Sunday, June 23, 2024
Homeआध्यात्मिककोणत्याही पूजेमध्ये.. कापसाचीच वात का लावली जाते.?

कोणत्याही पूजेमध्ये.. कापसाचीच वात का लावली जाते.?

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, देवाला दिवा लावताना आपण कोणत्या नियमांचं पालन केले पाहिजे. देवाची पूजा करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे मानून आपण देवापुढे रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावतो. तर हा दिवा आपण जेव्हा देवासमोर लावत असतो, तेव्हा काही गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवायला हव्यात.

मला वाटते की काही लोक नक्कीच अशा प्रकारे दिवा लावत असतील, पण काहींना कदाचित हे माहीत नसेल. म्हणून आज आपण ह्या गोष्टी समजून घेणार आहोत की देवापुढे दिवा कसा लावायचा ज्यामुळे तुमच्या घरात नेहमी शांतता नांदेल आणि मित्रानो दिवा कोणताही लावा तेलाचं लावा किव्हा तुपाचा लावा मात्र हा दिवा आपण देवासमोर लावायलाच हवा.

आपण जर तेलाचा दिवा वापरात असाल तर तो आपण आपल्या डाव्या हाताला ठेवावा. म्हणजे मंदिरात ठेवताना तो आपल्या डाव्या हाताला असुद्या..जर आपण तुपाचा दिवा लावताय तर आपल्या उजव्या हाताला असायला हवा आणि मित्रांनो तेलापेक्षा तुपाचा दिवा लावणं कधीही चांगलं असत.

कारण तुपामध्ये सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण तेला पेक्ष्या खूप जास्त असत. आपली जी इच्छा असेल, आपली जी आकांक्षा असेल, महत्वकांक्षा असेल,आपली जी स्वप्ने असतील, आपलं देवाकडे जे काही मागणं असेल, ते जर लवकर पूर्ण करून घ्यायचा असेल तर श्रद्धे बरोबरच हा तुपाचा दिवा देखील आपल्याला मदत करू शकतो.

मात्र हे तूप घेताना शक्यतो देशी गाईचे घ्या. ते जर मिळत नसेल तर आपण इतर कोणतंही तूप वापरू शकता. दुसरी गोष्ट दिवा लावायचा की निरांजन लावायचं? मित्रांनो दोन्हीही चालतील काहीच अडचण नाही. मात्र एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा निरांजन जर आपण लावलं तर ते 24 तास जळत राहिले पाहिजे. म्हणजे ते विजता कामा नये. दिवा अगदी 5 ते 10 मिनिटे चालून विजला तरी चालतो. ज्यांना शक्य होईल त्यांनी निरांजन वापरा, ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी दिवा वापरा.

पुढची गोष्ट अशी की जी वात असते दिव्याची ती नेमकी कोणत्या दिशेला ठेवायची, आणि मित्रांनो जर आपल्या आयुष्यात जर धन लाभ पाहिजे असेल तर, आपण या वातीची दिशा उत्तर बाजूला ठेवावी. जर आपल्या घरामध्ये सारख कोणी ना कोणी तरी आजारी पडत असेल तर, आपण या दिव्याची दिशा म्हणजे वातीची जी दिशा आहे.

ती पूर्वेकडे ठेवायला हवी. तर या दोन दिशा फार शुभ आहेत. उत्तर आणि पूर्व…ज्या उरलेल्या दोन दिशा आहेत पश्चिम आणि दक्षिण यातील जर आपण पश्चिम दिशेला वातीने तोंड केलं तर आपल्या जीवनामध्ये दुःखच दुःख येणार आहे.

आणि जर दक्षिण दिशेला जर ही वात असेल तर आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे येऊ शकतात. कारण दक्षिण ही यमाची दिशा आहे. आणि दक्षिणेकडे आपण कधीही दिव्याची वात करू नये आणि मित्रांनो शेवटची गोष्ट जर आपल्या घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम चालू असतील..

इतके प्रॉब्लेम की त्यापासून सुटकाच मिळत नसेल, पैसे ही येत नाहीत, कटकटी चालू आहेत, असे जर खूप प्रॉब्लेम असतील तर आपण आपल्या देवासमोर तीन वाती असणारा दिवा लावा. तीन वाती त्यामध्ये ठेवा. त्या मध्ये देशी गाईचे तूप आवश्य वापरा याचे अतीशय सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसतील.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular