मस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे
स्वागत आहे.!! भक्तहो स्वामींनी सांगितले आयुष्याचे पाच नियम हे तुम्ही संपूर्ण ऐका आणि ऐकून फक्त सोडू नका त्यांना आपल्या जीवनात अमलात आणा. स्वामींनी सांगितलेले आयुष्याचे पाच नियम जर तुम्ही अमलात आणले तर तुमचे आयुष्य सुखी होईल आणि आनंदी सुद्धा होईल. तर पहिला नियम असा की कधीही स्वतःची दुसऱ्याशी तुलना करू नका. की मी असाच का आहे तसं का नाही. त्याला सगळं मिळतं मला काय मिळत नाही. तर लक्षात घ्या की देवाने तुम्हाला वेगळे बनवले आहे सगळ्यांसारखं नाही.
स्वामींनी तुम्हाला खूप काही दिले आहे त्याबद्दल सुखी राहा आणि दुसऱ्याची तुलना कधीच करू नका. तर असा आहे स्वामींचा पहिला नियम. आता दुसरा नियम तर स्वामी बोलतात विचार करणं बंद करा. माझं काय होईल उद्या, कसं होईल हे असे विचार करणे बंद करा. विचार करून काय होतं फक्त आपली शरीर खराब होत. बीपी शुगरचा त्रास सुरू होतो. तर तुम्हाला सुखी राहायचं असेल तर स्वामींनी सांगितलं आहे की विचार करणं बंद करा तर विचार अजिबात करू नका. आनंदी राहा सुखी रहा. तिसरा नियम असा आहे तो म्हणजे नको त्या गोष्टींचा विचार करणे. काल जे काही होऊन गेल आहे ते आज का आठवतात? जे झालं ते झालं तुम्ही गेलेल्या गोष्टी आठवू नका आणि येणाऱ्या गोष्टींचा विचार करू नका.
फक्त आज काय सुरू आहे त्यामध्ये जगा. पुढचा वेळ कोणीच बघितला नाही. काय होईल कुणी सांगत नाही. म्हणून स्वामी म्हणतात मागे गेलेल्या गोष्टी आणि पुढे येणाऱ्या गोष्टी काहीच मनात येऊ देऊ नका. तर पुढचा नियम असा आहे की लोक काय बोलतील त्याचा विचार अजिबात करू नका. बरेच लोक आपल्याबद्दल खूप काही बोलत असतात. ते मित्र नातेवाईक असतील आजूबाजूचे लोक असतील आपल्या कंपनीमधील बरेच लोक असतात जे आपल्या पाठीमागे आपल्याच गोष्टी बोलत असतात.
हा असा बोलला आपल्याबद्दल किंवा तो तसा बोलला आपल्याबद्दल किंवा ते आपल्याबद्दल काय बोलतात याच्याशी आपल्याला काय घेणे देणे आहे. पहिली गोष्ट आपण आपल्या आयुष्यात बघायला पाहिजे कारण वर बसलेले स्वामी आपल्या आजूबाजूला असलेले परमात्मा त्यांना सगळं माहिती असते, कोण काय करते काय नाही याबद्दल त्यांच्याकडे डायरी असते. वाईट आणि चांगले गुणांची त्यांच्याकडे जमाबाकी असते. आपल्याला फक्त आपले चांगले गुण मिळवायचे आहेत. दुसऱ्यांच्या गोष्टी अजिबात लक्ष देऊ नका फक्त तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट बोलू नका लक्ष देऊ नका तुम्ही चांगले रहा कारण तुम्ही चांगले आहात.
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!