Wednesday, June 12, 2024
Homeआध्यात्मिककुठूनतरी आवाज घुमत होता. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.. गुरुदेव दत्त.....

कुठूनतरी आवाज घुमत होता. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.. गुरुदेव दत्त.. एक अविस्मरणीय अनुभव.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! स्वामी प्रिय भक्त हो स्वामींच्या अनुभती एका शहरात प्रतिष्ठित कुटुंब होते. या कुटुंबातील डॉक्टर असलेले सासरे रुग्णांची सेवा करत आणि अशाच एके दिवशी सेवा करत असताना त्यांना कोरणाची लागण झाली. आणि हळूहळू सर्व कुटुंबाला याने विळख्यात घेतले. चांगले उपचार घेण्यासाठी दीनानाथ मंगेशकर या पुण्यातील नामांकित दवाखान्यामध्ये सासरे व पती यांना उपचारासाठी अ‍ॅडमिट केलं. ताई घरीच राहून बरी झाली. आपल्या पतीला व सासऱ्यांना रोज डबा घेऊन ताई दवाखान्यात जात. ताई या स्वामींच्या निस्सीम भक्त म्हणुन ताईंची मनापासून स्वामी महाराजांची सेवा चालू होती.

असा अखंड जप चालू होता रोज रात्री मानस पूजा करून त्या महाराजांना सोबत चला असं म्हणून दवाखान्यात जायाच्या. आपल्या पतीचा होणारा त्रास त्या पाहु शकत नव्हत्या. त्यांना शांत झोप लागावी असं त्या महाराजांना विनंती करायच्या. ताईंचा रोजचा हा दिनक्रम सुरू होता. त्यांची सेवा फळाला आली पती व सासरे ती कोरोना मुक्त होऊन घरी आले.

मग घरी आल्यावर ताईंच्या पतीने ताईंना सांगितले कि, रोज रात्री स्वामी समर्थ महाराज माझ्या जवळ येऊन मला शांत झोप असं म्हणत व “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” असेही म्हणत. गुरुदेव दत्त असा आवाज कानावर यायचा व मला झोप लागायची. हे ऐकताच ताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि नकळत महाराजांच्या कडे केलेली मागणी महाराज पूर्ण करतात. व भक्तांच्या हाकेला धावून येतात.

याचा अनुभव ताईना आला होता. ताईने महाराजांना मनापासून नमस्कार केला. हम गया नही जिंदा है हे महाराजांनी भक्तांना दिलेले वचन पूर्ण केले होते. आज या महामारीत आपण सुरक्षित श्वास घेऊन आजही आपण जिवंत आहोत. याला फक्त आणि फक्त महाराजांचीच केलेली सेवा आहे. ज्या घरात महाराजांचे अस्तित्व आहे त्या घरावर महामारीचा कुठलाच वाईट परिणाम होणार नाही ही मनापासून श्रध्दा श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या भक्तांना आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.!!

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular