Sunday, May 19, 2024
Homeआध्यात्मिककेलेलं कर्म पून्हा फिरुन परत नककीच आपल्याला भेटतं.. वाचा दोन बौद्ध संन्यास्यांची...

केलेलं कर्म पून्हा फिरुन परत नककीच आपल्याला भेटतं.. वाचा दोन बौद्ध संन्यास्यांची गोष्ट.!!

नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो आज आपण बौध्द सन्यासीची एक कथा पाहणार आहोत, एका जंगलामध्ये एक वृद्ध गृहस्थ आणि त्यांचा शिष्य राहत होते, त्या गृहस्थांचे खूप वय झाले होते परंतु त्यांचा शिष्य अजून जवान होता, ज्यावेळी ते वृद्ध गृहस्थ ध्यान करायला बसत त्यावेळी ते तासन् तास ध्यान करत असत.

जंगलामध्ये छोट्याशा झोपडीत हे दोघेही संन्याशी तासन्तास ध्यान करत बसत होते, आणि त्यातील जे गृहस्थ होते त्यांना ध्यान करत असताना भविष्य दिसत होते म्हणजेच भविष्यात ज्या घटना घडणार आहेत त्या त्यांना आधीच ध्यान करत असताना दिसत होत्या,

आणि मित्रांनो असेच एका दिवशी हे दोघेजण ध्यान करत बसले होते आणि त्यामधील जे गुरु होते म्हणजेच ते वृद्ध पुरुष होते त्यांना भविष्यवाणी झाली आणि त्यामध्ये त्यांना असे दिसून आले की त्यांच्या शिष्या चा मृत्यू आठ दिवसानंतर होणार होता.

असे भविष्य दिसल्यानंतर त्या गृहस्थांनी लगेचच त्यांच्या शिष्याला बोलावून घेतले आणि त्यानंतर त्याला जवळ बोलावून म्हणाले की, मी तुला पुढचे सात दिवस सुट्टी देतो आणि या सात दिवसांमध्ये तू तुझ्या घरी जाऊन तुझ्या घरातील यांची भेट घेऊ शकतोस परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की आठव्या दिवशी सायंकाळ होण्याअगोदर तु परत इथे आला पाहिजेस.

गुरुजींचे हे शब्द ऐकल्यानंतर त्याच्या डोळ्यात पाणी आले आणि त्यावर तो म्हणाला की हो गुरुजी मलाही घरातल्यांची खूप आठवण येत होती त्यामुळे मी जातो आणि घरात त्यांची भेट घेऊन आठव्या दिवशी परत येतो परंतु तुम्ही तुमची काळजी घ्या आणि जी काही अवघड कामे असतील ती माझ्यासाठी राखून ठेवा..

मी परत आल्यानंतर ही सर्व कामे पूर्ण करेल. एवढं बोलून तो शिष्य गुरुजींचा आशीर्वाद घेऊन आपल्या घरी जायला निघाला आणि तो शिष्य घरातल्या व्यक्तींना भेटण्यासाठी खूप उत्सुक झाला होता त्यामुळे तो अगदी आनंदाच्या भरात सर्व सामान घेऊन घरी जाण्यासाठी निघाला.

परंतु जात असताना थोडे अंतर पुढे गेल्यानंतर एक नदी आले तो नदीच्या पुलावरून जात असताना त्याच्या असे निदर्शनास आले की नदीच्या कडेला असणाऱ्या एका मोठ्या वारुळा मध्ये लाखो मुंग्या येजा करत होत्या. आणि नदीतील पाण्याची पातळी हळू हळू वाढतच होती त्याच्या असे लक्षात आले की जर नदीची पातळी आणखीन वाढली तर थोड्या वेळानंतर मुंग्यांच्या या वारुळामध्ये पाणी जाईल.

आणि लाखो मग यांचा मृत्यू होईल. ही गोष्ट त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने क्षणाचाही विलंब न करता त्या वारुळा जवळ जाऊन तिथे असणाऱ्या दगडांच्या आणि मातीच्या मदतीने त्या वारुळाच्या बाजूला छोटीशी भिंत उभा केली आणि तिथे येणारे पाणी दुसरीकडे जाण्यासाठी वाट तयार केली.

थोड्या वेळा नंतर ज्यावेळी नदीची पातळी आणखीन वाढली यावेळी ते पाणी मुंग्यांच्या वारुळाकडे न येता ते पाणी दुसऱ्या दिशेने वाहू लागले हे पाहून त्याला खूप आनंद झाला आणि तो थोडे त्याच्या घरी निघुन गेला. तू घरी गेल्यानंतर त्यांनी घरातल्या सर्वांची भेट केली.

तो त्याच्या घरामध्ये इतका रंगून गेला की त्याला त्याचे सात दिवस कसे गेले हेही कळाले नाही आठव्या दिवशी तो घरामध्ये सर्वांसोबत जेवण करत असताना त्याला आठवले की आज तर आपला शेवटचा दिवस आज आपल्याला आपल्या गुरुजींकडे गेले पाहिजे. संध्याकाळच्या वेळी त्याने परत जंगलामध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

इकडे त्याचे गुरुजी खूप उदास होऊन बसले होते आणि त्यांच्या मनामध्ये एकच विचार सुरू होता तो म्हणजे माझी आणि माझ्या शिष्याची भेट कधी होणार आणि बहुतेक देवाचाही मनामध्ये नाही की आमच्या दोघांची भेट व्हावी.

हा विचार मनामध्ये सुरू असतानाच त्या गुरुजींना समोरून एक व्यक्ती येत असल्याचे दिसून आले आणि ती व्यक्ति जसजशी झोपडीकडे येत होती तसतशी त्या गुरुजींची उत्सुकता वाढत होती कारण त्यांना पाहायचे होते की ती व्यक्ती कोण आहे त्या गृहस्थांना असे दिसून आले की तो तर ती व्यक्ती म्हणजे आपला शिष्यच आहे.

तू शिष्य परत आल्यानंतर गुरुजी नेत्याला घट्ट मिठी मारली आणि त्याला सर्व प्रकार सांगितला आणि त्यानंतर तो शिष्य गुरूंना म्हणाला की जर माझा मृत्यू होणारच होता तर मी अजून जिवंत कसा आहे.

तर यावर त्याचे गुरुजी आणि वृद्ध गृहस्थ म्हणाले की नक्कीच काहीतरी पुण्याचे काम केले असशील त्यामुळेच तुला त्याचे फळ मिळाले आहे ह्या केल्यानंतर त्या शिष्याने गुरुजींना घरी जाताना घडलेला सर्व प्रकार सांगितला त्यावर गुरुजी म्हणाले की कर्मा आपण केलेले कर्मच शेवटी आपल्या वाट्याला येते.

मित्रांनो या छोट्याश्या गोष्टीवरून आपल्याला असे लक्षात येते की ज्या काही गोष्टी आपण करत असतो त्याचे आपल्या कर्मांमध्ये रूपांतर होते आणि आपण केलेल्या सर्व गोष्टी कर्माच्या स्वरूपात आपल्याला इथेच भोगावे लागतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे शेअर केलेले लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार ला लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular