नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो 18 ऑगस्ट गुरुवार रोजी श्री कृष्ण जन्माष्टमी आली आहे. श्रावण महिन्यातील कृष्णपक्षातील अष्टमीला भगवान श्री कृष्णाचा जन्म झाला. मित्रांनो या दिवशी गाईला खाऊ घाला ही छोटीशी वस्तू रोडपती सुध्दा बनेल करोडपती, मित्रानो जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे ही एक वस्तू जेणे करून आपल्या जीवनातील ज्या काही पैश्या संबंधी समस्या आहे, आर्थिक दुष्ठ्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील.
घरामध्ये धन, धान्य, वैभव, समृध्द होईल. मित्रांनो भगवान श्री कृष्णांना गाय ही अत्यंत प्रिय आहे. हिंदू धर्मात गाईला गो-माता अस देखील म्हणलं जात, सर्व पौराणिक शास्त्र पुराण उपनिषदांमध्ये तसेच इतर अनेक धर्म ग्रंथांमध्ये, गो मातेचे आणि तिच्या पूजेचे महत्व जे आहे ते आढळून येते. गो माता ही सर्व मनुष्य प्राण्यांसाठी एक वरदान आहे, गो सेवा केल्याने आपल्याला अनंत पूर्ण प्राप्त होते.
गाईच्या चरनाची धूळ जरी आपण आपल्या माथ्याशी धारण केली तर आपल्याला तीर्थ स्थानाचे पुण्य मिळते. तर अशी या गो मातेची सेवा आपण या श्री कृष्ण जन्माष्टमीला करायची आहे, भगवान श्री कृष्णाने देखील वृंदावनामधे गो सेवा केलेली आहे. बाळ गोपाळासह श्री कृष्ण गाईला चारा घालण्यासाठी जात होते ते आपल्या सर्वांना माहीतच आहे, त्यामुळं जन्माष्टमीच्या दिवशी आपण गो सेवा केली तर, भगवान श्री कृष्ण अती प्रसन्न होतात आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर सदैव राहतो.
तर मित्रांनो या दिवशी आपल्या घरात पहिली पोळी बनेल, ती आपल्याला गो मातेला खाऊ घालायची आहे. आपल्या घरात बनलेली पहिली पोळी मग ती ज्वारीची भाकरी असेल बाजरीची भाकरी असेल, ते गो मातेला खाऊ घालायची आहे, आता हे कस करायच आहे ते आपण पाहूया, जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नानदिन व्हायच आहे. आणि त्या नंतर भगवान श्री कृष्णांची पूजा करायची आहे, त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपण अर्पण करायच्या आहे.
पिवळ्या रंगाची फुले, पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळ्या रंगाची वस्त्र, पितांबर आपण या दिवशी भगवान श्री कृष्णांना अर्पण करायचे आहे. आणि त्या नंतर आपल्या घरात पहिली जी पोळी बनली आहे ती एका ताटात घेयची आहे, त्यावर आपल्याला माखन आणि मिश्री ठेवायची आहे. भगवान श्री कृष्णांना माखन अत्यंत प्रिय आहे तर हे माखण त्या पोळीवर ठेवायचं आहे. त्याच बरोबर खडीसाखर सुध्दा ठेवायची आहे.
माखन म्हणजे लोणी त्यावर ठेवायचं आहे, जर लोणी नसेल तर तुम्ही दही देखील ठेवू शकता. तर दही आणि खडीसाखर पोळीवर ठेवायची आहे. आणि याचा नेवेद्य आपण भगवान श्री कृष्णांना दाखवायचा आहे. नेवेद्य दाखवल्या नंतर आपल्याला ही पोळी गो मातेला खाऊ घालायची आहे. तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असताल तर तिथे गाय उपलब्ध असतेच पण जर तुम्ही शहरी भागात राहत असताल तर आपल्या जवळपास कुठ गो शाळा आहे का ते बघायचे आहे आणि त्या गो शाळेमध्ये जाऊन आपण ती पोळी गो मातेला खाऊ घालायची आहे.
आणि त्या गो मातेला नंतर 3 परिक्रमा करायच्या आहेत म्हणजेच प्रदक्षिणा घालायच्या आहे. आणि गो मातेला स्पर्श करून करून नमस्कार करायचा आहे, अश्या प्रकारे आपल्या घरात जी पहिली पोळी बनलेली आहे. ती भगवान श्री कृष्णांना नेवेद्य म्हणून दाखवायची आहे आणि त्या नंतर गो मातेला खाऊ घालायची आहे. मित्रांनो हा उपाय केल्यानंतर तुमच्या जीवनातील सर्व दुःख, समस्या, संकट दूर होतील, यश मान सन्मान आणि समृद्धी तुमच्या जीवनात येइल.
बऱ्याचदा आपण खुप कष्ट करून करून देखील जे काम होत नाही ते काम छोट्याश्या उपायानी देखील होऊ शकते. परंतु ते काम आपण श्रद्धेने मनापासून करायचे आहे. मित्रांनो गो सेवेचे खुप मोठे महत्व शास्त्रांमध्ये सांगितले आहे याचे पुण्य अपल्याला अनंत पटीने मिळते आपल्या पिढ्या न पिढ्या ना या गोष्टीचा फायदा होत असतो. त्यामुळे जन्माष्टमीला तूम्ही हा छोटासा उपाय आवश्य करा आणि तुमचे अनुभव आमच्या सोबत शेअर करा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!