Friday, April 12, 2024
Homeआध्यात्मिकजप माळेवरील जपाचे लाभ का मिळत नाहीत.? जाणून घ्या नियम.!!

जप माळेवरील जपाचे लाभ का मिळत नाहीत.? जाणून घ्या नियम.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आपल्यातील बरेच घरात सुख समृद्धी नांदावी आणि त्याचबरोबर घरामधील धनसंपत्तीत वाढ व्हावी, यासाठी खूप मेहनत घेत असतात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या देवी-देवतांची पूजाअर्चा अगदी मनापासून करत असतात. मित्रांनो आपल्यातील बरेचजण देवी-देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी देवघरामध्ये देवपूजा करत असतात आणि देवपूजा झाल्यानंतरच कोणत्यातरी एका देवतेच्या मंत्राचा जप करून क्या या देवतेला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करत असतात.

परंतु मित्रांनो आपल्यातील बरेच जण माळेचा जप करत असताना अनेक वेगवेगळ्या चुका करत असतात. म्हणूनच मित्रांनो आज आपण वास्तुशास्त्र मध्ये सांगितलेली देवी-देवतांचा जप करत असताना कोण कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत याबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो ज्यावेळी आपण जपमाळ करतो त्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. त्याच बरोबर वास्तुशास्त्रानुसार डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये. मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना आपण ज्या जपमाळ येणे जप करत असतो गळ्यात किंवा मनगटात घालण्याची सवय असते परंतु वास्तु शास्त्रानुसार नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये. ज्यावेळी आपण माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये.

जेवढे आपण आपला जप पूर्ण करतो त्यानंतर आपल्याला ती जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवायचे आहे ती घरामध्ये इतरत्र कुठेही ठेवू नये, मित्रांनो आपण ज्यावेळी एखाद्या मंत्राचा जप करणार आहोत त्यावेळी जर आपण उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ठ बाधांपासून मुक्ती मिळते. त्याचप्रमाणे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये वेगवेगळ्या बोटांनी जप करण्याचे वेगवेगळे फायदे सांगितले आहेत त्यानुसारच जर आपण अंगठयाच्या सहाय्याने जप केला तर त्यामुळे मोक्ष प्राप्ती होते.

आणि जर आपण तर्जनीने जप केला तर आपल्याला आपल्या शत्रू पासून होणाऱ्या पिढी पासून मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर आपला शत्रुनाश होतो. त्याचबरोबर जर आपण मध्यमेने जप केला तर आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि आपल्याला धनप्राप्ती होते आणि जर आपण अनामिकेने जप केला तर त्यामुळे आपले मन स्थिर राहते आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती नांदते आणि आपल्याला शांतीप्राप्त होते. जर आपण करंगळीने जप केला तर त्यामुळे आपल्याल सुंदरता प्राप्ती होते आणि त्याच बरोबर आपल्या आरोग्य संबंधित सर्व अडचणी दूर होतात.

मित्रांनो ज्यावेळी आपण मंत्र करण्यासाठी देवघरामध्ये बसू त्यावेळी सर्वात आधी आपल्याला जपाची सुरुवात मेरू मण्यापासून करावी. आणि त्यानंतर शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये, मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये मेरुमणी ओलांडून जाणे अशुभ सांगितले आहे त्यामुळे शक्यतो ही कृती करू नये. आणि जर तुम्हाला जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरूमण्याकडे यावे.

त्याचबरोबर आपले वास्तुशास्त्रामध्ये जप करत असताना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठयाने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे, या प्रक्रियेमुळे विद्युतशक्तीची निर्मिती होते. मित्रांनो जर आपण अंगठा व मध्यमेने जप केल्यास त्यामुळे आपल्याला सर्वसिद्धी प्राप्त होतात.

मित्रांनो ज्यावेळी मंत्राचा जप पूर्ण होईल त्यावेळी जप पूर्ण झाल्यावर आपल्याला माळ जमिनीवर न ठेवता ताम्हणात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवायची आहे. तसेच खुंटीवर किंवा उघडया जागेत सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या, चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी. त्याचबरोबर जी आपण एखाद्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरणार आहोत ती माळ पूर्वी कोणीतरी वापरली नसावी.

मित्रांनो आपल्या धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की आपण जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये 108 मणी असतात. माळेमध्ये 108 मणी का असतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. माळ रुद्राक्ष, तुळस, स्फटिक किंवा मोत्याने बनलेली असते. या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो. या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते.देवाच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी, ऋषीमुनी, संत हा उपाय मानतात.

मित्रांनो कोणत्याही मंत्राचा जप करण्यासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही. मित्रांनो आपल्या धर्मशास्त्रानुसार रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतिक आहे. रुद्रक्षामध्ये सूक्ष्म किटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक उर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहचवतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular