Saturday, December 9, 2023
Homeआध्यात्मिकजीवन संपवायला निघालेल्या एका व्यक्तीला झाला साक्षात्कार.. अंगावर काटा आणणारा अनुभव.. श्री...

जीवन संपवायला निघालेल्या एका व्यक्तीला झाला साक्षात्कार.. अंगावर काटा आणणारा अनुभव.. श्री स्वामी समर्थ…

नमस्कार मित्रांनो.. आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे.!! स्वामी समर्थ महाराजांच्या अनुभवाच्या लेखमालेत तुमचे स्वागत आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा महिमा सर्व जगभरात पोचवा ही कामना. आजचा अनुभव आपल्यातल्याच एका सेवेकर्‍याने सोशल मीडियावर टाकलेला, पुढे त्यांच्याच शब्दात.

लेख आवडला असेल तर जरूर शेअर करा. नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या सोबत घडलेला एक दृष्टांत.. साक्षात्कार अथवा अनुभव सांगु इच्छितो. साधारणपणे 30 वर्षापूर्वी माझी परिस्थिती खूप हलाखीची होती.

माझी परिस्थिति इतकी खराब होती की साधे दुसर्‍या गावालाही जायचे म्हटल तर मला त्यासाठी मला पैशाची तडजोड करावी लागत. 1995 ला माझा विवाह झाला, माझी बायको स्वामी समर्थाची कट्टर भक्त होती स्वामी समर्थ म्हटले की मग त्यापुढे कशाचाही तडजोड नाही.असा तिचा स्वभाव.

पण मी मात्र अगदी याऊलट! मी आधीपासूनच नास्तिक, दारू मटन हे सगळे दुर्गुण होतेच आणि त्यामुळे तिच्याशी सुरवातीला खुप भांडणं व्हायची. या गोष्टी अधिकच वाईट व्हायला लागल्या आणि बघता बघता मी अट्टल बेवडा झालो होतो. माझी बायको, माझा परिवार माझ्यापुढे हतबल झाला होता.

मीही नेहमी टेंशन मध्ये असायचो आणि मी निराशेच्या शेवटच्या टोकावर होतो. या सगळ्या गोष्टींनी मला कर्जबाजारी केले होते. मला असे वाटायचे की सगळे संपवून टाकावे आणि तोच एक पर्याय आपल्याकडे आहे. मी खुप डि प्रेशन मध्ये होतो.

एकदातर मी ठरवलं होत हा देहत्यागायचा म्हणून हायवेला आलो त्यावेळी मी खुप नशेत होतो. मला शेवटच बायको सोबत बोलायच होत म्हणून मी तीला फोन केला आणि बोलु लागलो तिला माझ्या बोलण्यावरून सगळा अंदाज अला होता मी जिवाच बरवाईट करतोय म्हणून..

ती रडत होती आणि ती मला विनंत्या करु लागली रडु लागली तुम्ही घरी या म्हणून हाक देऊ लागली पण मी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. मी फोन बंद केला आणि एखादी गाडी येईल म्हणून वाट बघु लागलो दुरवर बघीतले तर भरधाव वेगाने एक ट्रक येतानी दिसत होता.

तेवढ्यात मला मागणं कुणीतरी आवाज दिला. ऐ पोरा अर हा रस्ता कुठं जातो रे मी मागे वळून पाहिले तर एक वयोवृद्ध माणूस होता. मी त्या वृध्दाला कहीच उत्तर दिले नाही मग तो वृद्ध माझ्याजवळ अला आणि परत विचारल ईथ कुठं जवळ गाव आहे का रे बाळा.?

मी त्या वृध्दाला खवळलो त्यावर ते वृद्ध बोलले एवढा राग चांगला नाही बाळ संयम ठेवला तर सगळ नीट होईल. तो पुढे म्हणाला, जिवनप्रवासात येणार्‍या अडचणींना आ’त्महत्या हा पर्याय नसतो आता माझ्याकडेच माझ्या कडे बघ पाच मुल आहेत आणि मला एकही सांभाळत नाही.

माझी बायको मला सोडून कवाच गेलीये. तरीबी मी जगतोय आणि तुला काय झालय रे !! चांगला तरुण आहेस. काम कर, काहीतरी व्यवसाय कर. मी त्या वृध्दाचे बोलणे ऐकून निशब्द झालो होतो. मी त्यांना विचारले बाबा तुम्हाला कुठं जायचंय त्यावर ते वृद्ध बोलले मी कुठं जाणार रे भिक्षा मागुन जिवन जगतोय.

माझ्या डोक्यात प्रकाश पडला होता जगण्याचा मार्ग मला कळाला होता. वृद्ध म्हणाले चल बाबा तुझ गाव असेल जवळ तर मला घेऊन चल भुक लागलीये भिक्षा मागुन खातो त्या वृध्दाचे बोलणे ऐकून मला माझ्या आजोबांची आठवण झाली होती मी ईमोशनल झालो होतो.

त्यांना मी माझ्या घरी येण्यासाठी विनंती केली आणि ते माझ्या सोबत आलेही. घरी आल्यावर बघीतले तर बायको स्वामी समर्थाच्या फोटो समोर बसून रडत रडत स्वामी समर्थाचां जाप करत होती. त्यावर वृध्दांची तिला आवाज दिला ऐ पोरी पाणी मिळल का? तिने डोळे उघडले आणि समोर मला पाहिलं…

तिला खुप,खुप आणंद झाला. झालेली हकीकत मी तिला सांगितली तीने त्या वृध्दाचे पायापडुन आभार मानले नंतर आम्ही सर्वांनी भोजन केले. थोडा आराम करुन ते वृद्ध म्हणाले चला येतो अता मी चांगला संसार करा देव तुम्हाला काही कमी पडू देणारं नाही.

ते वृद्ध निघाले तेव्हा मी थोडा भावुक झालोहोतो निघते वेळी त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीतून विस हजार रुपये काढले आणि माझ्या कडे दिले ते म्हणाले हे घे माझ्या कड ऐवढेच आहेत मला ह्या पैशांची गरज नाही हे तु ठेव आणि काहीतरी व्यवसाय कर तुला काही कमी पडणार नाही.

मग आम्ही दोघांनी जोडीने त्या वृध्दाचे दर्शन घेतले आणि त्यांना निरोप दिला. आम्ही दोघांनी ठरवलं होतं त्या पैशाची एक गाय घ्यायची आणि दुधाचा व्यवसाय करायचा. ह्या घटनेला जवळ जवळ आज वीस वर्ष होत आलीत आम्ही त्या एका गायीवर आज आमच्या कडे पंचवीस गायी आहेत आमचा दुधाचा व्यवसाय खुपच चांगला चालु आहे.

मी मागे तिन वर्षापूर्वी पाच एकर जमीन घेतली आहे. एक टुमदार घर पण बांधलयं. सांगायचं तात्पर्य एवढंच की मला ते वृद्ध नाही तर साक्षात श्री स्वामी समर्थ च भेटले होते, अशक्यही शक्य करतील स्वामी फक्त विश्वास ठेवा आणि सगळं त्यांच्यावर सोपवून द्या.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’यर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर ही नक्की करा धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular