Wednesday, June 12, 2024
Homeआध्यात्मिकज्या गोष्टी कमविलेल्या आहेत त्या कधी ना कधी मातीमोल होणार.. परंतु ही...

ज्या गोष्टी कमविलेल्या आहेत त्या कधी ना कधी मातीमोल होणार.. परंतु ही एक गोष्ट तुमच्या सोबत कायम टिकून राहील.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो प्रत्येक मनुष्य आपले स्वप्न इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी झटत असतो. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो दिवस रात्र एक करत असतो. कधी मनुष्य पैशाच्या मागे धावतो. कधी सुखाच्या मागे धावतो. कधी आवडत्या लोकांच्या मागे पळत असतो परंतु अनेकदा काही स्वप्न पूर्ण होतात. काही इच्छा अपूर्ण राहतात. स्वप्न पूर्ण झाले की मनुष्याला समाधान मिळते परंतु इच्छा पूर्ण झाल्या नाही तर अनेकदा मनाला वाईट वाटते. मनुष्य निराश होतो. मनुष्याच्या मनात नको नको ते विचार येतात.

नकारात्मक भावना निर्माण होते आणि अशावेळी तो दिवसेंदिवस वाईट विचार करू लागतो परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, मानवी जीवन हे नश्वर आहे. आज जन्माला आलेला मनुष्य उद्या नष्ट होणार आहे, ज्याप्रमाणे सकाळी उगवलेला सूर्य हा संध्याकाळी पुन्हा मावळणार आहे त्याचबरोबर मनुष्याचे जीवन देखील तसे आहे. जन्माला आलेली प्रत्येक गोष्ट एक ना एक दिवस या जगाचा निरोप घेणार आहे आणि म्हणूनच या जगाचा निरोप घेताना आपल्याला आपण काय केले आहे.

याचा हिशोब देखील मांडाय चा आहे. प्रत्येक मनुष्य वेगवेगळे कर्म करत असतो त्या कर्माचा जगावर होणारा परिणाम नेमका काय आहे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो आहे हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. बहुतेक वेळा आपल्यापैकी अनेक जण इतरांना त्रास देतात. इतरांच्या मनाविरुद्ध वागण्याचा प्रयत्न करतात. एकमेकांबद्दल द्वेष करतात.

या गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. स्वामी समर्थ म्हणतात की मनुष्याचे जीवन जरी नश्वर असले तरी मनुष्याने नेहमी प्रेमाने आणि सद्भावनेने एकमेकांशी वर्तन करायला. मनुष्याने नेहमी एकमेकांशी प्रेमाने वागायला हवे. स्वामी समर्थ म्हणतात मनुष्य हा जन्म खूप तपानंतर आपल्याला प्राप्त होतो, अशावेळी हा जन्म उगाचच वाया घालवणे अत्यंत चुकीचे आहे. मनुष्याने आपल्या इष्ट देवतांची भक्ती करणे गरजेचे आहे..

कारण की तुम्ही जे काही कमावलेले आहे ते एक दिवस मातीमोल होणार आहे आणि म्हणूनच जीवन जगताना असे काही गोष्टी करा की त्या गोष्टीमुळे तुम्ही सदैव लोकांच्या स्मरणामध्ये राहाल. आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात ते नेहमी पैसा पैसा घरदार संपत्ती यांच्यात मन रमत असतात.या सगळ्या गोष्टी जीवनासाठी आवश्यक असतात परंतु या सर्व गोष्टी भौतिक आहेत.

यांच्यात जीव गुंतवणूक स्वामी समर्थ यांच्या नामस्मरणामध्ये प्रत्येकाने आपला जीव गुंतवावा कारण की नाम जप हे सर्व संकटांवर एक प्रभावी औषध आहे आणि म्हणूनच स्वामी समर्थ म्हणतात की जर तुला कधीही निराश वाटत असले तर तू माझ्या दाराची पायरी चळ मी तुझ्या नेहमी सोबत आहे तुझ्या प्रत्येक जीवनातील कार्यामध्ये माझा प्रभाव तुला दिसून येईल.

तू माझा नाम जप कर. जरी तुला या नामजपातून काही परिणाम दिसत नसेल तर अशावेळी तुम्हाला भेटायला अक्कलकोट निवासी ये तुझ्या सगळ्या समस्या पूर्ण करण्यासाठी मी तिथे ठाण मांडून बसलेलो आहे म्हणूनच आम्ही देखील तुम्हाला सांगतो की ज्या काही नश्वर गोष्टी आहेत त्यांच्यात मन गुंतवण्या ऐवजी मन मोकळे करा कारण की स्वामी नेहमी सगळ्या चांगल्या कारभार मध्ये आपल्याला पाहायला मिळतात.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular