Thursday, June 20, 2024
Homeआध्यात्मिक'जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तू चि शोधून पाहे'...

‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तू चि शोधून पाहे’ सुख म्हणजे काय असतं.?

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारी मना तू चि शोधून पाहे’ असे समर्थ रामदास स्वामी सांगतात, त्याचा प्रत्यय या गोष्टीतुन येतो. या जगात पूर्ण सुखी कोणीच नाही, तरी दुसऱ्याचे सुख आपल्याला नेहमीच आपल्या पेक्षा जास्त का वाटते? चला तर जाणून घ्या सुख म्हणजे नेमकं काय.!

एकदा झाले असे की.. एक राजा फार आजारी पडला. त्याला बरा करण्यासाठी लांबून-लांबून उपचार करणारे आले, पण त्याचा त्याला उपयोग झाला नाही. लोक दु:खी झाले. आता काय करावे?

अचानक एक साधू आला. त्याने राजाची तब्येत पाहिली. तो म्हणाला, `महाराज अगदी अल्पावधीत बरे होतील. मात्र, त्यांना घालायला एखादा अशा माणसाचा सदरा आणा, जो सुखी असेल.’

राजाचा दिवाण म्हणाला, ‘महाराज, ही तर अतिशय सोपी गोष्ट आही.’

राजमहालातून थोड्या अंतरावर एक शेठजी राहत होता. दिवाण स्वत: तिकडे गेला. म्हणाला, `शेठजी, महाराजांना बरे करण्यासाठी एखाद्या सुखी माणसाचा सदरा हवा आहे. म्हणून आपला एखादा सदरा आम्हाला देता का?’

शेठजी म्हणाला, `दिवाण, एक काय, चार घेऊन जा. पण, एक गोष्ट सांगतो, दुनियेला सुखी दिसत असलो, तरी मी सुखी नाही.’

दिवाण दुसऱ्या शेठजींकडे गेला. त्यांच्याकडेही त्यांनी सदरा मागितला. ते शेठजी म्हणाले, `मी कसला सुखी, रोज धंद्यात चढ-उतार सुरू असतात. आता तर देवी लक्ष्मीसुद्धा माझ्यावर रागावली आहे की काय असे वाटू लागले आहे. माझे नशीब माझ्यावर रुसले आहे, मग मी कसा काय सुखी? उलट तुम्हालाच एका वेळी दोन जण सुखी दिसले, तर मझ्यासाठीही एक सदरा घेऊन या.

तो तरुण एका झाडाच्या आडोशाला बसला होता. चहूकडे अंधार होता. दिवाण तिथे गेले आणि त्याची स्वरसमाधी भंग करत म्हणाले. `युवका, तू भेटलास ते फार बरे झाले. तुझ्यासारखा सुखी माणूस आपल्या गावात कुठेच नाही. अशाच सुखी माणसाचा सदरा आपल्या राजाला मिळाला, तर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होईल, असे एका साधु महाराजांनी सांगितले आहे. देतोस का रे तुझा सदरा?’

तो युवक नम्रपणे म्हणाला, `महाराज नक्कीच दिला असता, परंतु माझ्याकडे सदराच काय, तर लज्जारक्षणापुरतेही कपडे नाहीत. मी एक भणंग कलाकार आहे. स्वांतसुखाय जगतोय. हा आत्मानंदाचा सदरा मी कमावला आहे, तो देता येण्यासारखा नाही. राजेसाहेबांना तो प्रयत्नपूर्वक मिळवावा लागेल.’

त्या युवकाच्या बोलण्यामुळे दिवाणजींच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि डोळ्यासमोर चिंतातूर राजाचा चेहरा उभा राहिला. अतिविचाराने ग्रासलेली व्यक्ती आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करते आणि त्याच सोडवत बसते.

याउलट, ज्याला सुखी व्हायचे, ती व्यक्ती आपल्या आवाक्यात आहेत, तेवढे प्रयत्न करते आणि बाकीचा भार देवावर सोपवून मोकळी होते. ही वृत्ती म्हणजेच सुखी माणसाचा सदरा. दिवाणजींना साधूंच्या बोलण्याचा रोख कळला. सुखी माणसाचा सदरा उसना मिळत नाही, तो कमवावा लागतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular