Friday, April 12, 2024
Homeआध्यात्मिकजर आपली कुलदेवता माहिती नसेल तर काय करावे.?

जर आपली कुलदेवता माहिती नसेल तर काय करावे.?

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो आपल्यातील बऱ्याच लोकांना आपली कुलदेवता माहीत असेल आणि बऱ्याच लोकांना कुलदेवता माहीत नसेलही, आपल्याला कुलदेवता माहीती नसल्यास आणि कुलदेवताची पूजा आपल्या घरात होत नसल्यास आपल्या घरात भरपूर अडथळे येतात, समस्या येतात, घरात काहीना काही वादविवाद सुरू असतात.

आणि म्हणून नित्यानियमाने कुलदेवतेची मूर्ती घरात स्थापन करून त्यांची रोज पूजा करायला हावी. पण, काहीना आपले कुलदैवतच माहीत नसेल.? अश्या वेळेस काय करावे हा मोठा प्रश्न असतो, प्रत्येक घराण्याची एक कुलदैवत असतेच. बहुतेक घरामधून लग्न, मुंज, वास्तू, मंगलकार्य अश्या मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदेवतेला जाणे हा महत्वाचा भाग मानला जातो.

कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय? आपले कुलदैवताचे स्थान कोणते आहे.? तसेच त्याचे महत्व काय? कुलदेवते संबंधी आपले काय कर्तव्य आहे? असे अनेक प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरीत राहतात. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी ज्येष्ठ मंडळी जवळ नसतात.

घरात एखादी समस्या उदभवली की आपली धावपळ सुरू होते. कुलदेवता हा शब्द ” कुळ आणि देवता ” या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता, ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनीशक्ती जागृत होते, म्हणजेच अध्यात्मिक उन्नतीचा आरंभ होतो, ती देवता म्हणजे आपली कुलदेवता.

कुलदेवता ज्यावेळी पुरुषदेवता असते त्यावेळी तिला कुलदेव, आणि जेव्हा ती स्त्रिदेवता असते त्यावेळी तिला कुलदेवी म्हणून संबोधले जाते. तुम्हाला तुमचे कुलदैवत माहीत नसेल, आणि ते तुम्हाला माहित करून घ्यायचे असेल तर, त्याचे दोन नियम आहेत.

तर मित्रांनो त्यामधील नियम 1 ला असा आहे की रोज सकाळी आणि संध्यकाळी ” स्त्री कुलदेवताय नमः, श्री कुलदेवताय नमः” या मंत्राचा जप करावा. एक माळ जप रोज करावा. मंग काही दिवसातच काहीतरी घटना घडून आपल्याला आपली कुलदैवत माहीत होते, मंग ते कुलदेवी असेल किंवा कुलदेव असेल.आत्ता तुम्हाला प्रश्न पडेल की कसे कळेल किंवा माहीत होईल?

तर मित्रांनो रोज हा जप आपण मनोभावे, खऱ्या श्रध्देने करू तेव्हा काहीना काही असे होते की जसे कुणीतरी आपल्या घरात येईल, कोणीतरी ज्येष्ठ मंडळी येतील, आणि आपल्याला सांगून जातील की तुमची कुलदेवी किंवा कुलदेवता हे आहेत किंवा, स्वप्नात आपल्याला कोणतेतरी देव किंवा देवी दिसतील अश्या रीतीने आपल्याला हा साक्षात्कार होत असतो.

आणि हा भरपूर लोकांचा अनुभव देखील आहे, जर तुम्हाला तुमचे कुलदैवत माहीत नसेल तर तुम्ही सुद्धा हा जप सुरू करा, काही दिवसातच तुम्हाला कळेल, हा बऱ्याच लोकांना आलेला अनुभव आहे.

त्यानंतर नियम 2 रा असा आहे की आपले कुलदैवत हे ब्रम्हा, विष्णू, महेश, आणि आदीमाया यामधूनच कोणाचे तरी रूप असते. म्हणून आपली श्रद्धा यामधून ज्या देवावर असेल त्यांची आपण उपासना करावी. अशी उपासना केली तरी आपल्या कुलदैवताची कृपा होते. मग आपल्याला कुलदैवत माहीत करून घेण्याची गरज नसते.

जर तुमची श्रद्धा इतर कोणत्याही देवी किंवा देवतांवर असेल तर त्यांची तुम्ही भक्ती करा, त्यांची सेवा करा, त्यांची श्रद्धा करा, त्यांच्या नामाचा जप करा, तरी आपली सेवा कुलदैवताला लागते. आणि त्यांची कृपा होते. या दोन गोष्टी आहेत,तर, वर्षातून एक वेळेस आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवाचे दर्शन नक्की घ्यावे. याने घरात शांती, सुख-समृध्दी राहते. घरातून आजार, तिजार दूर राहतात.!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular