Sunday, December 3, 2023
Homeआध्यात्मिकजिवंतपणी गरूड पुराण वाचणाऱ्या व्यक्ती बरोबर घडतात या महत्त्वाच्या घटना.!!

जिवंतपणी गरूड पुराण वाचणाऱ्या व्यक्ती बरोबर घडतात या महत्त्वाच्या घटना.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, भारतामध्ये प्राचीन काळापासून अनेक धार्मिक ग्रंथ वाचले जातात. हे ग्रंथ आपल्यासाठी खुप मौल्यवान आहेत. हिंदू धर्मात अनेक लोकांनी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी अशा धार्मिक ग्रंथाचे पठण करतात आणि त्यामध्ये दिलेली शिकवण आपल्या जीवनात उपयोग करण्याचाही प्रयत्न करतात.

रामायण, महाभारत याप्रमाणेच गरूड पूराणालाही हिंदू धर्म संस्कृती मध्ये खुप महत्व आहे. हे पुराण अठरा पुराणांपैकी एक मानले जाते. गरुड पुराण हे श्री हरी विष्णूची भक्ती व ज्ञानावर आधारित आहे. गरूड पूराणात मनुष्य जी वनाशी निगडित कितीतरी गोष्टी सांगितलेल्या आहेत. गरूडपूराणात स्वर्ग, नर्क, पुण्य व पाप याच्या शिवाय इतरही काही आहे.

मित्रांनो यामध्ये ज्ञान, विज्ञान, नीती, नियम व धर्माबद्दल माहिती दिलेली आहे. गरूडपूराणात एका भागात मृत्यूचे रहस्य आहे तर दुसऱ्या भागात जीवनाचे रहस्य आहे. गरुडपुराणातून आपल्याला कितीतरी प्रकारची शिकवण मिळते. गरूडपूराणात मृत्यूच्या आधीचे आणि मृ’ त्यू नंतरचे मनुष्याच्या स्थितीचे वर्णन आहे.

पण आपण अस ऐकलं असेल की गरूडपूराण कोणत्याही जिवंत व्यक्तीने वाचू नये, इतकेच नाही तर असही म्हणलं जात की, गरूडपूराण जे कोणी व्यक्ती वाचतात किंवा जवळ ठेवतात त्यांच्या जीवनात नेहमी काही ना काही अशुभ घटना घडतात. याबद्दल सगळ्यांच्या मनात अनेक प्रश्न आणि भीती आहे.

मित्रांनो आज आपण गरूडपूराण जिवंत व्यक्तीने वाचावे की नाही याची माहिती घेऊ. गरुडपुराणात श्री हरी विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांचा संवाद वर्णन केलेला आहे. नेहमी अस बघितले असेल की जेव्हा एखादा व्यक्तीचा मृ’ त्यू होतो किंवा एखादा व्यक्ती मरण शय्येवर असतो तेव्हा गरूड पूराण वाचले जाते, म्हणूनच आपल्या मनात त्याबद्दल भीती निर्माण होते की आपण ते गरुड पुराण वाचू शकत नाही परंतु हे खरे नाही.

गरुड पुराणाचे वाचन करताना सुरुवातीलाच याचे वाचन करण्या संबंधीत महात्म्याचे वर्णन केले आहे. त्यानुसार एखादा व्यक्ती जर जिवंतपणी गरुड पुराण वाचत असेल तर त्या व्यक्तीला विद्या, यश, सौंदर्य, लक्ष्मी, विजय व आरोग्याची प्राप्ती होते.

जे व्यक्ती याचे नियमीत वाचन किंवा पठण करतात त्यांना सर्व गोष्टींचे ज्ञान होते व मृ’ त्यूनंतर त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते आणि जी व्यक्ती एकाग्र चित्त होऊन गरुड पुराणाचे वाचन करतात किंवा इतरांना सांगतात किंवा पुस्तक रुपात आपल्या जवळ ठेवतात.

त्या व्यक्तींना जर धर्माची इच्छा असेल तर धर्म मिळतो. जर त्यांना पैशाची अपेक्षा असेल तर त्यांना पैशांची प्राप्ती होते. ज्यांच्या हातामध्ये हे ज्ञानपुराण आहे त्यांच्या हातात ज्ञानाचा भंडार आहे. जे व्यक्ती हे पुराण वाचन करतात ते लोक भोग आणि मोक्ष या दोघांची प्राप्ती करतात. आणि या महापुराणाचे वाचन केल्याने व्यक्तीला चांगले म्हणजे कोणते कर्म ते समजते.

या महापुराणाचे पठण करणाऱ्या व्यक्तीला जर संतान प्राप्तीची इच्छा असेल तर ती ही पूर्ण होते. कुमारिकेला मनासारखा जोडीदार, भोगी व्यक्तीला भोगाची प्राप्ती होते. विद्यार्थ्यांना विद्येची प्राप्ती होते. विजयाची इच्छा करणाऱ्याला विजय मिळतो. ब्राह्म ह’ त्येचे पातक असणाऱ्यांचे पातक मिटते.

इतकेच नव्हे तर मंगल कामाची इच्छा असणाऱ्यांना मंगल प्राप्त होते. गुणांची इच्छा गुणांची प्राप्ती होते आणि श्रेष्ठ पक्षी गरुडाने सांगितलेले हे गरुड पुराण धन्य आहे. हे सर्वांचे कल्याण करणारे आहे. जे व्यक्ती या महापुराणाचे पठण करतात त्या व्यक्तीचा कधीही अकाल मृ’त्यू होत नाही.

मित्रांनो, याच्या अर्ध्या श्लोकांचे जरी पठण केले तर आपल्या शत्रूंचा नाश होतो. म्हणून हे गरुड पुराण मुख्य व शास्त्र संमत पुराण आहे. आणि विष्णू धर्माच्या प्रदर्शना नुसार गरूडपूरणासारखे दुसरे कोणतेही पुराण नाही. श्री हरी विष्णूच्या तत्व निरुपणामध्ये सर्व पुरणांपैकी गरूडपूराण श्रेष्ठ आहे.

या गरूडपूराणात श्री हरी विष्णू मुख्य आहेत त्यामुळे ते पूजनीय आहेत. याचे पठण केल्याने आपली सर्व पाप नष्ट होतात. आपल्याला चांगले आरोग्य प्राप्त होते. गरूड पूराण वाचल्याने जर आपल्याला इतके फायदे होत असतील तर ते वाचल्याने आपल्या जीवनात अशुभ घटना कशा घडतील हा फक्त एक भ्रम आहे.

त्यामुळे मित्रांनो म्हणून शक्य असेल तर मनात कोणतीही भीती न बाळगता गरुड पुराण नक्की वाचा. हे पुराण वाचल्याने मनुष्याला जीवनातील व मृ’त्यूनंतरचे रहस्य जिवंतपणी माहीत होते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular