Sunday, June 16, 2024
Homeराशी भविष्यकर्क राशीची पत्नी.. स्वभाव, गुण, अवगुण, प्रेम आणि बरंच काही…

कर्क राशीची पत्नी.. स्वभाव, गुण, अवगुण, प्रेम आणि बरंच काही…

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत कर्क राशीची जी पत्नी आहे तिचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व नेमक कशा प्रकारचं असतं. म्हणजेच त्यांच बोलण कशा प्रकारचे असत, त्यांचा एकंदर स्वभाव कशा प्रकारचा असतो, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारचा असतो, त्यांच्या अपेक्षा कशा प्रकारच्या असतात या सर्व संदर्भातली चर्चा आपण या लेखामध्ये करणार आहोत. पहिली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कर्क राशीची जी पत्नी असते तीच जे सौंदर्य आहे तिच जे व्यक्तिमत्व असत ते खूपच चांगल असत, सोबर असत.

सौंदर्यातला सोज्वळपणा यांच्यामध्ये दिसून येतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही इतर राशी मध्ये सहसा दिसून येत नाही ते म्हणजे इमोशनलपणा. या राशीच्या स्त्रिया छोट्या-मोठ्या गोष्टींचा खूप इमोशनल विचार करतात. छोट्या मोठ्या गोष्टीचा भावानेने विचार करतात. नातेसंबंध जपणारे असतात, त्यांच्यासाठी नातेसंबंध अतिशय महत्वाचे असतात.

त्यांचे बोलण्याचे विषय असतात ते सुद्धा साधारण नातेसंबंधावरती बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतात. म्हणजेच तुमचे नातेसंबंध कसे आहे तुमची अटॅचमेंट कशी आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे घरच्या लोकांना तुम्ही किती मान देता, घरच्या लोकांबरोबर तुम्ही किती असता या गोष्टी तुमच्या बोलण्यातून किंवा तुमचे एकंदरीत व्यक्तिमत्व नेहमी बघत असतात.

दुसरी गोष्ट म्हणजे तुमची पत्नी कर्क राशीची असेल तर एक गोष्ट मात्र तुमच्या मनात कायम ठेवा की या राशीला बोलायला खूप आवडते आणि बोलण नातेसंबंधावरती असतं. परंतु एकच गोष्ट तशाच प्रकारे ऐकली की प्रतिसाद असतो तो हळूहळू कमी होत जातो. परंतु तुमची पत्नी जर कर्क राशीची असेल तर मात्र असं काही करता येणार नाही तुम्हाला रिस्पॉन्स सुद्धा तेवढाच जोरदार द्यावा लागणार.

रिस्पॉन्स जर का दिला गेला नाही तर मग मात्र वेगळ्याच प्रकारचे विचार तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये तयार होतात, म्हणजे की आता तुमचं लक्ष नाही राहिल किंवा तुम्हाला इंट्रेस्ट नाही राहिला वगैरे वगैरे. कर्क राशीची जर तुमची पत्नी असेल तर तुम्ही भाग्यवान आहात लक्षात घ्या. गृहिणीच्या व्याख्येमध्ये बसणारी ही कर्क राशीची पत्नी आहे.

आपण गृहिणीकडे अपेक्षा काय करतो की तिने घराकडे लक्ष दिले पाहिजे, घरातल्या व्यक्तींकडे लक्ष दिले पाहिजे. घरातल्या कामामध्ये लक्ष दिले पाहिजे, घरातलं काम व्यवस्थित केले पाहिजे किंवा सुगरणीच जे काम आहे ते व्यवस्थितपणे केलं पाहिजे, मोटिवेशनल राहिलं पाहिजे अर्थात ही लिस्ट फार मोठी आहे पण त्या लिस्ट मध्ये सगळी जी कामं आहेत ती सगळी कामं कर्क राशीची स्त्री ही सिंगल हँडेड करून दाखवते.

म्हणूनच ती आदर्श गृहिणीच्या व्याख्या मध्ये बसणारी दिसून येते. घरातल्या कामात ती कधीही हार मानत नाही, दमून जात नाही याचा अर्थ असा अजिबात नाही की तिच्याकडे लक्ष दिलं नाही पाहिजे. तुम्ही सुद्धा एक नवरा म्हणून थोडा काळ हेल्पिंग हात दिला पाहिजे. कर्क राशीच्या पत्नी मध्ये ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे दिसून येते.

करिअर करत असेल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा ते सांभाळून सुध्दा घरातल्या सर्व कामात त्यांचे बारीक लक्ष असते. करीयरच्या बाबतीत चुजी नसतात कोणतेही करीयर असेल ज्या मधून मोबदला मिळायला हवा असे करीयर त्या करतात. मुलांमध्ये रमणारे, माणसांमध्ये रमणारे आणि घरातल्या माणसांची प्रत्येक सुखदुःख त्यांना ठाऊक असतात.

घरातला कुठल्या व्यक्तीचा स्वभाव कशाप्रकारे आहे आणि तर त्या व्यक्तीला कशा प्रकारे आपण सर्व्हिस दिली पाहिजे या गोष्टी यांना उपजतच ठाऊक असतात. घरातल्या व्यक्तींशी म्हणजे माहेरच्या व्यक्तींशी कर्क राशीची पत्नी खूपच अटॅच असते. कर्क राशीच्या पत्नी त्यांचं राहणीमान तुम्ही बघितलात तर ते सुध्दा खूप सिंपल असत. खूप भडक वगैरे नसत.

या स्त्रिया एडजस्ट करणाऱ्या असतात. विवाह सुखासाठी एडजस्ट करण खूप महत्वाचं आहे. दोघांनी जर का स्वतःचाच हेका बाळगला तर कोण कोणाला समजून घेणार आणि मग ते नातं हळूहळू संपत. ही गोष्ट सुध्दा कर्क राशीच्या स्त्री मध्ये खूप चांगली असते की त्या एडजस्ट करायला तयार असतात. मग ती कुठलीही गोष्ट असुदे, छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये किंवा कुठलेही संकट असुदे ती नवऱ्याला समजून घेते.

तिचं पहिल म्हणणं की फॅमिलीला धक्का लागता कामा नये किंवा कौटुंबिक सुखाला धक्का लागता कामा नये ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. संततीकडे आणि तिच्या नवर्‍याकडे तिची जी अटॅचमेंट ही खूप चांगली असते. एकंदरीत त्यांच संपूर्ण जीवन समर्पित असतं घरातल्या लोकांसाठी.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular