Thursday, June 13, 2024
Homeआध्यात्मिककोणतंही संकट येऊ द्या.. 'या' 2 वस्तूंचे दान करा.. दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल.!!...

कोणतंही संकट येऊ द्या.. ‘या’ 2 वस्तूंचे दान करा.. दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल.!! शिवपुराण..

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्र-मैत्रिणींनो, आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो त्याच पद्धतीने आपण दिवस-रात्र मेहनत ही घेत असतो, परंतु इतके करून हे आपल्यापैकी काही व्यक्तींना त्याचा लाभ होत नाही. आज आपण शिवपुराणात सांगितलेला एक प्रभावी उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आपले दुर्भाग्य सौभाग्यात रूपांतरित होईल. आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करेल.

शिवपुराणांमध्ये असे काही उपाय सांगितले आहेत की ज्यामुळे आपण आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट करू शकतो आणि त्याच बरोबर शिवपुराण मध्ये असेही सांगितले आहे की काही गोष्टी दान केल्यामुळे आपल्या घरातील दुर्भाग्य सौभाग्य मध्ये रुपांतरीत होईल व आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल आणि लक्ष्मी स्थिर राहील. मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की देवांचे देव महादेव आपल्या भक्तांच्या थोड्याशा भक्तीनेही त्यांच्यावर प्रसन्न होत असतात.

आणि अशा या महादेवांच्या शिवपुराणांमध्ये अशा काही वस्तूंचे दान करण्यास सांगितले आहे की ज्यामुळे महादेवांचा आशीर्वाद आपल्याला लाभेल व आपले सगळे दुर्भाग्य सौभाग्य रूपांतरित होईल. शिवपुराणा बरोबरच वास्तुशास्त्र मध्येही असेच सांगितले आहे की ज्या गोष्टी आपण दान करतो त्याची परतफेड शंभर पटीने आपल्याला होत असते. त्यामुळे गरीब व्यक्तींना दान करत असताना आपला हात मागे घेऊ नये.

मित्रांनो बऱ्याचदा असे ही म्हटले जाते की महान आपण काही अधिक दान केले किंवा महादेवांचे नाव घेऊन इतर व्यक्तीला जर काही वस्तू दान केल्या तर त्याचे अत्यंत चांगले फळ आपल्याला मिळते. मित्रांनो यामधील पहिली वस्तू आहे मीठ मीठ हे अगदी स्वस्त आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध असणारी गोष्ट आहे आणि त्यामुळे मिठाचे दान हे अगदी सहज करण्यासारखे आहे. सोमवारच्या दिवशी जर मिठाचे दान केले तर त्या अत्यंत फलदायी मानले जाते.

मित्रांनो दुसरी वस्तू आहे गुळ, गुळाचे दान केल्याने आपल्यातील कौटुंबिक वाद नष्ट होऊन,आपले नातेसंबंध सुधारण्यास मदत होते. जर इतर व्यक्तींशी आपले पटत नसेल किंवा पती-पत्नीमध्ये वाद असतील, कोणाबरोबर सारखे वाद विवाद होत असतील तर महादेव यांच्या मंदिरांमध्ये सोमवारच्या दिवशी गुळाचे दान करावे. महादेवाच्या पिंडी समोर तो गुळ अर्पण करावा किंवा त्या गुळाची पोळी तयार करून ती गरीबांना दान करून खाण्यास द्यावी, यामुळे आपले नातेसंबंध मधुर होतात आणि देवी लक्ष्मी ची ही कृपा आपल्यावर अखंड राहते.

त्यानंतर तिसरी वस्तू आहे काळे तीळ, काळे तिळाचे दान केल्यामुळे आपल्यातील भीती नष्ट होऊन आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढत जातो त्यामुळे सोमवारच्या किंवा शनिवारच्या दिवशी काळे तीळ दान करावे. त्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहते आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या कामामध्ये यश मिळण्यास सुरुवात होते, सोमवार किंवा शनिवारच्या दिवशी महादेवांना की आपण काळे तीळ दान करू शकतो.

त्यानंतरची चौथी वस्तू आहे तूप.साजूक तुपाचे दान केल्यामुळे आपल्याला होणाऱ्या शरीरास किंवा मानसिक त्रासापासून मुक्तता मिळते त्याच प्रमाणे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते आणि आजार पण आपल्या पासून दूर राहते. घरातील लहान मुले सारखे आजारी पडत असतील तर त्यांच्या हाताने साजूक तुपाचे दान केल्यामुळे त्यांना होणाऱ्या आजारपणा पासून लवकरात लवकर त्यांची सुटका होते आणि हे तू जर देशी गायची असेल तर अति उत्तम.

पाचवी वस्तू आहे धान्य, आपण घरात वापरत असलेल्या कोणत्याही धान्याचे दान आपण जर करायला सुरुवात केली तर माता अन्नपूर्णेची कृपा आपल्यावर कायम राहते आणि त्यामुळे आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही. ज्या घरामध्ये माता अन्नपूर्णा राहत असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही बाहेर जात नाही, आणि त्यामुळे अन्नधान्य बरोबर आहेस धनसंपत्तीची या दोन्ही गोष्टींची भरभराट आपल्या घरामध्ये होते. त्यामुळे अन्नधान्याचे दान आपल्याला केलेच पाहिजे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular