Wednesday, June 12, 2024
HomeUncategorizedमहाशिवरात्री.. रात्री 12 वाजता शिवलिंगावर अर्पण करा ही एक वस्तु.. मनोकामना होईल...

महाशिवरात्री.. रात्री 12 वाजता शिवलिंगावर अर्पण करा ही एक वस्तु.. मनोकामना होईल पूर्ण… पैशांचा पाऊस पडेल..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.! 18 फेब्रुवारी शनिवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री. महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांची पूजा आराधना करण्यासाठीचा हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. आपण सुद्धा या दिवशी जवळपासच्या शिवालयात म्हणजेच महादेवांच्या मंदिरात नक्की जा. ज्या ज्या वस्तू भोलेनाथ यांना प्रिय आहेत त्या सर्व वस्तू शिवलिंगावर अर्पण करा आणि सोबतच आजच्या या लेखात आम्ही उपाय सांगत आहोत हा उपाय सुद्धा आपण नक्की करा.

मित्रांनो या उपायामुळे तुमच्या जीवनात किती मोठे दुःख असू द्या संकट असू द्या किंवा मनातील एखादी इच्छा आहे जी अनेक दिवसांपासून अपूर्ण आहे किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला एखादा मोठा आजार झालेला आहे तो बरा होण्यासाठी आपण हा उपाय महाशिवरात्रीत नक्की करून पहा.

मित्रांनो महाशिवरात्री रात्री बारा वाजता आपण हा उपाय करायचा आहे. हे पहा महाशिवरात्रीस आपण दिवसभरात तर महादेवांचे पूजा करणारच आहोत या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंघोळ वैगरे करून शुभ्र वस्त्र परिधान करून शिवलिंगाची मनोभावे पूजा करायची आहे.

शिवलिंगावर बेलपत्र पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे. ही सर्व पूजा करत असताना ओम नमः शिवाय चा जप करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी या दिवशी शिव लीलामृत या ग्रंथाचं पारायण आवश्य करा‌

किंवा ज्यांना पूर्ण ग्रंथ वाचणे शक्य नसेल त्यांनी फक्त या ग्रंथातील अकरावा अध्याय जरी वाचला तरी हा पूर्ण ग्रंथ वाचल्याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल आणि मित्रांनो एक विशेष वस्तूची आपण महाशिवरात्रीच्या रात्री बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करायचे आहे ती वस्तू म्हणजे बोर.

मित्रांनो बोर हे सुद्धा भोलेनाथ यांना प्रिय आहे. आपण शिवलिंगावर महाशिवरात्रीत रात्री बारा वाजता अर्पण करायचा आहे. हे बोर अर्पण करण्यापूर्वी आपण शिवलिंगावर तांब्याभर नक्की अर्पण करा. शिवलिंगावर बेलपत्र चंदन पांढरे रंगाची फुले अर्पण करा.

अक्षत म्हणजेच न तुटले फुटलेले थोडेसे तांदूळ सुद्धा शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत व ते झाल्यानंतर आपण सात बोरं घ्यायचे आहेत. सातबोर एक एक करून शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत आणि ही अर्पण करत असताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र आपण निरंतर बोलायचा आहे.

हा मंत्र जप करायचा आहे आणि त्यानंतर मनोभावे हात जोडून आपल्या मनातील इच्छा महादेवांसमोर बोलून दाखवायचे आहे. आपल्या जीवनातील जी काही दुःख आहेत अडचणी आहेत संकट आहेत ते दूर करण्यासाठी मनोमन प्रार्थना आपण महादेवांच्या जवळ करायची आहे व ते झाल्यानंतर जी बोरं आपण शिवलिंगावर अर्पण केलेले आहेत..

ती बोर पाच ते सात मिनिटानंतर किंवा आपण जो मंत्र जप करत आहात तो केल्यानंतर ही बोर आपण उचलून घ्यायचे आहेत आणि एक एक करून प्रत्येक दिवशी एक अशा प्रकारे सात दिवस ही सातबोरं जो व्यक्ती आजारी आहे किंवा कुठल्याही अडचणीत आहे त्या व्यक्तीस हे बोर आपण त्या व्यक्तीस खाऊ घालायचे आहेत.

मित्रांनो या उपायामुळे तुम्ही बघाल की काही दिवसातच त्या व्यक्तीचा किती मोठा आजार असेल तो नक्की बरा होईल. कमावत्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय तर त्या व्यक्तीला नोकरीमधून किंवा तो उद्योग धंदा करतोय तर त्यामधून मोठ्या प्रमाणात पैसा मिळेल घरात धन पैसा येऊ लागेल तर ती इच्छा सुद्धा या उपायामुळे नक्की पूर्ण होईल.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular