Friday, May 17, 2024
Homeआध्यात्मिकजेवढं जास्त पूजापाठ करतात तेवढं जास्त घरात भांडणं, क्लेश, कलह वाढतात.. कारण..?

जेवढं जास्त पूजापाठ करतात तेवढं जास्त घरात भांडणं, क्लेश, कलह वाढतात.. कारण..?

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो, प्रत्येकाला घरात शांततेचे वातावरण आवश्यक असते. आपण रात्रंदिवस त्यासाठी प्रयत्न करतो. परंतु बर्‍याच वेळा असे दिसून येते की सर्व सोयीसुवीधी असूनही घरात शांतता नसते. लहान मोठ्यांचा आदर करत नाहीत तर मोठ्यांना लहानांच्या गोष्टी समजत नाहीत. अशा परिस्थितीत प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर भांडणे होतात. यामुळे घराची शांती भंग होते. कधीकधी मानसिक समस्या देखील उद्भवतात, मित्रांनो हे सर्व होण्यामागे एकच कारण असतं ते म्हणजे माता लक्ष्मी आपल्या घरावर नाराज झाल्यामुळे होत असते.

आणि त्याच बरोबर मित्रांनो खुप व्यक्तींचे असे म्हणे येते कि देवाचे कितीही नामस्मरण केले तरी सुद्धा घरात लक्ष्मीचे आगमन होत नाही. पौणिमा किंवा अमावस्या या दिवशी सर्व जोतिष उपाय केले तरी सुद्धा त्याचा लाभ मिळत नाही. त्याच बरोबर देवाची उपासना तसेच रोजच्या रोज पूजा केल्यावर सुद्धा त्याचे चागले परिणाम सुद्धा लवकर दिसून येत नाही. घरात लक्ष्मी मातेचे आगमन होण्यासाठी केलेले उपाय सुद्धा त्याचा काही फरक पडत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीचे अजून मन खिन्न होत जाते. काय करावे या बदल समजत नाही.

देवाची रोज पूजा करणे तसेच देवाची उपासना करणे या सर्व गोष्टी केल्या तरी गरीबही काही कमी होत नाही. घरात लक्ष्मीचे आगमन होत नाही. घरात आलेली संपत्ती लगेच घरा बाहेर जाते. संपत्ती घरात टिकत नाही. या साठी काय करावे आपल्या हातून काही चुका होत आहेत का असे बरेच प्रश्न येत असतात. पण जे व्यक्ती या काही चुका करतात त्यानी कितीही देव देव केले तरी सुद्धा त्याना फळ मिळणार नाही.

अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण केल्या पाहिजेत आणि कशा कोणत्या गोष्टी आहेत त्या पण केल्या नाही पाहिजे ज्या मुळे आपल्या त्याचा त्रास होत असतो. पहली गोष्ट अशी आहे. आपण रोज देवाची पूजा करतो. पण त्या देव घरात आपली इष्ट देवता आहे का? या कडे आपण कधी लक्ष देत नाही. आपण रोज देवाची पूजा करतो पण आपल्या कुल देवांचे नामस्मरण आपण करत नाही. आपल्या कुल देवतांची पूजा रोज करत जा त्यांचे नामस्मरण केल्याने त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. आणि आपली चागली प्रगती होते. आपल्या कुल देवाची आराधना सर्वात चांगली गोष्ट आहे.

दुसरी गोष्ट अशी आहे. जर आपण घराबाहेर जात आहोत आणि आपल्या मुख्य दरवाज्या समोर पालथे काही बूट, चप्पला असतील तर ते लगेच सरळ करा. त्या कडे दुर्लक्ष करू नका. आपल्या मुख्य दरवाज्या समोर अशा गोष्टी उलट्या असतील तर त्याचे वाईट परिणाम दिसून येतात. आपल्या घरात लक्ष्मी चे आगमन होत नाही. हि गोष्ट जरी छोटी असली तरी त्याचे परिमाण खुप जनवतात. यामुळे लक्षात सुद्धा घरा बाहेर जाताना आपल्या मुख्य दरवाज्या सोमर पालथी चप्पल किंवा बूट असेल तर तो सरळ करून पुढे जा.

तिसरी गोष्ट अशी कि आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना योग्य वागणूक देणे. काही वेळेस आपण आपल्या घरी कोणी अतिथी येतात पण ते आपल्या घरी कशाला आले असे बरेच प्रश्न येतात आपल्या मनात त्यांच्या बदल वाईट विचार येत असतात.आपण हे लक्षात अशुद्ध अतिथी हे देवा समान असतात त्यांचा अपमान होईल असे वागू नका. त्यांचे स्वागत करा त्यांचा आदर करा.

चौथी गोष्ट ती आपल्या खाण्या संबधी आहे. आपण घरात अन्न शिजवतो आणि त्याचे सेवन करतो. पण काही वेळेस आपल्या हातून अन्नची नासाडी होते. आपल्या घरातून अन्न घरा बाहेर टाकले जाते. यामूळे अन्नपूर्णा देवी नाराज होऊन घराबाहेर जाते. आणि ज्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचे वास्तव्य नसते त्या ठिकाणी लक्ष्मी सुद्धा राहत नाही. यामुळे घरात गरिबी येते. या करणा मुळे अन्नाचे नासाडी करू नका.

पाचवी गोष्ट ती म्हणजे आपल्या घरातील स्वच्छता बाबत. बऱ्याच जणांना अशी सवय असते कि न लागणारे समान सुद्धा घरात साठवून ठेवतात. घरात जे लोक भंगार साठवून ठेवतात त्या घरात लक्ष्मी रहात नाही. कारण ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे घरात विनाकारण भंगार साठवून ठेऊ नका. घरातील लक्ष्मी घरा बाहेर जाईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular