Monday, July 15, 2024
Homeवास्तूशास्त्रज्या महिला या वेळी घरात झाड-झूड करतात त्यांचे घर धन धान्याने कायम...

ज्या महिला या वेळी घरात झाड-झूड करतात त्यांचे घर धन धान्याने कायम भरलेले असते.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, असे म्हणतात की हात फेरे तिथे लक्ष्मी बसे. जिथे स्वच्छता असते तिथेच देवी लक्ष्मी वास्तव्य करते. घर साफ स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणे सर्वांनाच आवडते. आपण कधी कधी चांगले करायला जातो आणि त्यातून आपल्याला त्रास होतो.

घर स्वच्छ ठेवावे यासाठी महिला कधीही हातात झाडू घेऊन घर स्वच्छ करतात. परंतु शास्त्रामध्ये असे सांगितले आहे. की कोणत्याही वेळी घरात झाडू मारू नये. झाडू मारण्याचे ही काही नियम आहेत. घर स्वच्छ असेल तर तिथे देवी लक्ष्मी निवास करते.

परंतु जर चुकीच्या वेळी जर घरात झाड जूट केली. तर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. यामुळे आपले संपूर्ण घर बरबाद होऊ शकते. म्हणून आपल्या कुटुंबात दुर्भाग्य वास करते. शास्त्रामध्ये झाडू मारणे विषयी काही नियम दिले आहेत.

असे म्हटले आहे की सकाळी उठल्यावर लगेच झाडू मारुन घर स्वच्छ करून घ्यावे. व घरातील नकारात्मकता बाहेर काढावी. परंतु संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरात कधीही झाडू मारू नये. जर तुम्ही याकडे लक्ष दिले तर तुमच्या घरात कधीही बाधा येणार नाही.

तसे तर शास्त्रांमध्ये झाडू मारण्याचा शुभमुहूर्त हा पहाटे चार ते पाच दरम्यानचा दिला आहे. याच वेळेला आपण ब्रह्म मुहूर्त ही म्हणतो. याचे खास कारण असे आहे या वेळी घरात आपल्या आसपास सकारात्मक ऊर्जा व दैवी शक्ती पसरलेली असतात.

यावेळी झाडू मारल्यास आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मकता निघून जाते. आणि घरात सकारात्मक ऊर्जा वेगाने पसरते. तसेच यावेळी झाडू मारल्यास आपले दारिद्र्य ही मिटते. आणि घरातील सर्व अडचणी ही निघून जातात.

यावेळी झाडलोट केल्यास देवी लक्ष्मीचे आगमन आपल्या घरी होते. कारण देवी लक्ष्मी त्याच ठिकाणी प्रवेश करते. जिथे स्वच्छता असते. म्हणून देवी लक्ष्मी यायच्या वेळी झाडून तुमचे घर स्वच्छ केलेले असेल तर देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रसन्न मनाने प्रवेश करते.

त्यावेळी जे झाडलोट करतात त्यांच्यावर देवी लक्ष्मी आपला वरदहस्त कायम ठेवते. अशा व्यक्तीला धनाची कमतरता कधीच भासत नाही. म्हणून ब्रह्म मुहूर्तला झाडलोट करणे खूप शुभ असते. जर ब्रह्म मुहूर्ताला झाडलोट करणे शक्य नसेल.

तर कमीतकमी सूर्योदयापूर्वी घरात झाडलोट अवश्य करावी. परंतु कधीही चुकूनही सूर्यास्तानंतर झाडलोट करू नये. कारण संध्याकाळची वेळ ही नेहमी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. यावेळी जर आपण घरात झाडलोट करत असलो तर देवी घरात प्रवेश न करता बाहेर निघून जाते. व यामुळे आपल्याला दारिद्र्य येते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular