Monday, June 10, 2024
Homeआध्यात्मिककृष्ण तुळस की राम तुळस.? कोणती तुळस घरासाठी शुभ असते.?

कृष्ण तुळस की राम तुळस.? कोणती तुळस घरासाठी शुभ असते.?

मित्रांनो हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. प्रत्येकांच्या अंगणात आपल्याला तुळस पाहायला मिळते. अंगण नसेल तर गॅलरीत किंवा खिडकीत तुळसीचं रोप लावलेलं असतं. ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो, असं मानलं जात. तुळशीचे रोप घरात ठेवल्याने घरात सकारात्मकता आणि सुख-समृद्धी येते. सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची आशीर्वाद प्राप्त होते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातही तुळशीला महत्त्वाचा दर्जा देण्यात आला आहे. यासोबतच तुळशीची पूजा, देखभाल इत्यादीबाबत काही नियमही सांगण्यात आले आहेत. त्यांचे पालन केल्याने विशेष फायदा होतो.

आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय संस्कृती, परंपरा यांमध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे. तुळस हे फक्त एक रोपटं नसून, तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. तुळशीची पानं खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात. तुळस घरात ठेवणं शुभ असतं. यामुळे घरात शांतता आणि आनंदी वातावरण राहतं, असं मानलं जातं. आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते. घरातल्या तुळशीच्या रोपाची काळजी घ्यावी. तुळशीला दररोज पाणी घालावं. ती सुकली असेल तर लगेचच काढून टाकावी आणि नवं रोपटं लावावं. सुकलेली तुळस घरात ठेवू नये, असं म्हणतात.

तुळशीचे दोन प्रकार आहेत, राम आणि कृष्ण तुळस. पण घरात कोणते तुळशीचे रोप लावणे शुभ आहे याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. यासाठी या दोघांमधील फरक जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. मित्रांनो यामधील सर्वात पहिला प्रकार म्हणजे राम तुळस. मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार रामा तुळशीच्या पानांचा रंग हिरवा असून त्याची पाने गोड असतात. राम तुळस भगवान श्रीरामांना अत्यंत प्रिय आहे. घरामध्ये राम तुळशीचे रोप लावल्याने घरात सुख, शांती आणि ऐश्वर्य नांदते. घरात असणे खूप शुभ असते. आणि त्याचबरोबर मित्रांनो तुळशीचा दुसरा प्रकार म्हणजे कृष्ण तुळस.

मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार कृष्ण तुळस घरी लावणे खूप शुभ आहे, तसेच आयुर्वेदातही याला खूप महत्त्व दिले गेले आहे. कृष्ण तुळशीचा उपयोग अनेक औषधांमध्ये केला जातो. कृष्ण तुळशीची पाने काळ्या किंवा जांभळ्या रंगाची असतात. हे भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो घरामध्ये तुळशीची लागवड करण्यासाठी गुरुवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी तुळस लावणे चांगले आणि मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्ही बाल्कनी किंवा खिडकीजवळ ठेवत असाल तर ते उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला ठेवणे योग्य ठरेल.

आणि त्याचबरोबर मित्रांनो तुळशीची रोज उपासना आणि नियमित काळजी घेतल्याने दीर्घायुष्य लाभते तसेच कुटुंबात समृद्धी येते परंतु आपल्या घरात समृद्धी आणण्यासाठी आपण वास्तुशास्त्रातील तुळशी संबंधातील नियमांचे पालन केले असल्याचे सुनिश्चित करायला हवे. आणि मित्रांनो वास्तु शास्त्रानुसार तुळशीसाठी पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल असे स्थान योग्य आहे. आणि मित्रांनो औषधी गुणधर्मांव्यतिरिक्त, तुळशीच्या वनस्पतींचा उपस्थिती ताण दूर करण्यात मदत करते आणि ही वनस्पती डासांपासून बचाव करणारे गुण घेऊन डासांना दूर ठेवते आणि ही वनस्पती घरात ठेवल्याने हवा शुद्ध होते. असे मानले जाते की तुळशीची वनस्पती हवेतून सल्फर डाय ऑक्साईड, कार्बन डाय ऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साइड इत्यादी विषारी वायू शोषून घेते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular