंदिर आहे.

येथे दरवर्षी हरिहर महोत्सवाचे आयोजन केले जाते. या दरम्यान कपालेश्वर आणि सुंदर नारायण या दोन्ही देवतांचे मुखवटे गोदावरी नदीवर आणले जातात. यानंतर दोघेही मुखवट्यांची एकमेकांसोबत भेट घडविली जाते. श्रावण महिना असो की महाशिवरात्री, येथे मोठी गर्दी असते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular