Tuesday, June 11, 2024
Homeआध्यात्मिककुणासाठी जगावं.? श्री स्वामी समर्थांनी दिलेले उत्तर नक्की वाचा.!!

कुणासाठी जगावं.? श्री स्वामी समर्थांनी दिलेले उत्तर नक्की वाचा.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्र-मैत्रिणींनो… आपल्यातील प्रत्येक व्यक्ती जन्माला येतो आणि लहानाचा मोठा होतो त्यानंतर पुढे सुख दुःखाची अनेक वादळे झेलत आपले आयुष्य जगत असतो पण हे आयुष्य का जगतो? कोणासाठी जगतो? आणि कशासाठी जगतो? याची कल्पना त्याला नसते.

मनुष्य पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर राहतो आणि पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी किंवा आपला छोटासा व्यवसाय करत असतो. पैसा मिळवून पोट भरण्यासाठी या कामांबरोबरच तो कष्टाची मेहनतीची ही कामे करत असतो.

याचबरोबर आधीच्या काळातील लोक हे ऐंशी ते शंभर वर्षे आयुष्य जगत होते पण आता ची लोक साठ ते सत्तर वर्षापर्यंत जगतो आणि मरून जातो, ही व्यक्ती मेल्यानंतर पृथ्वीतलावरच त्या व्यक्तीचे अस्तित्व न’ष्ट होतं. पण आपलं जगणं हे फक्त आपल्या कुटुंबाएवढेच मर्यादित असत मग जगावं तर कोणासाठी असा प्रश्न निर्माण होतो. जगावं तर ते समाजासाठी, तुम्ही जेव्हा समाजातील काही समस्या सोडवता आणि इतरांच्या कामाला येता, तेव्हा त्याला तुमचा जीवन प्रवास किंवा जगणं असे म्हणतात.

तुम्ही ज्यावेळी स्वतःच्या पलीकडे जाऊन विचार करता म्हणजेच समाजामध्ये काही तरी नवीन किंवा समाजामधील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्यालाच योग्य शिक्षण असे म्हणतात. करिअर म्हणजे केवळ चांगली नोकरी मिळवणे किंवा मोठा उद्योग उभा करणे एवढाच संकुचित विचार आपला नसावा.

समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आयुष्य होय ज्यावेळी तुम्ही समाजात काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करता किंवा समाजामधील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा त्यालाच तुमचं चांगलं आयुष्य जगणं असं म्हटलं जातं.

जेव्हा एखादी व्यक्तीकडे खूप पैसा असतो किंवा ती व्यक्ती मोठमोठ्या आलिशान गाड्यांमधून फिरत असते, त्याचवेळी ती व्यक्ती श्रीमंत आहे असे काहीही नाही. चांगल्या स्वभावाचा किंवा चांगल्या विचारांचाच माणूस खरा श्रीमंत असतो.

अलिशान बंगले, महागड्या गाड्या,पैसा हि तर केवळ क्षणिक सुखाची वस्तू आहेत, यातील एकही वस्तू तुम्ही मेल्यानंतर तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाही. मेल्यानंतर तुम्ही तुमचे कर्म, तुमच्याबद्दलची समाजातील आपुलकी आणि तुमची आठवण हीच तुमची खरी कमाई असते.

त्यामुळे चांगल्या स्वभावाची, चांगले कर्म करणार्‍या व्यक्तीची मेल्यानंतर आठवण काढली जाते याउलट पैशाने भरपूर श्रीमंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आठवण आपण काढतो असे एकदाही दिसले नाही.

पण जे समाजासाठी जगतात, समाजात चांगले परिवर्तन घडवून आणतात अशा साधू संतांची व थोर समाजसेवकांची आठवण आपण दरवेळी काढतच असतो. कारण ते जगले होते फक्त समाजासाठी आणि त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण केले होते.

त्यांनी समाजाला काहीतरी दिलं त्यामुळे त्यांची आठवण आजही अनेक ठिकाणी काढली जाते. पण भले ही आपली महती साधुसंतांनी एवढी मोठी नसेल परंतु आपली पुढची पिढी तरी आपल्याला लक्षात ठेवेल एवढे तरी आपण समाजासाठी केले पाहिजे.

एकमेकांचा राग द्वेष करण्यापेक्षा आनंदी व सुखी आयुष्य कसे जगता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. ज्या मुलांना आपण लहानाचं मोठं करतो तीच मुलं तुम्हाला म्हातारपणी सांभाळतील असेही नाही. त्यामुळे बालपणा सारखेच आपले म्हातारपण जाईल असेही काही नाही.

त्यामुळे लहानपणी लाड होतात पण म्हातारपणी हालअपेष्टा सोसाव्या लागू शकतात. त्यामुळे शेवटी असा प्रश्न पडतो की आपण आयुष्यभर कोणासाठी जगलो, त्यामुळे आपल्याला समाजासाठी जगलं पाहिजे आणि दानधर्म ही केला पाहिजे,
ध्यानधारणा ही केली पाहिजे भुकेलेला अण्णा दिले पाहिजे आणि गरजूंना मदत केली पाहिजे.

आयुष्य हे आनंदात जगता आलं पाहिजे, म्हातारपणी आपल्याला काय काहीही पाहण्यास मिळत नाही त्यामुळे आत्ताच जग फिरून व पाहून बघा. येताना एकटे आलो होतो पण जाताना मात्र सर्वांचे होऊन जाऊयात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular