Saturday, December 9, 2023
Homeराशी भविष्यकुंभ रास - महाउपाय.. 2023 या घटना तुमच्या आयुष्यात 100 % घडणार...

कुंभ रास – महाउपाय.. 2023 या घटना तुमच्या आयुष्यात 100 % घडणार म्हणजे घडणार..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.! कुंभ राशीच्या जीवनामध्ये 2023 या वर्षामध्ये काय काय घडणार आहे. त्यांची आर्थिक स्थिती कशी असेल, कौटुंबिक बाबतीत शांतता असेल की, नाही.

आर्थिक स्थिती- यावर्षी कुंभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. खर्च भरपूर होईल खरा पण खर्च करताना पैसा कोठून आणायचा असा प्रश्न त्यांना पडणार नाही. खर्च करण्यासाठी ही लोक सक्षम असतील. थोडक्यात, काय तुमच्या आर्थिक स्थिती तुम्ही योग्य प्रकारे हाताळू शकाल.

नोकरी आणि व्यवसाय – नोकरी- यावर्षी कुंभ राशींच्या जातकांना अर्थात कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप सावधगिरी बाळगावी लागेल कारण, यावर्षी अशी काही परिस्थिती निर्माण होईल. ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुम्ही जिथे काम करत आहात. तिथे तुमच्या विरुद्ध कारस्थान करण्याची शक्यता आहेत. त्यामुळे तुम्हाला सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.

तशी तर वर्षाची सुरुवात अनुकूल राहील. आणि तुम्ही तुमच्या कामात गुंतून जाल.मार्च एप्रिल महिन्यात तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न करू शकता. आणि जर तुम्ही आधीच प्रयत्न केला असेल, तर तुम्ही या काळात नोकरी बदलू शकाल. नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला यश मिळेल.

व्यवसाय – जर तुम्ही व्यवसाय करत असाल. व्यवसाय तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागेल. तुम्ही योग्य तो निर्णय घेऊन पुढे जाल. आणि व्यवसायाला योग्य त्या दिशेने घेऊन जाल.

कौटुंबिक – कौटुंबिक बाबींचा विचार करता, कुंभ राशींच्या जातकांना वर्षाच्या सुरुवातीलाच काही कौटुंबिक जीवनात काही समस्या जाणवतील. परस्पर सामस्य नसल्यामुळे कुटुंबातील लोक एकमेकांना नीट समजून घेऊ शकणार नाहीत. परंतु 17 जानेवारी नंतर शनीच्या राशी बदलामुळे ही परिस्थिती सुधारेल. घरामध्ये तुमच्या बोलण्याकडे लक्ष दिले जाईल. तुमच्या बोलण्यात गोडवा सुद्धा येईल. त्यामुळे तुम्ही कौटुंबिक गोष्टी हाताळण्यास सक्षम व्हाल.

एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान शारीरिक समस्या भावांडाना त्रास देऊ शकता. त्यामुळे या काळात कोणत्याही प्रकारची त्यांच्याशी भांडण करू नका. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये घरातील वातावरण सकारात्मक राहील. आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तुम्ही कुटुंबीयांसह फिरायला जाऊ शकता. सहलीला जाण्याचे योग् येतील. आणि कौटुंबिक जीवनामध्ये त्यामुळे आनंद येणार आहे.

आता एक गोष्ट लक्षात घ्या 2023 मध्ये कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा चालू होईल. ज्योतिषीय उपाय तुम्ही यासाठी करायचे आहेत. शनि देवांचा बीज मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे. किंवा शनिवारी अन्नदान करायचा आहे. ज्यामध्ये हरभऱ्याचा समावेश असेल. देवर शनिवारी तुम्ही हनुमान चालीसाचे पटन सुद्धा करू शकता.

शनिवारी शमीच्या झाडाखाली मोहरीचा तेलाचा दिवा लावू शकता. तुमच्यावर आर्थिक बोजा वाढत असेल तर शुक्रवारी श्री सूक्तच पठन करा. गरीब व कुष्ठरोग रुग्णांना मोफत औषधे वाटून यांची सेवा करा. जर तुम्हाला कोणत्याही विशिष्ट समस्येने त्रास होत असेल, तर शनिवारी बजरंग बाणाचा पाठ अवश्य करा. तसेच तुम्ही सुंदर कांडही वाचू शकतात.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular