Saturday, June 8, 2024
Homeआध्यात्मिकजेवणात आलेला केस कोणते संकेत देतो.? ते जेवण कसे असते.?

जेवणात आलेला केस कोणते संकेत देतो.? ते जेवण कसे असते.?

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, आपण जीवनामध्ये पैसे मिळवण्यासाठी जे काय करत असतो ते फक्त आपले पोट भरण्यासाठी. म्हणजेच आपण काबाडकष्ट करतो आणि पैसे मिळवतो. आणि त्याच पैशाचे आपण आपले पोट भरत असतो. दोन घास सुखाचे खायला मिळतील. या आशेने आपण सर्व काही करत असतो. परंतु हे आपण जे अन्न खात असतो ते अन्न दूषित होण्याची अनेक कारणे आहेत. ती कारणे आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

जर आपल्या ताटामध्ये केस आला तर, आपण ते केस काढून टाकतो व ते अन्न खातो. किंवा काही जण असे करत असतात की, ते ताट सोडून देतात व दुसरे ताट करून खात असतात. परंतु आपण जर बारकाईने लक्ष देऊन पाहिले तर, आपल्याला असे कळते की, वारंवार आपल्या घरातील कोणत्या तरी एकाच व्यक्तीच्या ताटामध्ये तो केस जात असतो.

बाकी कुणाच्याही ताटात नसतो. हे होण्याचे कारण म्हणजे ती व्यक्ती आजारी पडणार आहे. किंवा त्या व्यक्तीला आरोग्यासंबंधी काही अडचणी निर्माण होणार आहे. अनेकदा आपण जेवत असताना कोणाचातरी पाय आपला ताटाला लागतो. याचा अर्थ असा मानला जातो की, ते अन्न दारिद्र्य आणणारे असते. असे भोजन कधी ग्रहण करू नये.

त्याचबरोबर जर आपण जेवण करत असताना आपला ताटाला कोणी ओलांडली तर, असे जेवणही कधी ग्रहण करू नये. कारण ते जेवणही अशुद्ध मांडले जाते आणि त्या जेवणाची अशुद्धता आपल्या मध्ये उतरते. म्हणून असलेले असे जेवण कधीही खाऊ नये. पती-पत्नी जर एकाच ताटात जेवण करत असतील तर, ते मध्यपान केला समान मानले जाते.

जर जेवण करता करता एखाद्या व्यक्तीच्या ताटात केसांचा गुच्छ जर आला तर, असे समजा की, त्या व्यक्तीवर खूप मोठे संकट येणार आहे. त्याचबरोबर आपली मुलगी जोपर्यंत अविवाहित आहे. तोपर्यंत तिच्या वडीलांनी तिला आपल्याच ताटामध्ये घेऊन जेवावे. यामुळे वडिलांचा अकाली मृत्यू होत नाही. कधीही इतरांच्या वाट्याचे अन्न आपण खाऊ नये. ज्याच्या त्याच्या वाट्याचे अन्न ज्याचा त्यानेच खावे.

कारण इतरांच्या वाट्याचे अन्न आपण जर खाल्ले तर, आपल्याला दारिद्र्य येते. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या, फुटलेल्या भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये कधीही जेवण करू नये. जर, तुटलेला, फुटलेला भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये आपण जेवण केले तर, ते आपल्या दुर्भाग्याला आमंत्रण देण्यासारखे होते. त्याचबरोबर अस्वच्छ ताटामध्ये कधीही जेवण करू नये.

कारण यामुळे आपल्याला दारिद्र्य येण्याची शक्यता असते.जर आपण चार-पाच लोक एकदम जेवायला बसले असो तर, आपले जेवण झाल्यावर कधीही उठू नये. सर्वांचे जेवण झाल्यावरच उठावे. त्याच बरोबर आपले जेवण झाल्यावर ताटामध्ये कधी हात धुऊ नये. अशाप्रकारे हे काही जेवणाचे नियम आहेत आणि ते आपल्याला पाळायलाच हवेत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular