Sunday, April 21, 2024
Homeआध्यात्मिककुलदेवतेच्या स्थानी जातांना ही एक वस्तू घेऊन जा.. कुलदेवता स्वतः तुमच्या घरी...

कुलदेवतेच्या स्थानी जातांना ही एक वस्तू घेऊन जा.. कुलदेवता स्वतः तुमच्या घरी निवासाला येईल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, साधारणपणे प्रत्येक कुळाला एक कुलदेवता किंवा कुळदेवी असतेच आणि कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहावा.आपल्या कुटुंबावर प्रसन्न रहावी यासाठी आपण अनेक पूजाविधी करतो तसेच अनेक उपवास करतो.

तसेच देवीच्या तीर्थक्षेत्री जाऊन तिचे दर्शन घेतो आणि अनेक वस्तूंचे दान देखील किंवा अनेक वस्तू देवीला तुम्ही समर्पित करीत असतात .तर मित्रांनो आपल्या घरातील वातावरण सुखमय कोणत्याही प्रकारच्या अडचणी, कोणत्याही कामात अपयश येऊ नये यासाठी कुळदेवतेचा कृपाशीर्वाद असणे अत्यंत गरजेचे असते व कुळदेवता ही एक प्रकारची आई असते.

अनेक जण कुळदेवीच्या तीर्थक्षेत्री जात असतात. आपल्या बरोबर नारळ, फुले, हार किंवा एखाद्या पदार्थाचा नैवेद्य, एखादी साडी किंवा ब्लाउज पीस अशा अनेक वस्तू देवीला समर्पित करीत असतात. परंतु मित्रांनो आपल्या कुळदेवीला नेमके काय आवडते आणि कोणती वस्तू आपण घेऊन जायचे आहे याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. जेणेकरून कुळदेवतेचा कृपाशीर्वाद तुमच्या कुटुंबावर होईल. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणती आहे ही वस्तू.

तर मित्रांनो तुम्ही कुलदेवतेच्या तीर्थक्षेत्री कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी जाऊ शकता. परंतु मित्रांनो तुम्ही जेव्हा तिच्या तीर्थक्षेत्री जाणार असाल त्यावेळेस तुम्ही घरातून जात असताना तुमच्या देवतेची पूजा करणे आवश्यक आहे. कोणाचे कुलदेव असते तर कुणाचे कुलदेवी असते. तर मित्रांनो तुम्हाला तिची पूजा अर्चना करून प्रार्थना करायची आहे की, हे कुलदेवता मी तुझ्या दर्शनाला येत आहे.

तुझ्या घरी येत आहे. मी माझ्याबरोबर माझ्या हातून घरी बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे. तुझ्या घरी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे. अशी प्रार्थना करून फुले अर्पण करून धूप दाखवून तुम्हाला गोड नैवेद्य दाखवायचा आहे आणि मित्रांनो या तीर्थक्षेत्री जात असताना तुम्हाला गव्हाच्या पिठाच्या अकरा पुर्‍या आणि गव्हाचे पीठ वापरून गुळ, डाळ वापरून 11 लाडू बनवायचे आहे आणि या दोन पदार्थसोबत तुम्हाला पाव किलो गुळाची वडी घ्यायची आहे.

मित्रांनो, हा बनवलेला प्रसाद आहे तो एका डब्यात भरायचा आहे. मित्रानो ज्या वेळेस तुम्ही पूजा प्रार्थना करीत असतात त्यावेळेस तुम्ही देवीला सांगितलेले असते की तुला आम्ही आमच्या घरातून नैवेद्य आणणार आहोत. त्यामुळे कुळदेवता आहे ती तुमच्या नैवेद्याची वाट पाहत असते आणि तुमचा प्रवास सुखकर करते.

तर मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही तीर्थक्षेत्री जातात त्या वेळेस तुम्हाला स्वच्छ स्नान वगैरे करायचे आहे आणि देवीच्या दर्शनाला जायचे आहे. तेथे दर्शनाला गेल्यानंतर पुजारीला तुम्ही घरून आणलेला नैवेद्य देवीला अर्पण करण्यास सांगायचा आहे आणि ज्या वेळेस पुजारी हा नैवेद्य देवीला अर्पण करतात.

त्याच वेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे की, हे देवी माते तू आमची रक्षणकरता आहेस. आम्ही तुला घरून नैवेद्य आणलेला आहे आणि हा तो तुला आवडेलच. भोग करण्यासाठी आमच्या बरोबर आमच्या घरी यावे. अशी प्रार्थना अगदी मनोभावे व श्रद्धेने तुम्ही कुलदेवतेला करायची आहे.

थोडावेळ प्रसाद ठेवल्यानंतर तुम्हाला हा प्रसाद घ्यायचा आहे. मित्रांनो जेव्हा तुम्ही दर्शन करून घरी याल त्यावेळेस तुमच्याबरोबर या कुल देवतेच्या अस्तित्वाचा अंश तुमच्याबरोबर घरी येत असतो म्हणजेच कुलदेवता आहे तुमच्या बरोबर तुमच्या घरी येते. त्यामुळे तुम्हाला कुलदेवतेचा कृपाशिर्वाद प्राप्त होतो. मित्रांनो आजकाल अनेक जण हे दुकानातील रेडीमेड नैवेद्य म्हणजेच पेढे, लाडू घेऊन तिने देवीला अर्पण करीत असतात.

परंतु मित्रांनो जर आपण घरातूनच आपल्या हातून बनवलेला पदार्थ जर देवीला अर्पण केला तर कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते. मित्रांनो मोठ्या हुद्द्यावर असणारा मुलगा जर आपल्या आईला हॉटेलमधून असणारे कितीही पदार्थ खाऊ घातले तरीही आईला मुलाने घरी बनवलेला त्याच्या हातचा बनवलेल्या दही भात वरण भात किंवा चपाती भाजी खाल्ली तर ती आई खूष होते.

त्याप्रमाणे कूल देवतेला तुम्ही घरातून आपल्या हातून बनवलेला नैवेद्य तर घेऊन गेला आणि तिला अर्पण केला तर कुळदेवता आपल्यावर प्रसन्न राहते. ती आपल्याला कृपा आशीर्वाद देते. मित्रांनो हा जो नैवेद्य आपण देवीला अर्पण केलेला असतो तो नैवेद्य घरी आल्यानंतर तुम्ही एखाद्या दूध देणाऱ्या गाईला भरवायचा आहे. कारण दूध देणाऱ्या गाई च्या स्तणांमध्ये कुलदेवतेचा वास असतो. त्यामुळे हा प्रसाद तुम्ही दूध देणाऱ्या गाईला अर्पण करायचा आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर घरातून बनवलेला नैवेद्य कुलदेवतेला अर्पण केला तर ती तुमच्यावर कायम प्रसन्न राहील. ती तुमच्या सोबत तुमच्या बरोबर तुमच्या घरी येईल आणि तिचा कृपाशिर्वाद आपल्या घरावर कायम ठेवेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular