Sunday, December 10, 2023
Homeरिलेशनशिपजेव्हा तुमची हक्काची व्यक्ती तुम्हाला किंमत देत नसेल.. तुम्हाला सतत टाळत असेल,...

जेव्हा तुमची हक्काची व्यक्ती तुम्हाला किंमत देत नसेल.. तुम्हाला सतत टाळत असेल, तेव्हा काय करावे.?

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो, आपल्या आसपास अनेक प्रकारच्या व्यक्ती पहायला मिळतात. कुणाचा स्वभाव शांत असतो तर कोणाचा भाडखोर. मित्रांनो आपल्या देखील जवळच्या व्यक्ती असतात. त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास असतो त्यांच्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. परंतु काही वेळेस असे होते की जवळची व्यक्ती असणारी ती आपल्याकडे पाहत ही नाही ती आपल्याला किंमत ही देत नाही. त्यामुळे आपण निराश होऊन जातो. अशा वेळेस आपण काय करावे याबद्दलची माहिती मी आज मला देणार आहे.

मित्रांनो, ज्यावेळी आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला किंमत देत नाही आणि आपले मन दुखावते त्यावेळी आपल्याकडे दोन पर्याय असतात, एक म्हणजे सहन करणे, किंवा बोलून टाकणे, पण दुर्भाग्य असे की आपण बऱ्याच वेळा या गोष्टी सहन करत असतो, कारण आपल्याला भीती असते की मी जर समोरच्याला काही बोललो किंवा मी बोलले तर आमचे नाते तुटणार नाही ना, आमचे संबंध तर बिघडणार नाही ना, समोरचा माझ्यावर रागवेल त्यामुळे आपण शांतपणे गोष्टी सहन करत राहतो.

त्याचबरोबर आपल्याला वाटते की समोरच्याला एक दिवस तरी जाणीव होईल, आणि तो बदलेल आणि तो ही एक दिवस मला समजून घेईल. चांगले दिवस येतील पण चांगले दिवस काही येत नाहीत आणि सारखे सहन करून-करून आपला त्रास वाढत जातो आणि परिस्थिती चिगळत जाते. मित्रांनो असे का होते याचे कारण म्हणजे, ज्यावेळेस आपण गोष्टी सहन करत जातो तेव्हा आपण समोरच्याला एक संधीच देत असतो की, तुम्ही माझ्याशी व्यवस्थित बोलत जा आणि तुम्ही माझ्याशी नीट वागत जा.!

मित्रांनो प्रत्येकाची सहन करण्याची एक क्षमता असते कोणाची थोडी असते, कोणाची जास्त असते, पण एक दिवस ही सहन शक्ती जेव्हा संपते तेव्हा परिणाम विस्फोटक होतात. आपले जवळचे नाते आपण गमावून बसतो, समोरच्याची वागणूक सहन केल्यामुळे आपली मानसिक स्थिती बिघडते. आरोग्यावर परिणाम होतो म्हणजे सांगायचे झाले तर सहन करणे हा पर्याय नाही पण जेव्हा आपण सहन करण्याऐवजी समोरच्याला बोलून दाखवतो. तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल आदर आहे हे सिद्ध होते.

त्यामुळे जवळची व्यक्ती कितीही टाळाटाळ करत असेल किंवा किंमत देत नसेल त्यावेळेस आपण शांत स्वभाव ठेवून वागले पाहिजे. त्याच्या उत्तराला उत्तर कधीच द्यायचे नाही म्हणजे जवळच्या व्यक्तीला त्याची चूक कळून येईल आणि तो आपणाला किंमत द्यायला शिकेल व आपल्या कडे लक्ष देईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular