स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर..
नोकरी तथा कार्यक्षेत्र – तुमच्या करियरच्या दृष्टीने कुंभ राशीसाठी हा महिना अत्यंत चांगला असणार आहे. करिअरच्या बाबतीत असलेले अनेक प्रकारचे गैरसमज या काळात दूर होतील. एखादे मोठे पद भूषविले जाणार किंवा प्रमोशन मिळण्याची संधी उपलब्ध होईल. वरिष्ठांद्वारे या तीन महिन्यात तुम्हाला सन्मानित केले जाऊ शकते.
त्याचबरोबर नोकरी बदलण्याचा निर्णय ही तुम्ही घेण्याचे योग आहेत. इतर दुसऱ्या क्षेत्रात तुम्हाला नोकरी मिळण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. प्रायव्हेट सेक्टर मध्ये काम करणाऱ्या जातकांना दुसऱ्या शहरात छान अशा नोकरीचा प्रस्ताव येऊ शकतो. याच दरम्यान च्या काळात नविन नोकरी शोधत असणाऱ्या जातकांची इच्छा पूर्ण होऊ शकते.
सप्तम स्थानावर पडणारी शनीदेवांची दृष्टी व्यापार आणि उद्योग धंद्यात होणारे लाभ दर्शविते, तुम्हाला तुमच्या कामात सफलता प्राप्त होईल. कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेतही तुम्हाला यश आणि किर्ती लाभेल. येणाऱ्या काळात तुम्ही व्यापारात गुंतवणूक करू शकतात आणि या गुंतवणूकीचा फायदा ही तुम्हाला बराच होणार आहे.
प्रेमसंबंध आणि वैवाहिक सौख्य – कुंभ राशीच्या जातकांसाठी प्रेम संबंधित गोष्टींसाठी येणारा काळ थोडा कठीण असणार आहे. मंगळ दृष्टी असल्याने कलहाचे योग दिसून येत आहेत. म्हणूनच जोडीदारासोबत कोणत्याही गोष्टीवरून वाद होऊ शकतो, म्हणून सावधानी बाळगण्याची नितांत गरज आहे.
जोडीदारासोबत मस्करीत काही वाईट गोष्ट बोलण्याचे टाळा. तुमची गोष्ट चुकीची आहे असं जर जोडीदाराला वाटत असेल तर आपली चूक स्वीकारण्यासाठी उशीर करू नका. जर तुमचे नाते जूने असेल तर एकमेकांवर विश्वास ठेवा आणि गैरसमज होण्यापासून तुमच्या नात्याला वाचवा.
जर कधी मैत्री नविन असेल तर एकमेकांना समजण्यासाठी वेळ लागेल म्हणून धैर्य ठेवा. विवाहित जातकांवर शनी ग्रहाची दृष्टी असल्याने समस्या वाढण्याचे संकेत आहेत. जोडीदाराच्या बोलण्यात कटुता दिसून येऊ शकते. लहान गोष्टींवर वाद विवाद होईल. पण महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती अनुकूल होणार. जीवनसाथीचे तुमच्या प्रति प्रेम ही वाढणार.
आर्थिक बळ – कुंभ राशीच्या जातकांसाठी आर्थिक दृष्ट्या हा महिना कठीण राहणार असून.. तुमच्या राशीमध्ये शनीदेवांची उपस्थिती असल्या कारणाने खर्चही वाढू शकतात, परंतु त्याचबरोबर धनलाभाचेही प्रचंड संकेत आहेत व आर्थिक समृद्धी होत राहणार. सासरच्यांकडून योग्य तो सहयोग प्राप्त होणार.
या दरम्यान तुम्ही उद्योग धंद्यामध्ये पूर्ण मेहनतीने काम कराल. तुमचे इतरत्र अडकून असलेले पैसे परत मिळविण्यासाठी तुम्ही सक्षम असाल. येणाऱ्या लहान चढ उतारामुळे टेन्शन घेऊ नका, तर स्वतःवर विश्वास ठेवा. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतांना सावधान रहा. तुम्हाला छोट्या योजना असणाऱ्या बँकेत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरु शकते.
आरोग्य आणि घ्यावयाची काळजी – आरोग्याच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. पोटाच्या संबंधित समस्या वाढू शकतात, या दरम्यान तुम्ही लगेचच डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणे फार गरजेचे आहे. फ्रीजमध्ये असणारे जेवण किंवा पाणी पिऊ नका. या काळात स्वतःला व्यायाम आणि योगाची सवय लावून घ्या. रात्री काम केल्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.
40 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या हृदयाची तपासणी करून घ्या. महिन्याच्या उत्तरार्धात सूर्याचे गोचर झाल्यामुळे स्वास्थ्य संबंधित आराम मिळेल. जुन्या आजारापासून मुक्ती ही मिळेल. या दरम्यान घरातील वृद्ध व्यक्तींच्या आरोग्यात सुधारणा दिसून येईल.
पारिवारिक सौख्य – कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना कौटुंबिक दृष्ट्या चांगला असणार आहे. कुंभ राशीच्या परिवारात एकता आणि सचोटी कायम राहील. परिवारातील सर्व सदस्यांचा एक दुसऱ्यांच्या प्रति चांगला सुसंवाद तथा ताळमेळ बनून राहील.
जुने असलेले वाद-विवाद दूर होतील. पूर्वीच्या काही जुन्या संपत्तीच्या समस्या असतील तर त्याही या दरम्यान सुटतील. या दरम्यान घरामध्ये कोणतेही मंगल कार्य होऊ शकते, घरातील वातावरण प्रसन्न व आनंदाचे राहील.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!