Saturday, June 15, 2024
Homeराशी भविष्यकालसर्प योग म्हणजे काय.? कठोर परिश्रम करूनही यश मिळत नसेल तर.. कालसर्प...

कालसर्प योग म्हणजे काय.? कठोर परिश्रम करूनही यश मिळत नसेल तर.. कालसर्प दोष आणि उपाय.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, कालसर्प योगाचे नाव ऐकताच भीती वाटते. काय होईल याची कल्पना आपल्याला नसते. ते वैयक्तिक जीवनात असो किंवा व्यावसायिक जीवनात असो. आपण अधिक काळजी घेऊन आणि सावधगिरी बाळगून काम करत असतो. परिणामी अनेक वेळा तोटाही होतो.

जर तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प योग असेल अस्वस्थ होण्याऐवजी मन शांत ठेवा आणि तज्ञांचे योग्य मार्गदर्शन घेऊन तुम्हाला आराम मिळू शकेल. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, आपल्याला ज्या समस्या उद्भवतात त्या कालसर्प दोषामुळे मुळे उद्भवतात हे तुम्हाला कसे कळणार? म्हणून आज आपण या लेखातून याची माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर त्याचे उपायही सांगणार आहेत.

ज्योतिष शास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे त्यांना स्वप्ने पडतात. याशिवाय ती व्यक्ती कोणत्याही कारणा शिवाय अस्वस्थ राहते. ते त्यांच्या स्वप्नांमध्ये अनेकदा साप बघतात. याशिवाय अनेक वेळा स्वप्नांमध्ये एखाद्याचा मृत्यू ही दिसत असतो. अनेक लोकांच्या बाबतीत असे घडते की, कठोर परिश्रम करूनही यश मिळत नाही.

बराच वेळा असे घडते की यशस्वी होत असताना मध्येच त्या व्यक्तीला अपयशाकडे जावे लागते.ज्योतिष शास्त्रानुसार जर त्यांच्या कुंढली मध्ये कालसर्प दोष असेल तर, त्यांच्या दुश्मनही वाढतात. बऱ्याच वेळा त्यांचे मित्रही त्यांचे शत्रू बनतात. याशिवाय अशा व्यक्तींना काही असाध्य आजारांना सामोरे जावे लागते. या आजारावर प्रत्येक संभाव्य उपचारावर ही आजार कमी होत नाही.

असे म्हणतात की, ही सर्व लक्षणे पाहिल्यास तुमच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे असे मानले जाते.
ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल तर त्याने श्रीहरीची सेवा करावी. विष्णू सहस्त्रनाम स्त्रोत त पठाणाने केले पाहिजे. हा उपाय केला नंतर त्या व्यक्तींना एकशे आठ दिवसानंतर फरक जाणवायला लागतो. याचबरोबर स्वामी समर्थांची नित्यसेवा केली तरी कालसर्प योगाचा प्रभाव कमी होतो.

याशिवाय भूमीत किंवा धातूची सापाची अंगठी बनवून घालावी यामुळेही कालसर्प योग कमी होतो. असे म्हटले जाते की, वाहत्या पाण्यात थोडासा कोळसा जरी टाकला तरी दोषामुळे येणारे अडचणी कमी होतात. विद्वानांचे म्हणणे असे आहे की, जटा असलेला नारळ आणि मसूर डाळ जरी वाहत्या पाण्यात वाहिले तरीही कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो.

ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्याच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असेल तर त्याने ताजा मुळा दान करावा. घरी आणि दुकानात मोराचे पंख लावावे. पंडित यांच्या म्हणण्यानुसार राहू आणि केतू चे जप केले तरी या दोषामुळे या समस्येचा प्रभाव कमी होतो. नागपंचमीचे व्रत करावे. शिवाय त्रंबकेश्वर येथे पूजा केली तरी कालसर्प दोष नाहीसा होतो.

अशाप्रकारे कालसर्प दोष कसा ओळखावा व त्याचे काही उपाय आज आपण या लेखातून जाणून घेतले आहोत. आपण सुद्धा आपला कालसर्प दोष आहे किंवा नाही हे या लेखातून जाणून घेऊ शकता.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular