Monday, July 15, 2024
Homeआध्यात्मिकJitendra Joshi Swami Samarth Prachiti मुलांनी अपमान केला.. घर सोडावं लागल.. अक्कलकोटच्या...

Jitendra Joshi Swami Samarth Prachiti मुलांनी अपमान केला.. घर सोडावं लागल.. अक्कलकोटच्या बसमध्ये… जितेंद्र जोशीला आलेला स्वामींचा एक अनुभव..

Jitendra Joshi Swami Samarth Prachiti मुलांनी अपमान केला.. घर सोडावं लागल.. अक्कलकोटच्या बसमध्ये… जितेंद्र जोशीला आलेला स्वामींचा एक अनुभव..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. लोकप्रिय मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशी याने त्याच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला आहे. ज्यात त्याने त्याचा स्वामींचा अनुभव सांगितला आहे. मराठी चित्रपटसृष्टीमधील सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अभिनेता जितेंद्र जोशी याचं नाव घेता येईल. त्याने आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली. (Jitendra Joshi Swami Samarth Prachiti) विनोदी असो किंवा गंभीर दोन्हीही भूमिका त्याने उत्कृष्टरित्या साकारल्या. नुकत्याच आलेल्या त्याच्या ‘गोदावरी’ चित्रपटातील अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं.

सध्या जितेंद्रचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात तो त्याला आलेल्या स्वामी समर्थांच्या अनुभवाबद्दल सांगत आहे. ‘कानाला खडा’ या झी मराठीच्या कार्यक्रमामधील हा व्हिडिओ आहे. या कार्यक्रमात त्याने अभिनेते संजय मोने यांना त्याला अक्कलकोटच्या बसमध्ये आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.

जितेंद्र बोलताना म्हणतो, ‘मी एकदा अक्कलकोटला निघालो होतो. (Jitendra Joshi Swami Samarth Prachiti) एकटाच होतो. तिथे एक आजोबा होते. त्यांच्या मुलांनी त्यांचा अपमान केला म्हणून ते घर सोडून आले होते. सगळं सोडून ते अक्कलकोटला निघालेले. कंडक्टर आला. मी तिकीट काढलं. त्यांच्याकडे पैसे मागितले. त्यांच्याकडे पैसे नव्हते. कंडक्टर त्यांना शिव्या द्यायला लागला.

मी म्हणालो अहो शिव्या कशाला देताय. असं कितीसं तिकीट आहे. मी देतो पैसे. मी पैसे दिले आणि त्यांच्या शेजारी जाऊन बसलो. त्यांना विचारलं. काय झालं बाबा? त्यावर ते म्हणाले, काही नाही. मुलांनी अपमान केला. घर सोडून आलो. मी म्हणालो बायको तर असेल ना? ते म्हणाले, ‘आहे ना. तिनेपण त्यांचीच बाजू घेतली.

हे ही वाचा : Marstransit July 2023 मंगळ राशीपरिवर्तन व्यापाऱ्यांना आर्थिक लाभासह वैवाहिक जीवनात सुख लाभेल.. या 4 राशींवर शुभ प्रभाव..

दुखावलो. घर, शेती सगळं सोडून आलो. (Jitendra Joshi Swami Samarth Prachiti) आता अक्कलकोटला जाणार. स्वामींची सेवा करणार. मला याचं वाईट नाही वाटत की त्यांनी माझा अपमान केला. याचं वाईट वाटतंय की मी अक्कलकोटला याआधीच यायला हवं होतं. उशीर झाला.’

पुढे जितेंद्र म्हणाला, ‘अक्कलकोट आलं. सगळे उतरले. उतरल्यावर मला वाटलं की आजोबांना थोडेसे पैसे द्यायला हवे होते. मी बसच्या बाहेर उभा राहिलो त्यांची वाट बघत. पण ते उतरलेच नाहीच. मी सगळीकडे शोधलं त्यांना. संपूर्ण अक्कलकोट शोधलं पण ते मला दिसलेच नाहीत कुठे.

ते काय होतं ते मला ठाऊक नाही पण ते मला शिकवून गेले. संसारात राहूनही अलिप्त राहता आलं पाहिजे. आपलं असं काहीच नाही इथे. (Jitendra Joshi Swami Samarth Prachiti) दुसऱ्याला देता येईल तेवढा आनंद द्यायचा. पण अपेक्षा करायची नाही. सगळंच आपल्या मनासारखं घडेल असं नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular