Sunday, December 3, 2023
Homeराशी भविष्यजूनमध्ये 4 ग्रहांच्या स्थिती मध्ये बदल.. ‘या’ 5 राशींची बढती, धन योगासह...

जूनमध्ये 4 ग्रहांच्या स्थिती मध्ये बदल.. ‘या’ 5 राशींची बढती, धन योगासह यशासाठी उत्तम संधी.!!

जूनमध्ये 4 ग्रहांच्या स्थिती मध्ये बदल.. ‘या’ 5 राशींची बढती, धन योगासह यशासाठी उत्तम संधी.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू आहे. आगामी जून महिन्यात नवग्रहांपैकी महत्त्वाच्या ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे. सूर्य, शनी, मंगळ आणि बुध ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे. या 4 ग्रहांच्या स्थितीबदलाचा केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर प्रभाव पडू शकतो, असे म्हटले जात आहे.

जून महिन्यात सर्व प्रथम नवग्रहांचा राजकुमार बुध 07 जून रोजी मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. त्यानंतर 24 जून रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत जाईल. (June Horoscope) तसेच नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य 15 जून रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत जाईल.

नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह 17 जून रोजी कुंभ राशीत वक्री होणार आहे. याशिवाय जून महिन्याच्या अखेरीस नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह 30 जून रोजी कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. जूनमध्ये या ग्रहांच्या राशीपरिवर्तन तसेच वक्र स्थितीमुळे अनेक राशींना चढ- उतारांना सामोरे जावे लागेल, असे म्हटले जात आहे.

हे वाचा : मिथुन रास जून 2023 तुमच्या आयुष्यात या घटना घडणार म्हणजे घडणारच..

मात्र 5 राशीच्या व्यक्तींना जूनमध्ये तयार झालेले ग्रहयोग फायदेशीर ठरू शकतील. प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतील. धनलाभाचा आनंद मिळू शकेल. (June Horoscope) नेमक्या कोणत्या राशींना जूनमधील ग्रहस्थितीचा लाभ मिळू शकतो, नशिबाची, भाग्याची साथ लाभू शकते, ते जाणून घेऊयात….

मेष रास – मेष राशीच्या व्यक्तींना जूनमधील ग्रहस्थिती यशकारक ठरू शकेल. नोकरदारांना प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतील. परदेशात नोकरीच्या संधीही मिळू शकतील. कामे हुशारीने पूर्ण करू शकाल. भावंडांशी ताळमेळ राखता येईल. कामातही त्यांचे सहकार्य मिळू शकेल. नेतृत्व क्षमतेत चांगली वाढ होऊ शकेल. व्यावसायिकांची काही जुनी रखडलेली कामे वेगवान होऊ शकतील. आव्हाने कमी होऊ शकतील.

मिथुन रास – मिथुन राशीच्या व्यक्तींना जूनमधील ग्रहस्थिती लाभदायक ठरू शकेल. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास केल्यास सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतील. नशिबाची साथ मिळू शकेल. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास पैसे वाचविण्यात यशस्वी होऊ शकाल. जास्तीत जास्त लक्ष पैसे कमविण्यावर असेल. (June Horoscope) कौटुंबिक जीवन चांगले राहू शकेल. सदस्य एकमेकांना मदत करण्यास सदैव तत्पर राहतील. आरोग्यात सुधारणा होऊ शकेल.

कन्या रास – कन्या राशीच्या व्यक्तींना जूनमधील ग्रहस्थिती भाग्यकारक ठरू शकेल. नशिबाची साथ लाभू शकेल. कौटुंबिक सदस्यांसोबत नातेसंबंध दृढ होऊ शकतील. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकेल. सरकारी योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. जमीन वा वाहन खरेदीची इच्छाही पूर्ण होऊ शकेल. नोकरदारांना अधिकारी आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकेल.

तूळ रास – तूळ राशीच्या व्यक्तींना जूनमधील ग्रहस्थिती फायदेशीर ठरू शकेल. व्यवसायात चांगली वाढ होऊ शकेल. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये सुसंवाद दिसून येऊ शकेल. मात्र मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील. (June Horoscope) जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील. नोकरदारांना चांगली कामगिरी करता येऊ शकेल. अधिकाऱ्यांच्या सहकार्याने पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकेल.

मकर रास – मकर राशीच्या व्यक्तींना जूनमधील ग्रहस्थिती लाभकारक ठरू शकेल. कार्यक्षेत्रात प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतील. नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहेत, त्यांना चांगली संधी मिळू शकेल. (June Horoscope) नशिबाची साथ लाभेल. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकेल. सरकारी नोकऱ्यांची तयारी करणायांनी नीट विचार करून पुढे गेल्यास यश मिळू शकेल. – सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular