Thursday, June 13, 2024
Homeआध्यात्मिकमागील जन्मीच्या खुणा या जन्मात सुद्धा तुमच्या सोबत असतात.. वाचा यामागील रहस्य.!!

मागील जन्मीच्या खुणा या जन्मात सुद्धा तुमच्या सोबत असतात.. वाचा यामागील रहस्य.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या जीवनाविषयी जाणून घेण्याची, आपल्या जीवनात पुढे काय घडणार आहे, कोणती संकटे येणार आहेत याबद्दल जाणून घ्यावयाचे असते. परंतु मित्रांनो आपण मागच्या जन्माच्या काही गोष्टी कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहात का? मित्रांनो आपल्या काही अशा गोष्टी असतात ज्या काही मागील जन्माशी संबंधित असतात. अशा काही खुणा असतात ज्या मागच्या जन्माची आठवण करून देत असतात. तर मित्रांनो आज आपण अशाच काही खुणांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या मागच्या जन्माशी संबंधित आपणाला संकेत देत असतात.

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जन्म, डाग. एखादे बाळ जन्माला येते तेव्हा त्याच्या शरीरावर एखादी लालसर किंवा काळ्या रंगाचे डाग आपल्याला पाहायला मिळते आणि अशावेळी आपल्याला कळते की हे नेमके कोण होते. शरीरावरील या खुणा आपल्या मागील जन्मातील एखाद्या घटनेशी संबंधित असतात. मागच्या जन्माच्या वेळी मृत्यू वेळेस काही जखमा झालेल्या असतील तर त्याचीच जन्मखूण आपणाला हे सर्व काही सांगून जाते.

दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या बोलण्यातील खुणा. एखाद्या व्यक्तीला वाहत्या पाण्याची, डोंगर, दरी, उंच ठिकाण याची जर भीती वाटत असेल तर अशा वेळी या व्यक्तींचा मृत्यू गेल्या जन्मी कुठून तरी डोंगरावरून पडल्यामुळे, पाण्यामध्ये पडल्यामुळे किंवा कोणीतरी टाकल्यामुळे घडलेला असतो आणि हीच भिती त्यांना या जन्मात सुद्धा वाटत असते. आणि त्यांची ही उंचावरून पाहण्याची, टेकडीवरुन पाहण्याची तसेच पाण्याची भीती कायमच राहते.

जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो त्यावेळेस त्या व्यक्तीला आपण आधी कधीतरी पाहिली आहे किंवा हा व्यक्ती चांगला आहे की वाईट म्हणजेच त्याच्या संगतीत राहणे आपल्याला योग्य आहे की अयोग्य असे आपले मत तयार होते. म्हणजे मागच्या जन्मी आपण त्या व्यक्तीबरोबर संबंध निर्माण केलेले असतात आणि त्याचा अनुभव तुम्हाला आलेला असतो. म्हणूनच त्या व्यक्तीबरोबर राहणे आपल्यासाठी हितकारक आहे की नाही याचा अंदाज आपण बांधतो.

मित्रांनो काही वेळेस असे होते की, एखाद्याशी आपला दूर-दूर काहीच संबंध नसतो परंतु आपण त्यांच्याशी जोडले जातो. काही वेळेस त्या आपल्या जोडीदार देखील बनतात. याचा अर्थ असा की गेल्या जन्मी या व्यक्तीशी तुमचा संबंध असतो. तो या जन्मी आपल्याला त्यांच्यापर्यंत खेचून नेतो.

पुढची गोष्ट म्हणजे कधीकधी आपल्याला काही घटना व प्रसंग आठवत असतात. त्यांचा आपल्या जीवनाशी काहीच संबंध नसतो. आपल्या जीवनात या घटना कधीतरी घडलेल्या असतात. या घटना काधीतरी घडलेल्या आहेत व किंवा घडणार असतील याबद्दलची आपल्याला जाणीव होऊ लागते. तर या घटना आपल्या मागील जन्मी घडून गेलेल्या असतात. या गोष्टी आपल्याला सारख्या आठवत राहतात. परंतु या गोष्टींचा या जन्मी काहीच संबंध नसतो.

पुढील गोष्ट म्हणजे कधी कधी असे काही वाटते की, आपण एखाद्या अज्ञात ठिकाणी किंवा स्थळी जात असतो. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणाला पाहिल्यानंतर आपल्याला असे जाणवते की या ठीकानी आपण पहिल्यांदा कधीतरी आलेलो आहोत. या ठिकाणाचा काहीतरी संबंध आहे .परंतु त्या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल. याचा अर्थ असा की गेल्या जन्मांमध्ये या ठिकाणांचा तुमच्याशी संबंध असतो म्हणजेच गेल्या जन्मी तुम्ही या ठिकाणी आला असणार.

काही वेळेस आपल्याला स्वप्नांमध्ये एखादे स्थळ किंवा एखादी घटना दिसत असते. परंतु त्या घटना आपल्याला आठवत नसतात किंवा त्याच्याशी आपला संबंध नसतो. या सर्व घटना आपल्या गेल्या ज्यांनी घडलेल्या असतात म्हणजे त्या घटनांशी आपला संबंध गेल्या जन्मी जोडलेला असतो.

आपल्यापैकी अनेकांना आपल्या जीवनात कोणत्या गोष्टी घडणार आहे ही माहिती असते. तसेच ते काही अंदाज देखील आपल्या भविष्य बाबतीत वर्तवित असतात. हे मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींच्या बाबतीत घडत असते. या व्यक्तींना आपल्या भविष्यात काय घडणार आहे हे कळत असते. त्यांना हे सर्व त्यांच्या आधीच्या जन्मामुळे कळत असते.

आपल्या आजूबाजूला अशी काही मुले देखील असतात. जे खुप हुशार असतात तसेच प्रतिभाशाली ज्ञान प्राप्त करतात. याचा अर्थ या मुलांनी गेल्या जन्मी काहीतरी प्रतिभाशाली ज्ञान प्राप्त केलेले असते. त्याची साधना त्यांना या जन्मी मिळत असते.

आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात ज्यांचा आपल्याशी काही संबंध नसतो. परंतु अशा व्यक्ती आपल्या बाबतीत कायमच वाईट चिंतीत असतात. अशावेळी आपल्या मनामध्ये अनेक शंका निर्माण होतात. अशा व्यक्तींकडे तुम्ही दुर्लक्ष करायचे आहे. कारण गेल्या जन्मी तुम्ही त्यांचे काही तरी वाईट केलेले असेल किंवा त्यांचे काही तरी देणे द्यायचे असेल त्यामुळे या जन्मी तुमच्या बद्दल वाईट विचार करीत असतील.

तर मित्रांनो अशा प्रकारच्या वेगवेगळ्या खुणा आपल्याला मागील जन्माची आठवण करून देत असतात. मागच्या जन्मी काय घडले असेल याचाही अंदाज या जन्मखुणामुळे आपणाला होतो.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular