Thursday, May 23, 2024
Homeआध्यात्मिकमहिन्यांतून फक्त 2 वेळा तुळशीला अर्पण करा ही 1 वस्तु.. धन, पैसा,...

महिन्यांतून फक्त 2 वेळा तुळशीला अर्पण करा ही 1 वस्तु.. धन, पैसा, पुत्र, सौभाग्य सर्वकाही लाभेल.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात तुळशीचे फार महत्त्व आहे. तुळशीला आपण देवी मानतो. श्रीहरी विष्णू यांना तुळस अतिप्रिय आहे. तुळशीचे पान अर्पण केल्याशिवाय श्रीहरी विष्णूंचे पूजन अपूर्ण मानले जाते. तसेच श्रीहरीना नैवेद्य दाखवून काही नैवैद्य अर्पण करताना ही सर्वात आधी तुळशीचे पान या नैवेद्यात टाकले जाते आणि दररोज सकाळी तुळशीचे पूजन केले जाते. तुळशीला पाणी अर्पण करावे.

शुद्ध तुपाचा दिवा लावावा. यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी व संपन्नता येते. घरात सकारात्मक उर्जा येते. दाराच्या दोन्ही बाजूंना दोन तुळशी ची रोपे लावल्यास आपल्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक उर्जा प्रवेश करत नाही व घरातील सकारात्मक ऊर्जेमुळे देवी लक्ष्मी आपल्या घरात वास्तव्य करते.

जर मुले आपले म्हणणे ऐकत नसतील, हट्टीपणा करत असतील तर आपल्या घराच्या पूर्व दिशेला तुळस लावावी व त्या तुळशीचे पूजन मुलांना करायला सांगावे. तुळशीपुढे मुलांना दिवा लावायला सांगावे. यामुळे मुलांचा हट्टीपणा समाप्त होईल. आपले म्हणणे ऐकू लागतील. तुळशीची पाने मुलांना खायला दिल्यास मुलांचे मन शांत राहते. त्यांचा स्वभावही बदलतो.

अभ्यासात लक्ष लागते. घरात तुळशीचे रोप जरूर लावा. त्यांच्या घरात सुख-समृद्धी नांदते. त्यांच्या दारातील तुळस नेहमी आशीर्वाद देत असते व त्यांच्या घरात नेहमी सुखसमृद्धी लक्ष्मी कृपा राहते. एक असा उपाय जो केल्यास साक्षात देवी लक्ष्मी कृपा आपल्यावर होते. आपल्या घरात काही संकटे असतील, काही अडचणी असतील, आर्थिक समस्या असेल, घरातील सदस्यांमध्ये मतभेद असतील, वादविवाद होत असतील, तर या सर्व समस्या अडचणींपासून सुटका मिळवण्यासाठी हा उपाय करा.

महिन्यातून दोन वेळा करायचा आहे. तो मनोभावे व साधा आपल्याला करायचा आहे. हा उपाय आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचा आहे. एक महिन्यात दोन एकादशी येतात, एक शुक्ल पक्षात, दुसरी कृष्ण पक्षात, या दिवशी बहुतेक व्यक्तींचा या दिवशी उपवास असतो, असेल तर खूपच चांगली गोष्ट आणि नसले तरीही हा उपाय करून पुण्य मिळवू शकता. परंतु एकादशीच्या दिवशी सात्विक अन्न सेवन करावे.

एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशी समोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये. एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचे पूजन कसे करावे नीट समजून घ्या व होणाऱ्या चूका टाळा. तुळशी मातेसमोर सर्वात आधी शुद्ध तुपाचा दिवा लावावा, त्यानंतर पुजेला आरंभ करावा, तुळस मातेला लाल रंगाचे फूल अर्पण करावे, गुलाबाचे फुल असेल तर खूपच चांगले, देवीला लाल व पिवळे दोन्ही प्रकारची फुले अतिप्रिय आहेत, म्हणून जर लाल व पिवळी फुले असतील तर दोन्हीही अर्पण करावीत.

अलंकार अर्पण करावे, पूजन करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. लाल रंगाची ओढणी देवीला अर्पण करावी. मनोभावे नमस्कार करावा. पूजन करताना आपली जी काही अडचण असेल किंवा इच्छा मनोकामना देवी मातेने पूर्ण करण्यासाठी देवीकडे विनंती करायचे आहे. आपण मातेचे पूजन करताना जी अपेक्षा करतो ती नक्कीच पूर्ण होते. नंतर तेथेच बसून ओम तुलसीदेवी नमः या मंत्राचा 108 वेळा तसेच ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि करता-करता तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात.

त्यानंतर मातेला श्रीहरी विष्णूना देवी लक्ष्मीला नमस्कार करा. आपण ज्या वस्तू देवीला सौभाग्याचे लेणे म्हणून अर्पण करतो त्या लाल बांगड्या, साडी किंवा टिकली सकाळी या सर्व वस्तू एखाद्या गरजूला देऊन टाकाव्यात. शक्यतो कोणतीही वस्तू कोणालाही देताना आधी त्या व्यक्तीला त्या वस्तूची खरोखर गरज आहे का हे बघावे, भरलेल्या घरात काही देऊन काही उपयोग होत नाही. कारण आधीपासूनच त्यांच्याकडे सर्वकाही असल्यामुळे त्यांना या वस्तूंचे अप्रूप नसते व गरजही नसते.

म्हणून त्या वस्तू त्यांच्याकडे तशाच पडून राहतात. त्यापेक्षा गरीब व गरजू एक गरजूंना जर आपल्या वस्तू दिल्या तर ते त्या वस्तूंचा वापर करतील. या उपायामुळे तुमची कोणत्याही प्रकारची अडचण असेल किंवा काही इच्छा मनोकामना असेल श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. आपल्याला प्रत्येक महिन्याच्या एकादशीचे तिथीला हे करायच आहे. जास्तीत जास्त एकादशीपर्यंत करा, आपण त्या अडचणीतून मुक्त होत नाही तोवर उपाय करत रहा. देवीच्या कृपेने आपलं घर सुख, आनंदाने भरेल.

टीप – वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा अवलंब करण्यापुर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेयर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular