स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर…आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही संकटे असतात. काहीतरी एक वाईट काळ चालू असतो. या काळातून बाहेर पडण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो. जप, मंत्र ध्यानधारणा अनेक उपाय करतो परंतु खूप सारे प्रयत्न करून देखील वाईट काळ काही संपायचे नाव घेत नाही आणि अशावेळी मनामध्ये एक निराशा येऊन जाते. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला स्वामी समर्थ यांनी सांगितलेले पाच नियम सांगणार आहोत. हे पाच नियम मानवी जीवनासाठी अगदी लाभदायक ठरणार आहेत. या पाच नियमाने तुमचा उत्कर्ष होणार आहे. तुमच्या जीवनातील वाईट काळ लवकर संपणार आहे.
स्वामी समर्थ हे नेहमी भक्तांच्या पाठीशी उभे असतात. स्वामी समर्थ आपल्या भक्तांवर लक्ष ठेवत असतात. फक्त जर चुकत असेल तर त्याला योग्य वाट दाखवण्याचे कार्य देखील स्वामी समर्थ करत असतात. जर तुमची स्वामींवर श्रद्धा असेल तर अतिशय उत्तम जर तुम्ही स्वामी समर्थ यांना मानत नसाल तर तुम्ही तुमच्या कुलदेवतेला स्मरण देखील हे उपाय ऐकू शकता किंवा या उपायांची अंमलबजावणी करू शकता स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांना जवळ ठेवतात त्यांच्या संकटांमध्ये त्यांच्या पाठीशी उभे राहतात म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये सांगितलेले पास नियम तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
यात पहिला नियम जो आहे तो असा आहे की, स्वामी समर्थ म्हणतात कधीही तुमची स्वतःची तुलना इतरांसोबत करू नका. दुसऱ्याला अनेक गोष्टी मिळालेल्या आहेत परंतु तुम्हाला मिळाल्या नाहीत, असा मनामध्ये भाव कधी जाणू नका कारण की तुम्हाला स्वामिनी वेगळे बनवलेला आहे. तुमचे वेगळेपण तुम्ही जपायला हवे. तुम्हाला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्या गोष्टींबद्दल स्वामींचे आभार मानायला हवे, तसे पाहायला गेले तर मनुष्य ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याचा जास्त विचार न करता ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत त्याचा विचार करत असतो म्हणून स्वामी म्हणतात दुसऱ्यांसोबत आपली तुलना करू नका.
यामुळे पदरी फक्त निराशा येते. स्वामी समर्थांचा दुसरा नियम म्हणजे जास्त विचार करू नका. आपले भविष्यात काय घडणार आहे दुसऱ्यांचे काय घडणार आहे असे विचार करू नका अनेकदा आपण खूप सारे विचार करतो यामुळे आपले शरीर बिघडते. आपल्यापैकी अनेकांना ब्लड प्रेशर शुगर डायबिटीज वाढून जाते आणि म्हणूनच उद्याचा विचार करण्यापेक्षा आजचा विचार करा. जास्तीत जास्त वर्तमान काळामध्ये जगण्याचा प्रयत्न करा आणि नेहमी आनंदी राहा जी व्यक्ती आनंदी राहते, ते नेहमी सुखी राहते.
स्वामी समर्थ आपल्याला तिसरा नियम सांगतात तो म्हणजे भक्तांनो नेहमी भविष्याचा विचार करू नका तसेच भूतकाळामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहात त्यांचा देखील सारखा सारखा विचार करू नका. काल काय घडले होते ते जास्तीत जास्त आठवू नका. तुम्ही वर्तमान काळामध्ये काय करत आहात हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढील पाच मिनिटांमध्ये काय घडणार आहे याचा अंदाज कोणीही लावू शकणार नाही आणि म्हणूनच शक्यतो आता आपल्याकडे जो वेळ आहे तो वेळ जास्तीत जास्त कसा सकारात्मक विचार करता येईल त्यासाठी वापरा. बोलतील त्याच्याकडे लक्ष देऊ नका.
स्वामी समर्थ आणि अनेक भक्त देव मंडळी तुमच्यावर लक्ष देण्यासाठी समर्थ आहेत आणि म्हणूनच लोकांचा जास्त विचार अजिबात देखील करू नका. स्वामी समर्थ म्हणतात पाचवा नियम हा अत्यंत महत्त्वाचा आहे मनुष्याने नेहमी आनंदी राहायला हवं. आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडत आहात, त्याचा स्वतःवर अजिबात परिणाम होऊ देऊ नका, यामुळे तुम्ही नकारात्मक व्हाल म्हणूनच तुमच्या आजूबाजूला असणारी नकारात्मक ऊर्जा दूर जर करायचे असेल तर तुम्हाला आनंदी राहणं गरजेचं आहे.
तुमच्या घरामध्ये जितके सदस्य आहेत त्या सदस्यांसोबत नेहमी आनंदाने वागा त्यांना प्रेम द्या त्यांच्याशी प्रेमळ संवाद साधा आणि त्यांना कसे आनंदी ठेवता येईल याचा विचार देखील करा, परिणामी तुम्ही देखील आनंदी राहाल. अशा प्रकारे आपण या पाच नियमांशी अंमलबजावणी केली आणि स्वतःचे जीवन जगले तर भविष्यात आपल्याला कोणतेच दुःख जाणार नाही. तुम्ही तुमची नेहमी प्रगती कराल. तुम्ही दुःखाच्या जाळ्यामध्ये कधीच अडकणार नाही.
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!