Sunday, April 21, 2024
Homeआध्यात्मिकMagh Amavasya 2024 अमावस्येचा योग स्त्री असो वा पुरुष.. रात्री चुकूनही ही...

Magh Amavasya 2024 अमावस्येचा योग स्त्री असो वा पुरुष.. रात्री चुकूनही ही कामं करु नका..

Magh Amavasya 2024 अमावस्येचा योग स्त्री असो वा पुरुष.. रात्री चुकूनही ही कामं करु नका..

Maghi Amavasya 2024 अमावस्येच्या रात्री काही गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते. रात्रीच्या वेळी बाहेर फिरू नये, असं देखील सांगितलं जातं. अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी वर्ज्य आहेत, या गोष्टी करणाऱ्यांना कधीही भाग्याची साथ मिळत नाही.

हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला फार महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात अमावस्या (Magh Amavasya 2024) आणि पौर्णिमा तिथी येते. एका वर्षात 12 पौर्णिमा आणि अमावस्या येतात. पंचांगानुसार, माघ महिन्याची अमावस्या रविवारी (10 मार्च) येत असली तरी ही अमावस्या आज, म्हणजे शनिवारी संध्याकाळपासून सुरू होत आहे.

अमावास्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करुन पुण्य कमावलं जातं. अमावस्येच्या दिवशी अनेक धार्मिक कार्यं केली जातात. पूजा-पाठ केला जातो. परंतु, शास्त्रात अमावस्येच्या दिवशी काही कामं वर्ज्य सांगण्यात आली आहेत. ही कामं अमावस्येच्या रात्री अजिबात करू नये, जे लोक अशी कामं करतात त्यांना नशिबाची साथ मिळत नाही. (Magh Amavasya 2024) अमावस्येच्या रात्री कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे जाणून घेऊया. याआधी अमावस्येची तिथी आणि मुहूर्त पाहूयात..

हे सुद्धा पहा – Wind Chimes Vastu Tips विंड चाइम्स घरात लावल्याने सुख-समृद्धी येईल.. जाणून घ्या त्यांच्याशी संबंधित रहस्ये..

माघी अमावस्या प्रारंभ आणि समाप्ती वेळ – पंचांगानुसार, माघ अमावस्या आज, म्हणजेच 9 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजून 17 मिनिटांनी सुरू होईल आणि 10 मार्च 2024 रोजी दुपारी 2 वाजून 29 मिनिटांनी समाप्त होईल. (Magh Amavasya 2024) शास्त्रानुसार आणि उदयातिथीनुसार अमावस्या वैध आहे, म्हणून माघ अमावस्या 10 मार्च रोजी असणार आहे.

अमावस्येच्या रात्री चुकूनही करू नका ‘या’ चुका..

अमावस्येच्या रात्री सुनसान ठिकाणी किंवा स्मशानात जाऊ नये. अमावस्येला नकारात्मक शक्तिंचा प्रभाव जास्त सक्रिय असतो, यामुळे तुम्हाला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते.

अमावस्येला रात्री लवकर झोपावं आणि सकाळी लवकर उठावं. (Magh Amavasya 2024) अमावस्येला सकाळी उशिरापर्यंत झोपू नये. अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठावं आणि सूर्याला अर्घ्य द्यावं.

हे सुद्धा पहा – Falgun Amavasya Rules And Importance फाल्गुन अमावस्येचा शुभ योगायोग.. जाणून घ्या या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

अमावस्येला पती-पत्नीने संबंध बनवण्यापासून दूर राहावं. गरुड पुराणानुसार, अमावस्येला स्थापित केलेल्या संबंधांमुळे जन्माला आलेलं अपत्य सुखी राहत नाही.

अमावस्येच्या संध्याकाळी किंवा रात्री घराच क्लेश करू नये, वाद घालू नये, (Magh Amavasya 2024) यामुळे पितरं देवतांची कृपा लाभत नाही. अमावस्येला पितरांची पूजा करावी.

अमावस्येच्या दिवशी गरिबांचा अपमान करू नये. गरिबांचा अपमान करणाऱ्यांना शनि त्रास देतो. गरिबांचा अपमान करणाऱ्या लोकांवर शनी आणि राहू-केतूचा अशुभ प्रभाव पडतो.

कालसर्प आणि पितृदोष दूर करण्यासाठी उपाय – अमावास्येला तिळाचा यज्ञ केल्यास शुभ फळ मिळते. घरात आनंद, सुख-समृद्धी नांदते. या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करा. (Magh Amavasya 2024) कालसर्प दोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय परिणामकारक मानला जातो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular